Author: saimat team

मुंबई, वृत्तसंस्था । पावसाळ्यामुळे ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये महाजेनकोच्या वीज निर्मिती केंद्रामध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने त्वरीत योग्य प्रमाणात कोळसा उपलब्ध होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज महाजेनकोला दिलेत.केंद्र सरकारच्या वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडसह अन्य कोळसा कंपन्यांकडून ठरल्याप्रमाणे कोळसा मिळत नसल्याने निर्माण झालेल्या टंचाईवर मात करण्यासाठी वेकोलीकडे नियमित कोळसा पुरवठ्यासाठी पाठपुरावा करा, असे निर्देशही डॉ. राऊत यांनी दिले. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडकडून ठरल्याप्रमाणे कोळसा पुरवठा होत नसल्याने थेट बैठकीतूनच डॉ. राऊत यांनी केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांना दूरध्वनी करून नियमित व योग्य प्रमाणात कोळसा पुरविण्याची विनंती केली. तसेच वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या राज्यातील खाणीतला कोळसा इतर राज्याच्या…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । शिवसेनेला भवितव्य उज्वल करायचं असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहण्यातं त्यांचं नुकसान आहे. अडीच वर्षांचा जो फॉर्म्यूला आहे त्यावर एकमत करुन भाजपा-सेनेने एकत्र यावं आणि राज्याच्या विकासाला प्रगती द्यावी. केंद्राकडून जास्तीत जास्त निधी मिळवत मुंबई आणि राज्याचा विकास करावा. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला पाहिजे. ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याआधी त्यांनी भाजपासोबत आलं पाहिजे असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. ते मुंबईत अभिनेत्री पायल घोष यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या प्रकृती ची चौकशी करण्यासाठी भेट घेतल्यानंतर अंधेरी येथे प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. “तिन्ही पक्षांत धुसफुस सुरु असून सातत्याने एकमेकांवर आरोप…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । समस्त गुजराल उड्डाणपुलाला संत नामदेव महाराजांचे नाव द्या, शिंपी समाज जळगाव शहर, शिंपी समाज हितवर्धक संस्था पिंप्राळा, शिंपी समाज दादावाडी परिसर शाखा व जळगाव शहरातील सहयोगी समाजातर्फे निवेदन महापौर जयश्री महाजन यांना देण्यात आले. गुजराल पेट्रोल पंप येथील नव्याने होत असलेल्या उड्डाणपुलाला वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या नाव दयावे, असे निवेदन आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता महापालिकेत महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांना समस्त समाज शिंपी समाज बांधवांच्यावतीने निवेदन जळगाव शहर शिंपी समाज अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपाध्यक्ष विवेक सचिव, चंद्रकांत जगताप, प्रिंपाळा शिंपी उपाध्यक्ष रूषिकेश कापुरे, समाज बाधंव जिल्हाध्यक्ष…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । अलीकडच्या काळात अनंत गीते यांची अवस्था राजकीयदृष्टया ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशापध्दतीची झाल्यामुळेच वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी वक्तव्य केल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. अनंत गीते बोलल्याने काही फरक पडत नाही परंतु सुर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत. आघाडीचे जनक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वच्छपणाने राज्याचे काम करत आहेत. कोविडसारख्या महामारीचा मुकाबला महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करतोय याची प्रशंसा होत असताना अडगळीत पडलेल्या नेत्यांना या सार्‍या कृतीचं भान राहिलेलं नाही असाही टोला सुनिल तटकरे यांनी यावेळी लगावला आहे. राष्ट्रवादी पक्ष…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व स्टुडंट फॉर डेव्हलपमेंट (SFD) तर्फे गणेश घाट मेहरुन तलाव येथे निर्माल्य संकलन व 508 गणपती संकलन व विसर्जन करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व स्टूडेंट फॉर डेव्हलपमेंट या आयामा मध्ये जल,जमीन,जंगल त्यांच्या संरक्षणासाठी स्टूडेंट फॉर डेव्हलपमेंट या आयामा अंतर्गत मोठ्या प्रमाणात पर्यावरण संरक्षण संबंधित कार्य चालू असते. पर्यावरण संरक्षणाचे धडे दिले जातात.त्याच अनुषंगाने आनंत गणेश चतुर्थी च्या निमित्याने 508 गणपतीचे संकलन व विसर्जन करण्यात आले. तसेच 4 तास निर्माल्य संकलन दरम्यान तीन ट्रॅक्टर ट्रॉली शहरात व गणेश घाट या ठिकाणी निर्माल्य संकलन केले. यावेळी महानगर मंत्री रितेश महाजन , नगर मंत्री…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । निर्यात क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंबई येथील जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) येथे आजपासून राज्यस्तरीय ‘वाणिज्य उत्सव’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन आज मंगळवार, दि. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उद्योग राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे उपस्थित राहणार आहेत. “आजादी का अमृत महोत्सव”- 75 व्या स्वातंत्रदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत दि.20.09.2021 ते 26.09.2021 या दरम्यान “वाणिज्य सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । मुंबईत विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेली विकास आणि पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. ना. ठाकरे यांच्या हस्ते आज वरळी परिसरातील नेहरू सायंस सेंटर जंक्शन, फिनिक्स मुंबई माईल फ्लायओव्हरखालील जागा, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, सायानी रोड, गोखले रोड, एनी बेझंट रोड वरील सौंदर्यीकरण आणि फुटपाथच्या कामांचे तसेच सर पोचखानवाला रोड व खान अब्दुल गफार खान रोडला जोडणाऱ्या पायवाटेच्या (हिलटॉप लेन) सौंदर्यीकरण व नूतनीकरणाच्या कामांचे भूमिपूजन झाले. या कामांना आजपासूनच सुरूवात होत आहे. यावेळी नगरसेवक स्नेहल अंबेकर, समाधान सरवणकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनिल…

