Author: saimat team

जळगाव प्रतिनिधी । दहिगाव संत येथील राहणाऱ्या २२ वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दहिगाव संत ता. पाचोरा येथील राहणार मयत सागर गणेश खडसे (वय-२२) असे नाव आहे. मयत सागर या तरूणाने म्हसावद ते माहेजी रेल्वे अपलाईन खंबा क्रमांक ३९४/११-१२ दरम्यान धावत्या रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read More

मुंबई : प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसची (Congress) आजची अवस्था एखाद्या हवेली मोडकळीस आलेल्या जमीनदारासारखी असल्याचे पवार म्हणाले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी पवारांच्या वक्तव्यांवर स्पष्टीकरण दिले आहे . देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची पवारांची ही भूमिका असल्याचे ते म्हणाले. त्या संदर्भात त्यांनी केलेली टीका काँग्रेसने सकारात्मक पद्धतीने घेतली पाहिजे,असेही मलिक म्हणाले. दरम्यान शरद पवारांच्या टीकेला उत्तर देत त्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावे असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले होते. शरद पवारांनी मांडलेल्या विचारांशी मी सहमत नाही. शरद पवारांच्या विचाराने काँग्रेसच्या…

Read More

यावल, प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक आणि यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंतराव पाटील यांचा रविवार दि.12 सप्टेंबर 2021 रोजी अभिष्टचिंतन सोहळा श्री गजानन महाराज मंदिरात आणि त्यानंतर संध्याकाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि नियोजन पूर्वक पार पडला. या अभिष्टचिंतन सोहळ्याची जय्यत तयारी आणि नियोजन यावल नगरपरिषदेचे गटनेता राकेश कोलते.एजाज पटेल,फारूक हाजी,गणेश महाजन धिरज महाजन,मोसिन कुरेशी,असलम मेंबर,समीर मेंबर,आशिष पाटील यांच्यासह सानेगुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील सर यांनी आपल्या मालकीची जागा स्नेह भोजनासाठी उपलब्ध करून उत्कृष्ट नियोजन केले होते. यावल नगरपरिषद माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेता राकेश कोलते नगरपरिषद संचालित सानेगुरुजी विद्यालयातील उपशिक्षिका सौ. कविता…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । पारनेर जि. अहमदनगर येथील वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगाव येथे संजय गांधी निराधार योजना कार्यालयात बदली झाली असून याबाबत शासनाचे उपसचिव डॉ.माधव वीर यांनी सोमवारी आदेश काढले आहेत. देवरे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केलेली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने तीन महिला अधिकार्‍यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार तहसीलदार देवरे यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आलेले नाही. त्याबाबत विभागीय आयुक्तांनी शासनाला कळवले होते. देवरे यांनी अरुण आंधळे व निवृत्ती कासुरे यांच्याविरुद्ध महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडेही तक्रारी केल्या होत्या. अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार देवरे यांनी गंभीर स्वरूपाच्या अनियमितता केलेल्या आहेत. त्यांनी अधिकार…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाने आज जिल्हा बँकाच्या निवडणुका वेळेवरच घेण्याचे निर्देश जारी केल्यामुळे आता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लांबणीवर न पडता वेळेवर घेण्यात येईल असे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारला कोरोनाचे कारण देऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढे ढकलता येणार नसल्याचा महत्वाचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने सोडवून निवडणुका घेण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे. या अनुषंगाने आजच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणारी यंत्रणा असणार्‍या राज्य सहकार निवडणूक प्राधीकरणाने जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश आज जारी केले आहेत. प्राधिकरणाने डिसेंबर २०२०…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा पोलिस दलातील साहित्य / कवी, पो. ना. विनोद अहिरे याना सप्तरंग मराठी चॅनलतर्फे जळगाव गौरव २०२१ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दि. ११ रोजी सप्तरंग मराठी चैनलतर्फे हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज मध्ये सप्तरंग चे संचालक पंकज कासार यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्र, पत्रकारिता, विधि ,शेती पोलीस दल, साहित्य लेखन, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विविध मान्यवरांचा जळगाव गौरव २०२१ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात डॉक्टर राहुल महाजन, कॅन्सर तज्ञ निलेश चांडक यांच्यासह विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात खाकी वर्दीतील साहित्यिक पोलीस नाईक विनोद अहिरे यांचा कुटुंबासह…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईतर्फे राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र यूथ आयडॉल कलारत्न पुरस्कार 2021 शिवानी जोशी – पाठक जळगाव यांना जाहिर करण्यात आला आहे. जळगावकर कन्येचे कथक नृत्य क्षेत्रात घवघवीत यश. . . . शिवानी पाठक ही जळगावकर नृत्यांगना गेल्या बारा वर्षापासून नृत्य साधनेत आहे. त्याच प्रकारे नवनवीन उच्चांक शास्त्रीय नृत्य कलेत गाठत आहे याच वर्षी गांधर्व विद्यालयातून विशारद पदवी घेऊन पद्मश्री डॉक्टर पुरू दधीच यांच्या कथ्थकशास्त्र पदव्युत्तर डिप्लोमा मध्ये विशेष योग्यता श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन स्वतःचा शोधनिबंध ही आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केला आहे . शिवानी ने जळगावकरांचा अभिमान उंचावला आहे. सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी तिला शुभेच्छा दिल्या. शिवानी…

Read More

एरंडोल, प्रतिनिधी । कासोदा येथे सद्गुरु गोविंद महाराज यांच्या व श्री संत मावजी महाराज यांच्या आशीर्वादाने कासोदा येथील महादेव मंदिरात परंपरागत अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह संपन्न होत आहे त्यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. भाद्रपद शुद्ध अष्टमी ते भाद्रपद शुद्ध पौर्णिमा म्हणजेच दिनांक १४ सप्टेंबर २१ ते २० सप्टेंबर २० पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दिनांक १४ सप्टेंबर मंगळवारी भागवताचार्य श्री ह भ प तुकाराम मुंढे महाराज (परळी वैजनाथ) दि १५ सप्टेंबर बुधवार रोजी किर्तन केसरी श्री प ह भ प अक्रूर महाराज (गेवराई) दि. १६ सप्टेंबर गुरुवार रोजी किर्तन कोविंद श्री ह भ प उमेश…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । राज्यात २०२१-२२ साठी ऊसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जे कारखाने १५ ऑक्टोबर २०२१ पूर्वी उसाचे गाळप सुरु करतील त्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे नोंदविण्यात यावेत, असा निर्णयही या बैठकीत सर्वसहमतीने घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री विश्वजित कदम, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्‍टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील त्याच दिवशी मतदान होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी आज केली. तसेच 6 ऑक्‍टोबर 2021 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. यूपीएस मदान म्हणाले, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य शासनाने…

Read More