जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मंगळवार 21 सप्टेबरच्या सायंकाळी साडेपाच वाजेपासून वाघूर धरणातून पुर्वीचा 340 क्युसेक व वाढीव 340 क्युसेक्स असा एकुण 680 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जाणार आहे. वाघुर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून सावधानता बाळगण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी केले आहे. नदीपात्रामध्ये कोणीही गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असेही कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळवले आहे.
Author: saimat team
जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरातून १ बाधित रूग्ण आढळून आला असून तर १ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरातून अमळनेर तालुक्यातून एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर एक रूग्ण दिवसभरातून बरा होवून घरी परतला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ७३५ रूग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १५० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १० रूग्ण उपचार घेत आहे. तर २ हजार ५७५ रूग्णांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी सायंकाळी दिलेल्या प्रसिध्दीपत्रान्वये कळविले…
मुंबई, वृत्तसंस्था । देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET परीक्षेचे आयोजन केले जाते. परंतु या परिक्षेत दिवसेंदिवस वाढणारे गैरप्रकार पाहता NEET परीक्षा व्यापम घोटाळ्याचा पुढचा अंक आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पेपर फोडून, डमी विद्यार्थी बसवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असून गरीब, मध्यमवर्गीय मुला-मुलींनी डॉक्टर होऊ नये म्हणून NEET चा वापर सुरु आहे का? असा संतप्त सवाल करून महाराष्ट्र सरकारनेही तामिळनाडूप्रमाणे ‘नीट’बाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना पटोले पुढे म्हणाले की,देशभरातून १६ लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देतात पण त्यातील गैरव्यवहार वाढले आहेत, पेपर लिक…
मुंबई, वृत्तसंस्था । पावसाळ्यामुळे ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये महाजेनकोच्या वीज निर्मिती केंद्रामध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने त्वरीत योग्य प्रमाणात कोळसा उपलब्ध होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज महाजेनकोला दिलेत.केंद्र सरकारच्या वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडसह अन्य कोळसा कंपन्यांकडून ठरल्याप्रमाणे कोळसा मिळत नसल्याने निर्माण झालेल्या टंचाईवर मात करण्यासाठी वेकोलीकडे नियमित कोळसा पुरवठ्यासाठी पाठपुरावा करा, असे निर्देशही डॉ. राऊत यांनी दिले. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडकडून ठरल्याप्रमाणे कोळसा पुरवठा होत नसल्याने थेट बैठकीतूनच डॉ. राऊत यांनी केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांना दूरध्वनी करून नियमित व योग्य प्रमाणात कोळसा पुरविण्याची विनंती केली. तसेच वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या राज्यातील खाणीतला कोळसा इतर राज्याच्या…
मुंबई, वृत्तसंस्था । शिवसेनेला भवितव्य उज्वल करायचं असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहण्यातं त्यांचं नुकसान आहे. अडीच वर्षांचा जो फॉर्म्यूला आहे त्यावर एकमत करुन भाजपा-सेनेने एकत्र यावं आणि राज्याच्या विकासाला प्रगती द्यावी. केंद्राकडून जास्तीत जास्त निधी मिळवत मुंबई आणि राज्याचा विकास करावा. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला पाहिजे. ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याआधी त्यांनी भाजपासोबत आलं पाहिजे असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. ते मुंबईत अभिनेत्री पायल घोष यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या प्रकृती ची चौकशी करण्यासाठी भेट घेतल्यानंतर अंधेरी येथे प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. “तिन्ही पक्षांत धुसफुस सुरु असून सातत्याने एकमेकांवर आरोप…
जळगाव, प्रतिनिधी । समस्त गुजराल उड्डाणपुलाला संत नामदेव महाराजांचे नाव द्या, शिंपी समाज जळगाव शहर, शिंपी समाज हितवर्धक संस्था पिंप्राळा, शिंपी समाज दादावाडी परिसर शाखा व जळगाव शहरातील सहयोगी समाजातर्फे निवेदन महापौर जयश्री महाजन यांना देण्यात आले. गुजराल पेट्रोल पंप येथील नव्याने होत असलेल्या उड्डाणपुलाला वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या नाव दयावे, असे निवेदन आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता महापालिकेत महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांना समस्त समाज शिंपी समाज बांधवांच्यावतीने निवेदन जळगाव शहर शिंपी समाज अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपाध्यक्ष विवेक सचिव, चंद्रकांत जगताप, प्रिंपाळा शिंपी उपाध्यक्ष रूषिकेश कापुरे, समाज बाधंव जिल्हाध्यक्ष…
मुंबई, वृत्तसंस्था । अलीकडच्या काळात अनंत गीते यांची अवस्था राजकीयदृष्टया ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशापध्दतीची झाल्यामुळेच वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी वक्तव्य केल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. अनंत गीते बोलल्याने काही फरक पडत नाही परंतु सुर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत. आघाडीचे जनक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वच्छपणाने राज्याचे काम करत आहेत. कोविडसारख्या महामारीचा मुकाबला महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करतोय याची प्रशंसा होत असताना अडगळीत पडलेल्या नेत्यांना या सार्या कृतीचं भान राहिलेलं नाही असाही टोला सुनिल तटकरे यांनी यावेळी लगावला आहे. राष्ट्रवादी पक्ष…
जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व स्टुडंट फॉर डेव्हलपमेंट (SFD) तर्फे गणेश घाट मेहरुन तलाव येथे निर्माल्य संकलन व 508 गणपती संकलन व विसर्जन करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व स्टूडेंट फॉर डेव्हलपमेंट या आयामा मध्ये जल,जमीन,जंगल त्यांच्या संरक्षणासाठी स्टूडेंट फॉर डेव्हलपमेंट या आयामा अंतर्गत मोठ्या प्रमाणात पर्यावरण संरक्षण संबंधित कार्य चालू असते. पर्यावरण संरक्षणाचे धडे दिले जातात.त्याच अनुषंगाने आनंत गणेश चतुर्थी च्या निमित्याने 508 गणपतीचे संकलन व विसर्जन करण्यात आले. तसेच 4 तास निर्माल्य संकलन दरम्यान तीन ट्रॅक्टर ट्रॉली शहरात व गणेश घाट या ठिकाणी निर्माल्य संकलन केले. यावेळी महानगर मंत्री रितेश महाजन , नगर मंत्री…
मुंबई, वृत्तसंस्था । निर्यात क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंबई येथील जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) येथे आजपासून राज्यस्तरीय ‘वाणिज्य उत्सव’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन आज मंगळवार, दि. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उद्योग राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे उपस्थित राहणार आहेत. “आजादी का अमृत महोत्सव”- 75 व्या स्वातंत्रदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत दि.20.09.2021 ते 26.09.2021 या दरम्यान “वाणिज्य सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत…
मुंबई, वृत्तसंस्था । मुंबईत विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेली विकास आणि पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. ना. ठाकरे यांच्या हस्ते आज वरळी परिसरातील नेहरू सायंस सेंटर जंक्शन, फिनिक्स मुंबई माईल फ्लायओव्हरखालील जागा, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, सायानी रोड, गोखले रोड, एनी बेझंट रोड वरील सौंदर्यीकरण आणि फुटपाथच्या कामांचे तसेच सर पोचखानवाला रोड व खान अब्दुल गफार खान रोडला जोडणाऱ्या पायवाटेच्या (हिलटॉप लेन) सौंदर्यीकरण व नूतनीकरणाच्या कामांचे भूमिपूजन झाले. या कामांना आजपासूनच सुरूवात होत आहे. यावेळी नगरसेवक स्नेहल अंबेकर, समाधान सरवणकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनिल…