Author: saimat team

जळगाव प्रतिनिधी | शहरातून तब्बल आठ महिलांच्या सोनसाखळ्या चोरणार्‍यांच्या मुसक्या जिल्हापेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने आवळल्याची माहिती आज जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन दोन सोनसाखळी चोरांना अटक केल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्हापेठ पोलिस स्थानकाच्या हद्दीत एका महिलेस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिची सोनसाखळी लांबविल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास जिल्हापेठ पोलिसांनी केला असता त्यांना नाशिकमधील दोन चोरट्यांनी हे कृत्य केल्याची माहिती मिळाली. या अनुषंगाने जिल्हापेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने याची कसून चौकशी करून संदीप सोनवणे आणि सतीश चौधरी या दोघा चोरट्यांना शिताफीने अटक…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी । कॉलेजचे काम आटोपून स्कुटीने चाळीसगावकडे येत असताना मालेगाव कडून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने चालक जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, कॉलेजचे काम आटोपून तिघे जण स्कुटीने चाळीसगावकडे येत असताना अचानक मालेगाव कडून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात स्कुटी (क्र. एम. एच. ०५ ईई ४०९८ ) वरील चालक अविनाश विष्णू मोरे (वय-२०) रा. गोविंद नगर कल्याण जि. ठाणे याचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेले मयुर यशवंत मांडवे रा. कल्याण जि. ठाणे व केतन कैलास चव्हाण रा. खडकी ब्रु. ता. चाळीसगाव…

Read More

मुंबई : प्रतिनिधी वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि MMRDAचे अधिकारी मिळून चौकशी करतील, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. या घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. ही बातमी पण वाचा :   बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा भाग कोसळला; १३ जण जखमी आज पहाटे ४च्या सुमारास वांद्रे कुर्ला संकुल आणि जेव्हीएलआर यांना जोडणारा निर्माणाधिन पुलाचा गर्डर अचानक एका बाजूला कलंडल्याने त्यात १४ कामगार जखमी झाले. सुदैवाने या दुघटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनास्थळाला आज…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । महापालिका हद्दीतील सावखेडा शिवारातील गिरणापंपींग स्टेशन व निमखेडी शिवार गिरणा नदीपात्रात श्री गणेश विसर्जन करू नये असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.सावखेडा शिवारातील गिरणापंपींग स्टेशन व निमखेडी शिवार गिरणा नदीपात्र येथे धोकादायक परिस्थीती निर्माण झलेली आहे. याकरीता मागील ४ -५ वर्षा पासून या ठिकाणी श्री गणपती विसर्जनास प्रशासनाकडुन बंदी घालण्यात आलेली आहे. आज देखील या दोन्ही भागात तशीच धोकादायक परिस्थिती असल्याने यावर्षी सुध्दा या ठिकाणी श्रीगणेश विसर्जनास बंदी कायम ठेवण्यात आली आहे. तरी या दोन्ही ठिकाणी कोठलेही सार्वजनिक गणेश मंडळाचे, घरगुती श्री.गणपती विसर्जन करु नये असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Read More

जळगाव प्रतिनिधी । एकाने काहीही कारण नसतांना तरुणाला मारहाण केल्याची घटना १६ रोजी सकाळच्या सुमारास घडली, याप्रकरणी त्या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात बिस्मिल्ला चौकात शेख सादिक शेख सलीम (वय-३४) हे वास्तव्यास आहेत. मिस्तरी काम करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवतात. गुरुवारी सकाळी ते त्यांच्या घरासमोर उभे असताना टिपू ऊर्फ भैय्या शेख सलीम रा. बिस्मिल्ला चौक याने काहीही कारण नसताना शेख सादिक यांना काठीने हातावर तसेच पाठीवर मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी शेख सादिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण हे करीत आहेत.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज सकाळपासून जळगाव शहरात लेवा भवन येथे मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. जळगाव भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, महिला आघाडी प्रमुख दिप्ती चिरमाडे, डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ धर्मेंद्र पाटील यांच्यासह आदी उपस्थीत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७१ वा वाढदिवस आहे. जळगाव भारतीय जनता पाटील आणि जळगाव महापालिकेच्या वतीने शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात नागरीकांच्या सोईसाठी आज…

Read More

रावेर प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवत २० वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील पाल येथे घडली. याप्रकरणी त्या तरुणाविरुद्ध रावेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० वर्षीय तरूणीमध्यप्रदेशातील एका गावात राहणारी आहे. तालुक्यातील पाल येथील गुलाम रसुल नवाज तडवी (वय-२५) याची ओळख नाशिक येथे मजूरीसाठी आले असता त्यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर एकमेकांशी मोबाईलवर संपर्क झाला. तीन महिन्यापुर्वी गुलाम तडवी याने पिडीत मुलीला ०२ जून २०२१ रोजी भेटण्यासाठी बोलाविले. त्यानुसार मुलगी रावेर येथे भेटण्यासाठी आली. गुलाम तडवी याने मुलीला दुचाकीवर बसवून पाल येथील त्याच्या घरी घेवून गेला. तेथे लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. ही गोष्ट घरच्यांना सांगितली…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । श्रींची विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नये. विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग व महापालिका, पोलिस प्रशासन यांच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । एका तरुणाने १४ वर्षीय मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. यामध्ये ती मुलगी गर्भवती झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संशयित तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुभाष पवार (वय २८) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना मे-जून २०२१ दरम्यान जळगाव तालुक्यात घडली आहे. दीपक याच्या नात्यात असलेल्या १४ वर्षीय मुलीच्या घरी कोणी नसताना त्याने घरात प्रवेश केला. यानंतर मुलीच्या तोंडाला रुमाल लावून तिचे हातपाय साडीने बांधले. त्यानंतर मुलीवर अत्याचार केले. ही बाब कोणास सांगितली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीने कोणाला काहीच सांगितले नाही.…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना बुधवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लाॅरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात जिल्ह्यातील जळगाव खुर्द येथील उपकेंद्रातील परिचारिका प्रेमलता संजय पाटील यांचाही समावेश आहे. १२ मे रोजी फ्लाॅरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिन हा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. कोरोना महामारीची साथ मागील वर्षापासून सुरू असल्यामुळे यावर्षी १२ मे रोजी हा कार्यक्रम होऊ शकला नाही. बुधवारी दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून वर्ष २०२०चे राष्ट्रीय फ्लाॅरेन्स नाइटिंगेल पुरस्कार वितरण सोहळा झाला. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या उपस्थित होत्या.…

Read More