Author: saimat team

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । सोन्याचे भाव दररोज कमी जास्त होताना दिसतात. यामागे वेगवेगळी कारणं असतात. गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सोनाच्या आणि चांदीच्या भावामध्ये उच्चांक आणि नीचांक दोन्ही बघायला मिळाले. २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज कालच्या एवढीच आहे. आजची किंमत ४५,३९० रुपये झाली. मागील ट्रेडमध्ये, मौल्यवान धातूची किंमत ४५,३९० रुपये प्रति १० ग्रॅमवरच ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५९,३०० रुपये प्रति किलोने विकली जाईल. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या दागिने किंमतीमध्ये बदल दिसून येतो. सोन्याचा काय आहे आजचा दर? २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४६,३९० रुपये प्रति…

Read More

जयपूर, वृत्तसंस्था । राजस्थानच्या जयपूरमध्ये एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. ऑनलाईन क्लास दरम्यान एका मुलीच्या वडिलांनी चुकून शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अश्लील व्हिडिओ अपलोड केले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. जयपूरमध्ये वडिलांनी कथितरित्या आपल्या मुलीच्या शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये चुकून 10 अश्लील व्हिडिओ पोस्ट केले. ऑनलाइन क्लास दरम्यान ग्रुपमध्ये आलेले हे अश्लील व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला. मुलांच्या पालकांसह शाळा प्रशासनही आश्चर्यचकित झाले. त्यानंतर शाळा प्रशासनानेच याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. जयपूरच्या मुहाना परिसरातील कल्याणपूरच्या शासकीय शाळेत ऑनलाइन क्लासदरम्यान, शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील मुलांच्या मोबाईलवर 10 अश्लील व्हिडिओ एकामागून…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । भुसावळ , बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यांच्या विविध गावांमधील असंख्य तरुण अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघात प्रवेश करण्यास ईच्छुक आहेत त्यापार्श्वभुमीवर पदविस्तार व नियोजन करण्यासाठी आढावा बैठक नागेश्वर मंदिर वरणगाव येथे घेण्यात आली . कार्यक्रमाच्या प्रारंभी सप्तश्रृंगी माता , लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला वंदन करून व प्रदेशाध्यक्ष मा.श्री. प्रदिप (बंडू ) भोळे व जिल्हा कार्याध्यक्ष श्री. अमोल कोल्हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . उपस्थित युवकांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष श्री. प्रदिप ( बंडू ) भोळे , जिल्हा कार्याध्यक्ष श्री. अमोल कोल्हे , प्रदेश सदस्य श्री. निखिल रडे , जिल्हा सदस्य श्री. अविनाश…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून मानराज पार्क स्टॉप, तसेच खोटे नगर अडरपास मंजूर करण्याबाबत स्थानिक नगरसेवकांचा मोठा पाठपुरावा सातत्याने खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याकडे सुरू होता. तसेच डॉ.अग्रवाल हॉस्पिटल जवळील व डॉ. कोल्हे यांच्या हॉस्पिटल समोर गटारीच्या कामात चुकीच्या पद्धतीने डायरेक्शन दिल्याने डॉ. कोल्हे यांच्या हॉस्पिटलजवळ पाणी साचण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती या अनुषंगाने खासदार उन्मेशदादा पाटील यांनी महामार्गाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना घटनास्थळावर बोलावून या भागातील नगरसेवक तसेच आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांच्या समक्ष ही कामे तातडीने मार्गी लावा अन्यथा माझ्याशी गाठ असल्याची धमकी वजा आदेश दिल्याने अखेर खोटेनगर अंडरपासला लवकरच सुरू होणार आहे. जळगाव…

Read More

यावल, प्रतिनिधी । नेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्यांनी आपल्या चौकस बुद्धीचा वापर करायला पाहिजे आणि अशा कार्यकर्त्यांच्या जिवावरच निवडणुका जिंकता येतात भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष हा शंभर टक्के निवडणुका जिंकणार आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार गिरीश भाऊ महाजन यांनी यावलं येथील धनश्री चित्र मंदिरात भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियान प्रमुख मेळावा कार्यक्रमात केले. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार रक्षाताई खडसे,भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. रंजना ताई पाटील,जिल्हा उपाध्यक्ष हिरालालभाऊ चौधरी, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, सुरेश धनके,पद्माकर महाजन, शिक्षण…

Read More

यावल, प्रतिनिधी । दि. १६ रोजी यावल येथील धनश्री चित्रमंदिरात हिंदुस्तान इन्सेक्ट साईड लिमिटेड या कंपनीतर्फे एकात्मिक किड व्यवस्थापन या विषयावर शेतकरी बंधूंना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मयूर नितीन चौधरी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण ट्रमा सेंटर भुसावल हे होते. त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून कंपनीचे जनरल मॅनेजर शशांकजी चतुर्वेदी हे उपस्थित होते.तसेच मुख्य मार्गदर्शक म्हणून शास्त्रज्ञ डॉ. बाहेती सर इंजिनिअर वैभव सूर्यवंशी सर कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद फार्म यांनी शेतकऱ्यांना केळी व कापूस या पिकाबद्दल मार्गदर्शन केले तसेच डी.पी.कोते तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती…

Read More

पुणे, वृत्तसंस्था । लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणार्‍या तरुणीला झालेल्या बाळाला आश्रमात सोडतो, असे सांगून घेऊन गेलेल्या १३ दिवसाच्या बाळाचा खून केल्याची घटना, तब्बल अडीच वर्षानी उघडकीस आली आहे. त्या प्रकरणी बाळाच्या बापाला आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. शुभम महेश भांडे, वय २२, रा. वडगावशेरी आणि योगेश सुरेश काळे, वय २३ रा.मांजरी अशा दोघा आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम आणि पीडित महिला एका कंपनीत एकत्रित कामाला होते. त्या दोघांची सुरुवातीला मैत्री होती, नंतर त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही कालावधीनंतर दोघे एकत्रित राहू लागले. त्या दोघांच्या प्रेम संबंधातून २०१९ च्या सुमारास पीडित तरुणीने एका मुलाला…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाला आळा घालण्यासाठी व रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अनंत चतुर्थीला काव्यरत्नावली चौक येथे सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत घरगुती श्री गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. या संकलित मूर्तीचे एकत्रित विसर्जन केले जाणार आहे. गेल्या वर्षी देखील संस्थेतर्फे काव्यरत्नावली चौकात राबवण्यात आला होता. यामध्ये जळगाव शहरातील २५०० वर घरगुती श्री गणेश मूर्ती संकलित करून, मेहरूण तलावात विधीवतपणे विसर्जन करण्यात आले होते. याच प्रकारे यावर्षी सुद्धा घरगुती गणेश मूर्तीं संकलन करून विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे. या उपक्रमाला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव जिल्हा पोलिस…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । इंजिनिअरिंग (बीई), बी. फार्मसी अाणि कृषी तंत्रज्ञान या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा अनिवार्य असून, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ही परीक्षा २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधित घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील ६ केंद्रांवर ही सीईटी होणार असून, यंदा दोन टप्प्यांत सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत ही परीक्षा होईल. जी.एच. रायसोनी मॅनेजमेंट शिरसोलीरोड, गोदावरी फाउंडेशन ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज, केसीई इंजिनिअरिंग कॉलेज, आयएमआर कॉलेज, एमजे कॉलेज या केंद्रांवर ही परीक्षा होईल. बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, फार्मसी तसेच कृषी शिक्षणक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य असते. दरवर्षी ही परीक्षा सामायिक कक्षातर्फे…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । मनपा व पाेलिस प्रशासन रविवारच्या गणेश विसर्जनासाठी सज्ज झाले आहे. मेहरूण तलाव वगळता अन्य ठिकाणी विसर्जनाला बंदी घालण्यात अाली आहे. प्रत्येकाला तलावापर्यंत पाेहाेचणे शक्य नसल्याने संकलन केंद्रांवर गणपती मूर्ती अर्पण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गिरणा काठावर निमखेडी शिवार व गिरणा पंपिंग येथे धाेकादायक स्थिती निर्माण झाल्याने तेथे विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. मेहरूण तलावावर घरगुती तसेच चार फुटापेक्षा लहान मूर्ती विसर्जनासाठी गणेश घाटावर व्यवस्था केली आहे. चार फुटाच्या मूर्तीचे विसर्जन सेंट टेरेसा शाळेच्या बाजूने तलावावर केले जाणार आहे. रामेश्वर काॅलनीकडून गणेश विसर्जनाला बंदी घालण्यात आली असून, पाेलिस बंदाेबस्त तैनात असेल. शिवाजीनगर पुलाजवळ मनपा शाळा क्र. १,…

Read More