जळगाव : गावठी पिस्टल बाळगणा-या दोघा तरुणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. सागर देवीदास सोनवणे व भास्कर अशोक नन्नवरे (दोघे रा बांभोरी ता. धरणगांव जिल्हा जळगाव) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. सागर सोनवणे व भास्कर नन्नवरे हे दोघे तरुण गावठी पिस्टल बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी आपल्या सहकारी कर्मचा-यांना रवाना केले होते. गुन्हे शोध पथकातील कर्मचा-यांनी दोघा तरुणांचा शोध घेत त्यांना गावठी पिस्टलसह आव्हाने गावातून शिताफीने ताब्यात घेत अटक केली. सागर देवीदास सोनवणे याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जातून 25 हजार रुपये किमतीचा सिल्वर रंगाचा…
Author: saimat team
यावल प्रतिनिधी । जनतेचे काम वेळेवर न करणाऱ्या यावल तहसीलदार यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय आघाडीचे शहराध्यक्ष कामराज घारू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल शहरातील तहसीलदार हे जनतेचे वेळेवर काम करत नाही आणि काही पक्षाचे नेते व कार्यकर्ते एक एक दोन दोन तास केबिनमध्ये बसून राहतात. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते दरवाजाच्या बाहेर तहसीलदार यांची दोन तास वाट बघत असतात. तसेच तालुक्यातील व शहरातील जनतेला आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना कामाचे आश्वासन देतात परंतू प्रत्यक्ष मात्र काम होत नाही. यावल तालुक्यातील पेट्रोल पंप मालकाकडे…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील मास्टर कॉलनी येथील एका तरुणाला काही एक कारण नसतांना डोक्यात दगड मारुन जखमी केल्याची घटना घडली. आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मास्टर कॉलनी परिसरात मोहम्मद जावेद शेख सादीक (वय २१) हा तरुण राहतो. मजुरी करुन तो उदरनिर्वाह भागवितो. मंगळवारी तो त्याच्या घरासमोर उभा असतांना काही एक कारण नसतांना जावेद, सादीक मुलतानी व आदिल मुलतानी तिघे रा. मास्टर कॉलनी यांनी मोहम्मद जावेद शेख यास शिवीगाळ करत दमदाटी केली. तिघांपैकी जावेद याने मोहम्मद जावेद शेख यास डोक्यात दगड मारुन दुखापत केली. अशा मोहम्मद जावेद शेख सादीक याच्या तक्रारीवरुन एमआयडीसी…
मुंबई, वृत्तसंस्था । जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना व घरगुती नळ जोडणीची कामे कालमर्यादेत पूर्ण करावी असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.राज्यातील जलजीवन मिशन अंमलबजावणीचा आढावा मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जलजीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक पुनर्जोडणीची कामे मार्च २०२२ अखेरपर्यंत तसेच नवीन योजनांची कार्यवाही ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कालबध्द कार्यक्रम आखावा व यावर्षीचे निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे.सर्व मुख्य अभियंत्यांनी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही यंत्रणांच्या नियमित बैठका घेवून कामांची प्रगती राखावी असे निर्देशही मंत्री श्री. पाटील यांनी दिले. जलजीवन मिशन अंतर्गत घरगुती…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील कांचन नगरात राहणाऱ्या तरुणाने गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्याला आज दुपारच्या सुमारास अटक करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी बनावटीचे पिस्तूल घेवून फिरणाऱ्या तरूणाला पोलीसांनी पाठलाग करून वाल्मिक नगरातून दुपारी अटक केली आहे. त्याच्याकडील गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनीपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेली माहिती अशी की, राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंखे (वय-२६) रा. कांचन नगर हा तरूण वाल्मिक नगरातील बगीचाच्या परिसरात गावठी बनवटीचे पिस्तूल घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय गोपनिय माहिती मिळाली. शनीपेठ पोलीस…
चाळीसगाव, प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील राहणारा १७ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्तळी जाऊन पंचनामा तयार करण्यात आला. तालुक्यातील बोढरे येथील १७ वर्षीय तरूणाचा विहीरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दुपारी समोर आली असून पंचनामा करण्यात आला. अनिल शिवाजी राठोड (वय-१७, रा. बोढरे) या तरूणाचा शिवारातील एकाच्या विहीरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार रोजी दुपारी उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यात आला. अनिल राठोड याच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान,…
जळगाव, प्रतिनिधी । शहरात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची जिल्हास्तरीय बैठक पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांच्या अध्यक्षस्थानी आयोजित करण्यात आली होती. बैठकीत येत्या २२ ऑक्टोंबर रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा जळगाव जिल्हा दौरा असून त्या अनुषंगाने तसेच पक्षात सभासद मोहीम गाव तिथे शाखा, जिल्हा बॅक निवडणूकीत आरपीआयला अनुसूचित जाति जनजातिमधून जागा द्यावी विषयी चर्चा करण्यात आली. आरपीआय आठवले गट हा भाजपाचा मित्र पक्ष असल्याने भाजपकडे जिल्हा बँक निवडणुकीत अनुसूचित जाति जनजातीसाठी राखीव असणारी जागा द्यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांनी…
जळगाव, प्रतिनिधी । उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेत्तर संवर्गातील चारचाकी वाहनांची नवीन नोंदणी एमएच-19/डीव्ही-0001 ते 9999 पर्यंतची मालिका 23 सप्टेंबर, 2021 पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी 15 सप्टेंबर, 2021 पासून अर्ज सादर करावेत. अर्ज दुपारी चार वाजेपर्यंत स्वीकारले जातील. या अर्जासोबत शासकीय शुल्काचा धनादेश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे द्यावा. विहीत शुल्काच्या रकमेचा भरणा मालिका सुरु झाल्यावर करुन आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्र तात्काळ सादर करणे अनिवार्य राहील. ही मालिका चालू असतांना वाहन-4 प्रणाली कार्यान्वीत झाल्यानंतर बंद…
जळगाव, प्रतिनिधी । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. शुक्रवार, दि. 17 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे अभ्यांगत व कार्यकर्त्यांच्या भेटी व चर्चा. सकाळी 10.30 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून पंचायत समिती कार्यालय, धरणगावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता. पंचायत समिती, धरणगाव येथे आगमन व पंचायत समिती कार्यालय धरणगाव येथे शासकीय योजनांची आढावा बैठक. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 3.45 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. दुपारी 4.00 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व…
जळगाव, प्रतिनिधी । देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा जळगाव जिल्हा व महानगरतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत भव्य कोरोना लसीकरण शिबिर सरदार वल्लभभाई पटेल हॉल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटसमोर नागरिकांसाठी भव्य कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात येणार आहे, असे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे, महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी सांगितले. लसीकरणाचा लाभ सर्व सामान्य लोकांनी जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेज भाजपा महानगरातील मंडल अध्यक्ष, नगसेवक, आघाडीचे अध्यक्ष, व कार्यकर्ते यांनी आपआपल्या, मंडलातील, प्रभागातील नागरिकांना भव्य लसीकरणाचा लाभ मिळुन द्यावा असेही सुचित केले आहे.…