जळगाव, प्रतिनिधी । भाजपा महिला मोर्चा जळगाव महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात उद्धव ठाकरे महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी देवो.. श्रीगणेशाची आरती करून साकडे करण्यात आले. भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तर्फे येथे नंदनवन कॉलनी मित्र मंडळ येथे श्री गणपती ची आरती महिला आघाडीतर्फे प्रदेश उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, मा महापौर सीमाताई भोळे, जिल्हाध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे, सरचिटणीस रेखाताई वर्मा, यांच्या हस्ते करण्यात आली. जिल्हा पदाधिकारी वंदना पाटील, रेखाताई पाटील, ज्योती ताई निंभोरे, पूजाताई चौधरी, नगरसेविका प्रतिभाताई कापसे, दीपमाळा ताई काळे, महिला आघाडी चे छाया सारस्वत, तृप्ती पाटील, व इतर महिला पदाधिकारी सहभाग नोंदविला. https://www.youtube.com/watch?v=2qLjVsGgsNA
Author: saimat team
मुंबई, वृत्तसंस्था । गेल्या सात महिन्यातपासून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळून देण्यासाठी कृषि मंत्री यांच्या दालनात अनेक बैठका घेऊन ही विमा कंपनी विम्याचे पैसे देत नसल्याने भाजपचे माजी मंत्री संजय कुठे यांनी मंत्रालयात आंदोलन केले. यावेळी संजय कुटेनी सांगितले की, माझ्या मतदार सांगतील शेतकरी आर्थिक संकटात आहे. यासाठी राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे अनेक वेळा बैठक झाल्या 65 कोटी रुपये हे फक्त माझ्या मतदार संघातील शेतकऱ्यांचे विमा कंपनी कडे घेणे आहेत. मात्र वारंवार बैठक घेऊन ही विमा कंपनी हे पैसे देत नाही. कंपनी सांगते की अगोदर सरकारने आम्हाला आमचे २०० कोटी द्यावेत त्यानंतर आम्ही तुम्हाला विमाची रक्कम देऊ आणि सरकार म्हणते आहे.…
मुंबई, वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात सेवा व समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे. या निमित्त विविध सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या अभियानाचे प्रमुख राज पुरोहित व प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश सचिव संदीप लेले , दिव्या ढोले, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील , उत्तर भारतीय मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय पांडे, महिला मोर्चा सरचिटणीस दीपाली मोकाशी यावेळी उपस्थित होते. या अभियानानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात पंतप्रधान…
तेलंगणा, वृत्तसंस्था । तेलंगणातील सैदाबाद भागात ९ सप्टेंबर रोजी ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील फरार आरोपीचा मृतदेह घानपूर भागात रेल्वे रुळावर आढळला आहे. मृताच्या शरीरावर गोंदवलेल्या चिन्हांच्या आधारे या मृताची ओळख पटवण्यात आली आहे. विशेष म्हणजे फरार आरोपीला अटक करून त्याचं एन्काऊंटर करण्यात येईल, आरोपीला सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असं तेलंगणाचे कामगार मंत्री मल्ला रेड्डी बुधवारी म्हणाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपीचा मृतदेह सापडला आहे. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करताना ट्रेनसमोर उडी मारल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तेलंगणच्या पोलीस प्रमुखांनी आरोपीच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. काय आहे प्रकरण? ही घटना हैदराबादच्या सैदाबादमध्ये गुरुवारी,…
जळगाव, प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्ड सिटीतर्फे एमआयडीसीतील महावीर नीरज इंडस्ट्रीज येथे बुधवारी रक्तदान शिबिर घेण्यात अाले. यात सुमारे १०० दात्यांनी रक्तदान केले. शिबिरात महावीर पॅकेजिंगच्या कामगारांसह रोटरी गोल्डसिटीचे सदस्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद््घाटन उद्योजक श्रीराम पाटील व रोटरीचे माजी उपप्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. राजेश पाटील यांनी रक्तदान शिबिराचे महत्त्व समजावून सांगितले. श्रीराम पाटील यांनी कामगार हा औद्योगिक क्षेत्रातील सहयोगी असल्याचे म्हटले. शिबिरासाठी अध्यक्ष उमंग मेहता, सचिव डॉ. नीरज अग्रवाल, प्रकल्प प्रमुख सुमीत छाजेड, सुमीत छाजेड, डॉ. सूर्यकिरण वाघण्णा, राकेश सोनी, सौरभ पटनी, प्रखर मेहता, राहुल कोठारी, डॉ. अर्चना कोतकर यांनी सहकार्य केले.
फैजपूर : प्रतिनिधी येथील पोलिसांनी बुधवारी नाका-बंदी दरम्यान एका वाहनासह चार गोवंश जातीचे गुरे अवैधरित्या वाहून नेत असताना ताब्यात घेतली मात्र पोलिसांना पाहून वाहन चालक फरार झाला आहे. वाहन चालकाचे नाव रईस खान हमीद खान रा. न्हावी असे असून त्याच्या ताब्यातून एक लाखाचा टाटा कंपनीचा छोटा हत्ती वाहन तसेच अठरा हजाराची चार गुरे असा तब्बल एक लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. बुधवारी पोलिसांची नाकाबंदी असताना येथील छत्री चौकात फौजदार मोहन लोखंडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पोलीस नाईक किरण चाटे, बाळू भोई, हे तपासणी करीत असताना एक टाटा कंपनीचा छोटा हत्ती…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून जिजामाता उद्यान (Jijamata Udyan Zoo)मधील पेंग्विनवर होणाऱ्या खर्चाबाबत वाद सुरू आहे. विरोधीपक्ष मुंबईमनपावर टीका करत आहेत. भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना पत्र लिहले – ‘कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होते आहे?’ असा टोमणा मारला.(Nitesh Rane scolds the mayor) मुंबईकरांची दिशाभूल राणेंनी लिहिले आहे की ‘आपण मुंबईच्या प्रथम नागरिक आहात. ही सन्मानाची बाब असली पाहिजे. पण आपण घेतलेल्या प्रेस कॅान्फरन्समध्ये ज्या पद्धतीने आपण मुंबईकरांची दिशाभूल केलीये, हे अत्यंत निंदनीय आहे. असो, आम्हीही समजू शकतो की ‘पेंग्वीन’च्या दबावामुळे आपण खोट्याला खर सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला,…
पुणे : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) या उद्या (१७ सप्टेंबरला) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशावरुन भाजपाचे नेते, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी तीन दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत सुरेखा पुणेकर यांचे नाव न घेता म्हणाले होते – ‘राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे. या पक्षाला गरीबांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे.” यावरून राष्ट्रवादी आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला होता. सुरेखा पुणतांबेकर यांनी यावरून दरेकरांना टोमणा मारला “घाण तोंडाचे दरेकर भाजपामध्ये कसे?” सुरेखा पुणेकर म्हणाल्यात, “मला दरेकराबाबत खूप वाईट वाटते. मोठे नेते आहेत पण त्यांना महिलांचा…
चाळीसगाव, प्रतिनिधी । औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र-52 (जुना 211) या महामार्गावर औट्रम घाटातील साखळी क्र. 376+000 ते 390+000 मधील रस्ता 31 ऑगस्ट, 2021 रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटातील मार्ग खचला होता. तसेच घाटात जागोजागी दरड कोसळल्या होत्या. त्यामुळे सदरील ठिकाणी एका बाजुस दरी व दुसऱ्या बाजुस डोंगर असल्यामुळे वाहन दरीत कोसळण्याची किंवा अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने सदरील रस्ता तात्पुरता बंद करण्यात आलेला होता व वाहतुक वळविण्यात आलेली होती. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व पाहणी करुन सद्य:स्थितीत औरंगाबाद ते धुळे वाहतुक करणाऱ्या दुचाकी व हलक्या/छोट्या वाहनांसाठी 15 सप्टेंबर, 2021 पासुन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सद्या घाटात रस्ता दुरुस्तीचे…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनी परिसरातील विजेंद्र हॉस्पिटल येथून १८ जुलै २०२० रोजी मोटारसायकल लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे. जिवन गोकुळ शिंदे या मोटार सायकल चोरट्यास जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. जळगाव शहरातील विजेंद्र हॉस्पीटल येथून 18 जुलै 2020 रोजी मोटार सायकल चोरी केल्याचे त्याने कबुल केले आहे. हरिष गिरधर भोळे रा. आसोदा – जळगाव यांची मोटारसायकल जुलै 2021 मधे शहरातील विजेंद्र हॉस्पीटल येथून चोरी झाली होती. त्याबाबत जिल्हापेठ पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा केल्यापासून आरोपी जिवन शिंदे फरार होता. एक वर्षानंतर तो पोलिसांच्या…