जळगाव, प्रतिनिधी । शहरातील असोदा रोड येथे राहणाऱ्या तरुणाची बँकेच्या खाते व्हेरिफिकेशनच्या नावाने दहा हजार रुपयाची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना २८ रोजी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेतून बोलत असल्याचे भासवत बँकेचे खाते व्हेरिफिकेशन नावाने सायबर चोरट्यांनी जळगावातील आसोदा रोड परिसरातील तरूणाला ऑनलाईन गंडा घातलाय. १० हजार १५४ रुपयात तरूणांची फसवणूक झाली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील आसोदा रोड परिसरात विशाल विनोद कोळी वय २३ हा तरुण वास्तव्यास आहे. विशाल हा बेंडाळे कॉम्प्लेक्समधील श्री ऑनलाईन सर्व्हिस शॉप या दुकानावर असतांना त्याला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. आयडीएफसी बँकेतून बोलत असल्याचे भासवत…
Author: saimat team
कजगाव, प्रतिनिधी । कजगाव येथील रहिवासी व फळ व्यापारी शेख सम्मद शेख इस्माईल मनियार यांचे द्वितीय चिरंजीव अवेश सम्मद मनियार यांचा विवाह दिनांक 11/2/2022 शुक्रवारी रोजी ता, जिल्हा , वाशीम येथील कैसर अहमद सर यांची कन्या उंम्मे जवेरीया यांच्याशी ठरला परंपरेप्रमाणे मनियार परिवार हे वासिम येथेल साखरपुड्यासाठी गेले , दोनी कडील मंडळींनी व परिवारातील सदस्य यांनी साखरपुड्यात विवाह आटोपण्याचा निर्णय घेतला , कजगाव येथील आवेश शेख समद मनीयार त्यांनी मोठे पणा दाखवत विवाहाचा पायंडा मोडत काही न घेता व इतर खर्चाला लगाम घालत निकाह करत अनाठायी खर्चला फाटा दिला, व धर्मगुरूंना बोलावून समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे दोघांचे लग्नगाठ बांधत लग्न लावून मुस्लिम…
पुणे : बजाज ऑटोमाबईलचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे वयाच्या 83 व्या वर्षी उपचारादरम्यान निधन झाले आहे. बजाज हे गेल्या काही काळापासून कर्करोगाने त्रस्त होते. राहुल बजाज यांच्यावर पुण्यात उपचार सुरु होते मात्र त्यांची रुबी हॉल क्लिनिकध्ये प्राणज्योत मालवली. राहुल बजाज यांच्या जाण्याने उद्योगक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने विविध क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज गृपची सूत्र हातात घेतली. राहुल बजाज यांच्या नेतृत्वात बजाज ग्रृपचा टर्नओव्हर हा 7.2 कोटींवरुन थेट 12 हजार कोटीवर जाऊन पोहचला. बजाज स्कूटर विकणारी देशातील अव्वल ग्रृप म्हणून नावारुपास आला. त्यानंंतर 2005 मध्ये ग्रृपची जबाबदारी त्यांचे…
जळगाव, प्रतिनिधी । ट्रक मधून साहित्याची चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. तसेच दोघांकडून १९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ट्रकमधून साहित्याची चोरी करणार्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मुसक्या आवळल्या. दोघांकडून सुमारे १९ लाख रुपयांचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकमधील साहित्य चोरीच्या दोन घटना जिल्ह्यात घडल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी या घटनांची चौकशी करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस…
अडावद, प्रतिनिधी । तालुक्यातील अडावद येथे मॅनेज (हैदराबाद),वनामती (नागपूर),आत्मा (जळगाव) आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत भगिनी मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय, अडावद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी विस्तार सेवा पदविका प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरुन बोलतांना माजी विधानसभा अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी देशात कृषी संस्कृती अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले. सदर अभ्यासक्रम हा एक वर्षाचा असून यात ४० प्रशिक्षणार्थींनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. संपूर्ण देशभरातील कृषीतज्ञ या वर्गाला ऑनलाइन व प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार असल्याचे प्राचार्य डाॅ.अनिल माळी यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आत्मा, जळगावचे प्रकल्प उपसंचालक के. एन. तडवी तर विशेष…
यावल, प्रतिनिधी । आज शुक्रवार दि.11रोजी सातपुडा जंगलात यावल येथील डॉ.कुंदन फेगडे यांच्या तर्फे आयोजित मोफत ई श्रमकार्ड नोंदणी महाअभियानास 287 आदिवासी बांधवांनकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. यावल येथील युवा सामाजिक कार्यकर्त डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेले मोफत ई-श्रम कार्ड वितरण अभियान सातव्या टप्प्यात सातपुडा डोंगरात अति दुर्गम आदिवासी भागात पोहोचले या उपक्रमाला आदिवासी बांधवांकडून मोठ्या उत्साहात बहुसंख्येने प्रतिसाद मिळाला. यावल तालुक्यातील आदीवासी ग्रामीण क्षेत्रातील नागरीकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळावा या सामाजिक सेवेच्या शुद्ध हेतूने श्रमजिवी कुटुंबास अत्यावश्यक असणारे ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास सातवे सत्राला सुरुवात करण्यात आली या अभियानात अतिदुर्गम भागातील,वागझिरा,जामन्या,…
यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा-हिंगोणा जिल्हा परिषद गटातील लघु सिंचन विभागातर्फे सुरु असलेले आणि झालेल्या बंधाऱ्याच्या कामाची आणि थर्ड पार्टी ऑडिट करणाऱ्या संबंधितांची चौकशी होईपर्यंत ठेकेदाराचे बिल थांबविण्यात यावे अशी मागणी यावल पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांनी केली आहे. दि८ फेब्रुवारी २०२२ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे दिलेल्या निवेदनात यावल पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील सावखेडा होणा-या जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद अंतर्गत लघुसिंचन विभागामार्फत चालू वर्षात बंधाऱ्याची कामे मंजूर होऊन ठेकेदारांमार्फत कामे पूर्ण झालेली आहेत तर काही कामे सुरू आहेत ही बंधाऱ्याची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली असल्याने या नाल्यावर…
यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील दुसखेडा ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सरपंच यांचा मुलगा यांनी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात यावल तालुक्यातील दुसखेडा ग्रामपंचायत मधील नमुना नंबर 8 व 9 चे वाचन करून शासकीय कामकाजाचा नवीन विक्रम केला असल्याची तक्रार दुसखेडा ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यांनी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दि.9फेब्रुवारी2022 रोजी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, यावल तालुक्यातील दुसखेडा येथील घरकुलाची “ड” यादी ही शासनाकडून मंजुर झाली आहे. मंजूर घरकुलांच्या यादीचे वाचन हे ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन करावी लागते परंतु विद्यमान ग्रामसेवक हे आज सुटीवर असून…
जळगाव प्रतिनिधी जळगाव येथील इकरा शिक्षण संसथे चे अध्यक्ष आणि अल-फैज फाऊंडेशन जळगाव चे संस्थापक डॉ.अब्दुल करीम सालार यांना नुकतेच एका समारंभात “सिपास नामा” आणि “फखर ए खांदेश” पुरस्कार” प्रदान करण्यात आला. इकरा चे अध्यक्ष आणि अल-फैज फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. अब्दुल करीम सालार यांना मदिना कॉलनी, उस्मानिया पार्क, जळगाव येथील रहिवाशांनी एका कार्यक्रमात मानार्थ “सीपास नामा ” प्रदान केले. आभार पत्र सुप्रसिद्ध कवी आणि सूत्रसंचालक साबीर मुस्तफा आबादी यांच्या तर्फे हस्त लिखित मान पत्र, त्यांच्या शैक्षणिक सेवेचा गौरव म्हणून “फखर ए खानदेश ” पुरस्कार प्रदान करण्यात आला.शेख मसूद चाँद, फेरोज खान, अनसार खान, रझा सर, दानिश खान, जुनैद निशात यांच्या…
मुंबई : प्रतिनिधी । महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चुलत भावाच्या सह-मालकीच्या कंपनीची ईडीकडून 10.9 कोटी रुपयांच्या कथित पेमेंटची चौकशी सुरू आहे. अनेक कंपन्यांच्या माध्यमातून हे पैसे अनिल देखमुखांना पाठवण्यात आले होते, असा ईडीला संशय आहे. या कंपनीची चौकशी केली जात आहे. ही कंपनी सत्यजीत देशमुख यांच्या मालकीची आहे. सत्यजीत देशमुख हे अमेरिकास्थित लुईस बर्जरचे उपकंत्राटदार आहेत. तसेच ते वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार असून मुंंबई कोस्टल रोड आणि मुंंबई-नागपूर एक्स्प्रेस वे या दोन इतर हाय-प्रोफाइल प्रकल्पांसाठी देखील ते उपसल्लागार आहेत. सत्यजीत देशमुख यांंनी ईडीकडे सादर केलेल्या निवेदनानुसार, इनोवेव्हने यापूर्वी कोणताही सल्लागार प्रकल्प केलेला नाही. तसेच सप्टेंबर…