जळगाव, प्रतिनिधी । बदलापूरच्या प्रसिद्ध आर्ट गॅलरीमध्ये मान्यवर कलावंतांच्या सोबतीला जळगावच्या कलावंतांनी साकारलेल्या कलाकृती भाविकांना पाहता येत आहेत. जलरंग, ड्राय पेस्टल, अॅक्रलिक अशा विविध माध्यमांतून गॅलरीमध्ये १२२ च्यावर गणेशाच्या कलाकृती अवतरल्या आहेत. यामध्ये वैविध्यपूर्ण, कलात्मक आणि कल्पक अशा पाच जळगावकरांच्या कलाकृतींचाही समावेश आहे. गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या प्रदर्शनात महाराष्ट्रातील अनेक दिवंगत, ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश करण्यात आल्याचे गॅलरीचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी सांगितले. कोल्हापूर येथील आबालाल रहेमान यांनी साकारलेले गणपतीचे चित्र ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्याकडून गॅलरीसाठी उपलब्ध झाले, ते चित्र या प्रदर्शनात आहे. तसेच बद्रीनारायण, संभाजी कदम, ग. ना. जाधव यासारख्या दिवंगत चित्रकारांनी रेखाटलेली सुबक चित्रे…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । रामनगरात शुक्रवारी रात्री ११.१५ वाजता घरासमोर लावलेला स्पीकर बंद करण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये दगडफेक व हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच युवतीचा विनयभंग करण्यात आला आहे. रामनगरात शुक्रवारी गणपती उत्सवानिमित्त भंडारा आयोजित करण्यात आला होता. मनकर्णा शिंदे यांच्या दुकानात गणपती प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. शुक्रवारी त्यांच्या ओळखीचे काही नागरिक आरती करण्यासाठी आले होते. या वेळी स्पीकरवर गाणे लावण्यात आलेले होते. बराच उशीर झाल्याने सौदागर खामकर यांनी स्पीकर बंद केला. तेव्हा रात्री ११.१५ वाजता रामनगरातील दुसऱ्या गल्लीतील कल्पनाबाई पाटील, शरद उर्फ आबा पाटील, सुरेखाबाई सोनवणे, ममताबाई टांेगळे (रा. रामनगर), विशाल पाटील, बायजाबाई…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव व केंद्र शासनाच्या अमृत हरीत क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील रायसोनीनगरात उभारण्यात आलेल्या स्व.अटलजी बिहारी वाजपेयी उपवन उद्यान लोकार्पण सोहळा शुक्रवार,दि. 17 सप्टेंबर 2021 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पार पडला. पालकमंत्री तथा स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री मा.ना.श्री.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. साधारणपणे 1100 चौ.मी. जागेत उभारण्यात आलेल्या या उपवन उद्यानात चिमण्या, कबुतर, कावळे आदी पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढावी, यासाठी वृक्षलागवड करण्यात आलेली असून, लॉन, जॉगिंग ट्रॅकचीही या ठिकाणी सुविधा आहे. त्यामुळे हा उद्यान परिसर अतिशय निसर्गरम्य बनला असून, ऑक्सिजननिर्मितीसाठी पोषक ठरणार आहे. प्रभाग क्र. 13 च्या नगरसेविका सौ.ज्योती चव्हाण व…
रावेर, प्रतिनिधी । शहरात नगर पालिकेच्या हद्दीत मर्कज मशिदीजवळ सुरू असलेले काँक्रिटीकरण व गटार बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे हाेत असून ही कामे त्वरित थांबवण्यात येऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मेहमूद शेख यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने निधी वाया जाण्याची शक्यता आहे. मर्कज मशिदीजवळ काँक्रिटीकरण करताना बांधकामाच्या नियमांना डावलून ठेकेदार जमिनीवर खडी पसरवून त्यावर केवळ काँक्रीट टाकत आहे. याबाबत ठेकेदाराला जाब विचारला असता तुम्हाला जे करायचे ते करा, हे काम असेच होईल, असे उत्तर दिले जात आहे. तर मदिना कॉलनीतील गटारीचे बांधकाम व काँक्रिटीकरणाचे कामही याच पद्धतीने पूर्ण केले आहे. ईदगाह…
भुसावळ, प्रतिनिधी । तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचा एक नवीन रुग्ण आढळला. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या चारवरुन पाचवर पोहोचली आहे. दरम्यान, विभागातील यावल, रावेर, मुक्ताईनगर व बोदवड या चार तालुक्यात मात्र एकही नवीन रुग्ण न आढळल्याने दिलासा मिळाला. शहरात बाजारपेठेसह गर्दीच्या ठिकाणी नियमांचे पालन हाेत नसल्याने पुन्हा काेराेना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली अाहे. त्याची अाता दखल न घेतल्यास रुग्णसंख्या बेसुमार वाढण्याचा धाेका अाहे. नगर पालिका, पाेलिस दलातर्फे नागरिकांना काेराेना प्रतिबंधासाठी शासनाने केलेल्या नियमांचा विसर पडला असून त्यांना जाणीव करून देणे गरजेचे अाहे.