Read More

जळगाव प्रतिनिधी । ३० वर्षीय विवाहितेशी किरकोळ कारणावरून छळ करणाऱ्या पतीसह चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील तांबापुरा येथील सुमैय्या परवीन अकबर शेख (वय-३०) यांचा विवाह २८ नोव्हेंबर २००८ रोजी चोपडा येथील अकबर शेख अहमद यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. त्यांना लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगली वागणूक दिली. त्यानंतर पती अकबर शेख अहमद हा दारू पिऊन घरी येऊन मारहाण करून शिवीगाळ करू लागला. तसेच सासु ह्या मुलगा अकबर शेख याला बरे वाईट सांगून विवाहितेला मारहाण करायला सांगायचे तसेच घरातून निघून जा असे सांगत होते. त्याचप्रमाणे दोन्ही ननंदा यांनी विवाहितेला रंगा रूपावरून हिनवू लागले. या छळाला कंटाळून विवाहिता…

Read More

जळगाव प्रतिनिधी । पैशांसाठी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील कांचननगरातील उज्ज्वल चौकातील छाया यांचा वरणगाव येथील धनराज सोपान कोळी यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर पतीसह सासरच्यांनी विवाहिता छाया हिच्याकडे माहेरून तीन लाख रुपये आणावेत अशी मागणी केली. याच कारणावरून वेळोवेळी सासरच्यांनी तिला चापटा बुक्क्यांनी मारहाण करत शारीरिक तसेच मानसिक छळ केला. तसेच आमच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली तर तुला तसेच तुझ्या आईवडिलांना जिवे ठार मारण्याची धमकीही छाया हिस सासरच्यांनी दिली. छळ असह्य झाल्याने छाया कोळी या कांचननगरातील माहेरी आल्या.…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सर्वच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. काही भागात महापालिकेने खडडे बुजविले मात्र अनेक रस्त्यावर अजूनही खड्डे आहेत. खड्डयामुळे वाहनाधारकांना विविध व्याधी जडल्या आहेत. यामुळे काही ठिकाणचे रस्ते बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशन व युवक बिरादरी तर्फे बुजविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ 22 सप्टेंबरला सकाळी दहाला होणार असल्याची माहिती बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.सुधा काबरा यांनी दिली. शहरातील काव्य रत्नावली चौक ते आकाशवाणी चौक, शिरसोली नाका ते काव्य रत्नावली चौक, शिवकॉलनी परिसरातील रस्ते, आशा बाबा नगर, हरिविठ्ठल नगर, खंडेराव नगर या परिसरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत. बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशन नेहमी…

Read More