मुंबई, वृत्तसंस्था । मुंबईच्या धारावी परिसरात राहणारा दहशतवादी जान मोहम्मद अली शेख याच्या अटकेवरून राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं एकूण ६ जणांना उत्तर भारतात विविध ठिकाणांहून अटक केली असून त्यात जान मोहम्मदचा देखील समावेश आहे. जान मोहम्मद धारावीत राहत असूनही राज्यातील तपास यंत्रणांना त्याची माहिती नव्हती का? असा सवाल करत विरोधकांनी टीका केली असताना आज पहाटे महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच पथकासोबत केलेल्या या कारवाईत मुंबईच्या जोगेश्वरी भागातून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात एटीएसला यश आलं आहे. या संशयित दहशतवाद्याचं नाव झाकिर असल्याचं सांगितलं जात आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र…
Author: saimat team
पुणे, वृत्तसंस्था । ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. टी. पद्मनाभन (६४) यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. प्रा. पद्मनाभन हे पुण्यातील आयुका या संस्थेत मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर), केंब्रिज येथील खगोलशास्त्र संस्था व पुण्यातील आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र व खगोल भौतिकशास्त्र केंद्र (आयुका) या संस्थांमधून त्यांनी चार दशकांहून अधिक काळ संशोधन केले. गुरुत्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र, खगोल भौतिकशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. या विषयांमधील मूलभूत योगदानासाठी जगभर ते ओळखले जात. भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र विषयांतील त्यांचे सुमारे ३०० रिसर्च पेपर नामांकित जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले होते. पद्मनाभन यांनी लिहिलेल्या क्रमिक आणि तांत्रिक पुस्तकांचा समावेश जगभरातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये झाला…
पुणे : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासोबत त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आकुर्डी येथील डी.वाय.पाटील ज्ञानशांती शाळेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री तथा डॉ.डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष सतेज पाटील, अध्यक्ष संजय पाटील, आमदार ऋतूराज पाटील, डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.प्रभात रंजन, डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त तेजस पाटील, संकुल संचालक डॉ.नीरज व्यवहारे, ज्ञानशांती शाळेच्या मुख्याध्यापिका गीता पिल्ले आदी उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले, समाजातील सर्व घटकांना प्रशिक्षण मिळावे यासाठी डॉ. डी. वाय. पाटील यांनी शैक्षणिक संस्थांची उभारणी केली. त्यांचा हाच…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतात पाणी साचले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी हरताळा सरपंच दिपक कोळी, उपसरपंच नामदेवराव भड, बोदवड उपनगराध्यक्ष दिनेश माळी, गटनेते कैलास चौधरी, नगरसेवक दिपक झांबड, गोपाळ गंगतिरे, रवींद्र खेवलकर, प्रदिप बडगुजर, भरत पाटील, मुकेश क-हाळे, भगतसिंग पाटील, शंकर चिखलकर, हमीदपठाण, महेश शेळके उपस्थित होते. जळगाव जिल्हयात गेल्या महिन्या भरापासून मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे पिके पिवळी पडली असून त्यांची मुळे सडत आहेत. उडीद मुग ,सोयाबीनला कोंब…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनची जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांना भेडसावणाऱ्या अडचणीबाबत चर्चा करण्यात येथून असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास गोरे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. श्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात आयोजित जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, प्रदेश कार्याध्यक्ष तथा जि.प. रत्नागिरी उपाध्यक्ष उदय बने, राज्य संघटक संजू वाडे, राज्य उपाध्यक्ष जय मंगल जाधव, उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष तथा जि. प. सदस्य डॉ. नीलम पाटील, असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या नऊ रस्त्यांवरील अतिक्रमण काढून सदरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी तातडीने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे. जेणेकरुन पुढील कार्यवाही करणे होईल असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिले. जळगाव शहर महानगरपालिकेला प्रदान केलेल्या 61 कोटी रुपयांच्या कामांची सद्यस्थिती आणि उर्वरित कामांच्या नियोजनाबरोबरच शहरवासियांना चांगल्या सुविधा देण्याबाबत येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महापौर जयश्रीताई महाजन, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, उपमहापौर कुलभूषण पाटील, अधिक्षक अभियंता रुपा गाजरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चंद्रकांत सिन्हा, वीज वितरण…
अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील चौबारी येथे किराणा दुकान फोडून दुकानातील रोकडसह किराणा सामान असा एकुण ६० हजार रुपये किमतीचे रोकड आणि किराणा माल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, संजय भागचंद जैन (वय-४०) रा. चौबारी ता. अमळनेर यांचे संजय प्रोव्हीजन नावाचे किराणा दुकान आहे. १५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता जैन यांनी किराणा दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकान फोडून दुकानातील ३५ हजार रुपयांची रोकड आणि किराणा सामान असा एकूण ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे १६ सप्टेंबर रोजी सकाळी…
यावल प्रतिनिधी । कोळन्हावी शिवारातून वाळूच्या साठ्यातून अज्ञात चोरट्यांनी वाळू चोरून नेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गावातील पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील कोळन्हावी शिवारात २७ ऑगस्ट २०२१ सकाळी ६ ते १५ सप्टेंबर २०२१ सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी वाळूच्या साठ्यातून वेळोवेळी वाळूची चोरी केल्याची उघडकीला आले आहे. याप्रकरणी पोलीस पाटील कैलास सोळंके यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजिज शेख हे करीत आहे.
जळगाव प्रतिनिधी । टाटा फायनान्स लिमिटेड कंपनीत नोकरी देण्यासह कंपनीकडुन कर्ज देण्याचे आमिष दाखवत पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील तरूणासह इतरांची ५ लाख २३ हजार ८१० रुपयांत फसवणुक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवार १६ सप्टेंबर रोजी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पिंपळगाव हरेश्वर येथे गोविंदपुरा येथे जीवन कैलास बोढरे वय २७ हा तरुण राहतो. त्याचे सलूनचे दुकान असून त्यावर उदरनिर्वाह भागवतो. १५ ते १६ सप्टेंबर दरम्यान जीवन यास वेगवेगळ्या नावाने अज्ञात इसमांनी संपर्क साधला. टाटा फायनान्स लिमीटेड या कंपनीतून बोलत असून बनावट कागदपत्रांच्या आधारे जीवन याचा संबंधितांनी विश्वास संपादन केला. त्यानंतर जीवन यास कंपनीत नोकरी…
नागपूर । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. देशमुख यांच्या नागपूर, मुंबई, तसंच त्यांच्या मालकीच्या कॉलेजवर आयकर विभागाने छापे ठाकले. नागपुरातील निवासस्थान, नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील निवासस्थान, मुंबईतील ज्ञानेश्वरी निवासस्थान, NIT कॉलेजवर आयकर विभागाने छापा टाकून झाडाझडती केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना…