Author: saimat team

मुंबई, वृत्तसंस्था । नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे या मार्गावरील रस्ते निकृष्ठ असल्यामुळे जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यांच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी तात्काळ रस्त्यांची काम पूर्ण करावेत टोल नाका परिसरातील रस्त्यांची कामे विहित वेळेत पूर्ण केले नाही तर संबधित यंत्रणेवर कारवाई करण्याचे निर्देश अन्न,नागरी पुरवठा,ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोलप्लाझा या रस्त्याची दुरावस्था,वाहतुकीची कोंडीच्या उपाययोजनांबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीला…

Read More

नवी मुंबई, वृत्तसंस्था । लहरी पावसामुळे घटलेले उत्पादन, इंधन दरवाढ आणि आता पितृपक्ष पंधरवड्यामुळे मागणीत झालेली वाढ यामुळे भाज्या कडाडल्या आहेत. कांदा-बटाटा आणि कोबी वगळता बहुतांश सर्व भाज्यांचे दर तेजीत आहेत. काही दिवसांपूर्वी मागणीच्या तुलनेत घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत होती. त्यामुळे सर्व प्रकारच्या भाज्यांचे दर घटले होते. शेतक ऱ्यांनी मिळेल त्या दरात भाज्यांची विक्री केली. घाऊक बाजारांमध्ये कवडीमोल दर मिळाल्याने टोमॅटो, ढोबळी मिरची शेतक ऱ्यांनी फेकून दिली. मध्यंतरी पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे भाजीपाला लागवडीवर लक्षणीय परिणाम झाला. पुरेशी लागवड न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक कमी होत आहे, असे किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले. काही…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सहकार क्षेत्रात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सहकार सेल सुरू केले असून जळगाव जिल्हा राष्ट्रवादी सेल ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी वाल्मीक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी सहकार विभागाची निर्मिती झाली अाहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे काम महाराष्ट्रभर सुरू झाले आहे. सहकार क्षेत्रातल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी सहकार विभाग कार्यान्वित झाला अाहे. या विभागाकडे शरद पवार लक्ष ठेवून आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात सहकार क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तींना जिल्हाध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे माजी संचालक तसेच नियोजन मंडळाचे सदस्य…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील खड्डेमय रस्त्यांची अवस्था जळगावकरांसाठी खूप तापदायक ठरत आहे. महापालिका प्रशासन याकडे डाेळेझाक करीत असल्याने हा प्रश्न अवघड झाला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशन व युवक बिरादरीने पुढाकार घेऊन शहरातील खड्डे बुजवण्याची माेहीम हाती घेतली आहे. बुधवारपासून या माेहिमेला सुरुवात होणार असल्याची माहिती बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा काबरा यांनी दिली. शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तरी देखील मनपाने ठाेस असे कार्य सुरू केलेले नाही. काही भागात मनपाने खड्डे बुजवले मात्र अनेक रस्त्यांवर अजूनही खड्डे आहेत. खड्ड्यांमुळे वाहनाधारकांना विविध व्याधी जडल्या आहेत. काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौक, शिरसोली नाका ते काव्यरत्नावली चौक, शिव कॉलनी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने गाळेधारकांकडील थकबाकी वसुलीला पुन्हा सुरुवात केली अाहे. मंगळवारी उपायुक्त प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वात दुपारी दाेन तासात ३० लाख रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच जप्त केलेल्या गाळ्यांमधील साहित्याचा लिलाव करण्यासाठी साहित्याची यादी तयार करण्यात येत अाहे. महापालिकेने गेल्या पंधरा दिवसांपासून थांबवलेली थकबाकीदारांविरुद्ध माेहीम पुन्हा सुरू केली अाहे. पालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मार्केट असलेल्या सेंट्रल फुले मार्केटमध्ये पालिकेच्या पथकाने दुपारी ३ ते ५ या वेळेत थकबाकीदारांची भेट घेतली. या वेळी बहुसंख्य गाळेधारकांनी धनादेश सुपुर्द करत तीस लाखांचा भरणा केला.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । रिक्षाचालक, मालकांनी बुधवारपासून व्यवसाय करीत असताना गणवेश, कागदपत्र साेबत ठेवावे अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, अशा सूचना वाहतूक शाखेने दिल्या आहेत. शहरात अनेक रिक्षाचालक भाडेतत्त्वावर रिक्षा घेऊन व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मूळ कागदपत्र नसतात. गणवेश परिधान करीत नाहीत. नेमून दिलेल्या स्टॉपवर रिक्षा उभी करीत नाहीत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात असे निदर्शनास आल्यामुळे वाहतूक शाखेने सूचना जारी केल्या आहेत. बुधवारपासून नियम मोडणाऱ्या रिक्षाचालक, मालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे वाहतूक शाखेतर्फे कळवण्यात आले आहे.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । सार्वजनिक बांधकाम विभागाकडील २० किलाेमीटर अंतराचे प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्गावरील अतिक्रमण हटाव माेहिमेला मंगळवारी सुरुवात झाली. कानळदा राेडवरील अतिक्रमण काढल्यानंतर इच्छादेवी ते शिरसाेली नाक्यादरम्यान अभियान राबवण्यात अाले. अनेक वर्षापासून पक्के अतिक्रमण असलेल्या रहिवाशांना बुधवारी सकाळी ११ वाजेचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. अन्यथा जेसीबीने सरसकट ताेडण्याचा इशारा देण्यात आला. गेल्या महिनाभरापासून शहरातून जाणाऱ्या २० किमी लांबीचा प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्ग असलेल्या सहा रस्त्यांच्या विकासावर अधिक भर दिला जात आहे. या रस्त्यांची कायदेशीर हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरच पार पाडली जाणार आहे. तत्पूर्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचीच असल्याने दिवाळीपूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मंगळवार 21 सप्टेबरच्या सायंकाळी साडेपाच वाजेपासून वाघूर धरणातून पुर्वीचा 340 क्युसेक व वाढीव 340 क्युसेक्स असा एकुण 680 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जाणार आहे. वाघुर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून सावधानता बाळगण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी केले आहे. नदीपात्रामध्ये कोणीही गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असेही कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळवले आहे.

Read More

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरातून १ बाधित रूग्ण आढळून आला असून तर १ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरातून अमळनेर तालुक्यातून एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर एक रूग्ण दिवसभरातून बरा होवून घरी परतला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ७३५ रूग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १५० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १० रूग्ण उपचार घेत आहे. तर २ हजार ५७५ रूग्णांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी सायंकाळी दिलेल्या प्रसिध्दीपत्रान्वये कळविले…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET परीक्षेचे आयोजन केले जाते. परंतु या परिक्षेत दिवसेंदिवस वाढणारे गैरप्रकार पाहता NEET परीक्षा व्यापम घोटाळ्याचा पुढचा अंक आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पेपर फोडून, डमी विद्यार्थी बसवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असून गरीब, मध्यमवर्गीय मुला-मुलींनी डॉक्टर होऊ नये म्हणून NEET चा वापर सुरु आहे का? असा संतप्त सवाल करून महाराष्ट्र सरकारनेही तामिळनाडूप्रमाणे ‘नीट’बाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना पटोले पुढे म्हणाले की,देशभरातून १६ लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देतात पण त्यातील गैरव्यवहार वाढले आहेत, पेपर लिक…

Read More