जळगाव, प्रतिनिधी । खान्देश बारी समाज आयोजित ११ वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी विवाह इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. राज्यस्तरीय बारी समाजाचा उपवर वधू-वर परिचय मेळावा शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सुचनेनुसार व आदेशानुसार होणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने बारी समाज उपवर वधू-वर सूची-२०२१ मान्यवरांचे हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी आपले फॉर्म मयुरेश टाईम्स् , आनंदा बारी (तेली चौक विठ्ठल पेठ जुने जळगाव), विजय बारी (बालाजी फोटो), अतुल डेअरी प्रिंप्राळा, भुषण बारी ह.वि नगर व समस्त बारी पंच मंडळ अथवा युवक मंडळांकडे दि.३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंतच जमा करावे असे आवाहन…
जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील सात वैद्यकीय अधिकार्यांच्या बदल्या झाल्या असून याचे आदेश आरोग्य खात्यातर्फे पारीत करण्यात आल्या आहे. आरोग्य विभागातर्फे महाराष्ट्रातील गट-अ या संवर्गातील २८० वैद्यकीय अधिकार्यांच्या बदलीचे आदेश काल पारित झाले. यात जळगाव जिल्ह्यातील सात अधिकार्यांचा समावेश आहे. सहा बदल्या या जिल्ह्यात तर एकच बदली ही जिल्ह्याबाहेर झाली आहे. यात येवती (ता. बोदवड) प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अजय सपकाळ यांची धामणगाव येथे, साकळी (ता. यावल) येथील डॉ. सागर पाटील यांची चोपडा उपजिल्हा रुग्णालयात, उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील डॉ. विशाल पाटील यांची जळगाव जिल्हा क्षयरोग केंद्र येथे, मुक्ताईनगर येथील डॉ. नीलेश पाटील यांची मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात, रावेर येथील डॉ. एन.…
जळगाव प्रतिनिधी | अखील भारतीय विद्यार्थी परिषदेची महानगर तसेच तीन नगर कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव छात्रनेता संमेलन कार्यक्रमामध्ये जळगाव महानगर व तिन्ही नगर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या निवडीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून अभाविप जळगाव विभाग प्रमुख प्रा.डॉ. मनीष जोशी यांनी काम पाहिले. नूतन कार्यकारिणीत जळगाव महानगराध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. अमरदीप पाटील, उपाध्यक्ष प्रा. गौरव खोडपे, महानगर मंत्री रितेश महाजन, महानगर सहमंत्री प्रज्वल पाटील, पौर्णिमा देशमुख, कवियत्री बहिणाबाई नगर अध्यक्ष प्रा. डॉ. मुझाईद हुसेन, उपाध्यक्ष प्रा. पवित्रा पाटील, नगर मंत्री आकाश पाटील, नगर सहमंत्री श्रद्धा सोनार, नितेश अग्रवाल, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर अध्यक्ष डॉ. प्रा.…
धुळे, प्रतिनिधी । येथील महापालिकेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व कायम राखले असून महापौरपदी ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप कर्पे यांची निवड झाली. जळगावची पुनरावृत्ती धुळ्यात करण्याचा विरोधकांचा दावा फोल ठरला. शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने ही निवड प्रक्रिया पार पडली. महापालिकेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता ऑनलाइन सभा झाली. जिल्हाधिकारी जलज शर्मा अध्यक्षस्थानी होते. सभेत सर्व ७३ नगरसेवक सहभागी झाले. महापौर पदाची निवड बिनविरोध होऊ नये यासाठी विरोधी पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी दाखल केली होती. या शिवाय एमआयएमनेही उमेदवारी अर्ज भरला होता. यात भाजपच्या प्रदीप कर्पे यांना सर्वच्या सर्व ५० नगरसेवकांनी मतदान केले. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या तथा काँग्रेसच्या नगरसेविका मदिना पिंजारी यांना केवळ १७…
जळगाव, प्रतिनिधी । कर्मचारी संघटनांच्या आक्रमक दबावानंतर कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांचा पदभार काढून घेतल्यानंतर दीड महिन्यातच त्यांच्याकडे हा पदभार पुन्हा सोपविण्यात आला आहे. शुक्रवारी प्रभारी कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी हा पदभार त्यांच्याकडे पुन्हा सुपूर्द केला. तत्कालीन प्रभारी कुलसचिव प्रा. ए. बी. चौधरी यांनी राजीनामा दिल्याने हा बदल करण्यात आला आहे. डॉ. भादलीकर यांनी सायंकाळी पदभार स्वीकारला. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांची गोपनीय माहिती शिक्षण संचालकांकडे पाठवल्याच्या मुद्यावरून कर्मचारी संघटनांनी डॉ. भादलीकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलने सुरू केली होती. तीन ते चार दिवस कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन…