Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सेंट्रल फुले मार्केटमधील कंट्रोल रूममधील केबल जळाल्याने खंडित झालेला वीजपुरवठा तब्बल ६४ तासांनी म्हणजेच रविवारी चाैथ्या दिवशी सुरळीत सुरू झाला. गुरुवारी मध्यरात्री एक वाजता कंट्रोल रूममधील नऊ केबल जळाल्या होत्या. महावितरणच्या अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही जोडणी पूर्ण होत नव्हती. परिणामी मार्केटमधील तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होता. केबल जळाल्याने संपूर्ण फुले मार्केट तीन दिवसांपासून अंधारात होते. कर्मचाऱ्यांनी शुक्रवार व शनिवारी पाच ते सात केबल जोडल्या. मात्र, जळालेल्या केबल अधिक लांब असल्याने त्या बदलण्यासह जोडण्यास अनेक अडचणी आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजेदरम्यान काम पूर्ण होऊन वीजपुरवठा सुरळीत झाला. सहायक अभियंता राहुल गोवे यांच्या…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील नट्टू काका ही भूमिका साकारत घराघरात पोहचलेले अभिनेते घनश्याम नायक (वय – ७८) यांचे रविवारी निधन झाले. वर्षभरापासून त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते. अबाल वृद्धांपर्यंत आवडीने पाहिल्या जाणाऱ्या ‘तारक मेहता’ मालिकेतील नट्टू काका ही त्यांची भूमिका प्रचंड गाजली. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर ते गेल्या वर्षभरापासून मालिकेपासून दूर होते. नायक यांनी कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष केला. प्रारंभी घन्यश्याम थिएटरमध्ये काम करताना त्यांना रोज तीन रुपये मिळत. नंतर त्यांना ७० च्या दशकात मोठ्या पडद्यावर संधी मिळाली.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील दादावाडी येथे समाज हिताच्या दृष्टिकोनातून कल्याणकारी उपक्रमांच्या आयोजनासाठी युवा गुर्जर महासभा महाराष्ट्र राज्यच्या समस्त पदाधिकाऱ्यांची बैठक दि ३ रविवार रोजी संपन्न झाली. दि.०३ रोजी जळगाव शहरातील आयडीय स्कूल, दादावाडी येथे समाज हिताच्या दृष्टिकोनातून कल्याणकारी उपक्रमांच्या आयोजनासाठी युवा गुर्जर महासभा महाराष्ट्र राज्य च्या समस्त पदाधिकार्यांची बैठक प्रदेश अध्यक्ष मा. श्री. दिग्विजय पाटील यांचा उपस्थितीत पार पडली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री. नवलसिंग राजे पाटील (स्विय्य सहाय्यक, मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील मंत्री म.रा.), महिला प्रदेश अध्यक्ष मा. श्रीमती. शकुंतलाताई पाटील, मा. प्रदेश महासचिव श्रीराम पाटील, म.न.पा. नगरसेवक मा. श्री चंद्रशेखर पाटील हे होते. तसेच सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचा…

Read More

पुणे, वृत्तसंस्था । करोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्ष शाळा बंद होत्या. आता प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याने शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात आल्या आहे. शाळांमधील किलबिलाट पुन्हा सुरू झाला आहे. गुलाब पुष्प, चॉकलेट देवून व औक्षण करून विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. राज्य शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करताना शाळांना मोठी कसरतच करावी लागत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता यांना प्राधान्य देत आज शाळेची पहिली घंटा वाजली. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एंट्री होताच आधी त्यांचे तपमान व ऑक्सिजन लेव्हल तपासण्यात आली. त्याच्या नोंदी रजिस्टरमध्ये करण्यात आल्या.विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुचनाही शिक्षक व कर्मचारी यांच्याकडून देण्यात येत होत्या. शाळांचा परिसर…

Read More

लखनौ, वृत्तसंस्था । लखीमपूरच्या शेतकऱ्यांना भेटायला निघालेल्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रात्री उशिरा प्रियांका लखौनाला पोहोचल्या. तिथून त्या लखीमपूरला पडत्या पावसात रवाना झाल्या. दरम्यान, साडे आज पहाटे (सोमवारी ) 5.30 च्या सुमारास उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका गांधींना हरगाव पोलीस स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले आहे. प्रियांका गांधींना सीतापूर जिल्ह्यातील एका गेस्ट हाऊसमध्ये नेण्यात आले आहे. यूपी काँग्रेसने ट्विट करुन लोकांना समर्थनासाठी या भागात पोहोचण्यास सांगितले आहे. प्रियांका गांधींना ताब्यात घेऊन पोलीस त्यांना सीतापूर जिल्ह्यातल्या सिंधोली येथे घेऊन गेले आहेत, तिथे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहेत. याअगोदर लखनौवरुन लखीमपूरला जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट पाहायला मिळाली.…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यातील अनेक बालकांचे छत्र हिरावून नेले असून अनेक बालक हे अनाथ झाले आहेत. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत म्हणून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात शासनातर्फे घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यातील ३०६ अनाथ बालकांच्या खात्यात सुमारे १५ कोटी ३० लाख रुपये जमा करण्यात आले असून उर्वरित बालकांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा करण्यात येतील, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोविड महामारीमुळे गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातील शेकडो बालके आई वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झाली आहेत. अशा…

Read More

जळगाव, प्रतिनिधी | शहरात आज जिव्हाळा हेल्थ केअर सेंटरचा शुभारंभ महापौर जयश्री महाजन, यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आयएमए अध्यक्ष डॉ. सी.जी.चौधरी, नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील उपस्थित होते. जिव्हाळा नर्सिंग ब्युरोची सुरूवात २००६ साली घरी जाऊन रूग्णांना सेवा देणे या पध्दतीने झाली. २००८ मध्ये औरंगाबाद येथे जिव्हाळ्याच्या पहिल्या हेल्थ केअर सेंटरचा शुभारंभ करण्यात आला. ग्राहकांचा प्रतिसाद बघता औरंगाबाद नंतर अहमदनगर येथे २००८ साली आणि जळगावमध्ये २०१९ साली घरोघरी जाऊन रूग्णसेवा सुरू करण्यात आली, आणि आता जिव्हाळ्याचे प्रशस्त हेल्थ केअर सेंटरचा मान्यवरांच्या हस्ते प्लॉट नं.१९, मयुर सोसायटी, वाटीका आश्रम जवळ, पंडीत कॉर्नर मागे, धुळे रोड, येथे आज…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । महानगरपालिकेची परवानगी न घेता वाट्टेल तिथे मनमानीपणे बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध मनपा व पोलिस प्रशासनाने मोहीम उघडली आहे. शनिवारी शहरातील विविध भागातून १२५ अनधिकृत बॅनर हटवण्यात आले आहेत. रविवारी देखील मोहीम सुरू राहणार आहे. मात्र, सोमवारपासून विनापरवानगी बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई सोबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल हाेईल. उच्च न्यायालयाने शहर विद्रूपीकरण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चमकोगिरी करणाऱ्यांकडून थेट महापालिकेसमोर मोठे बॅनर लावण्यात येते. याशिवाय शहरातील मुख्य रस्त्यांवर दुभाजक, चौकात तसेच कॉर्नरला बॅनर लावून अपघातांना आमंत्रण देण्याचे प्रकार केले जातात. या विरुद्ध जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे व महापालिका आयुक्त सतीश…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील खंडेराव नगरमधील आजाद नगर येथे दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याची घटना आज रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून तणाव कायम आहे. शहरातील खंडेराव नगर परिसरात असलेल्या आझाद नगर भागात आज सायंकाळी शनिवारचा बाजार होता. बाजारात एका मुलीची छेड काढल्यावरून रात्री आठ वाजेच्या सुमारास वाद झाला. एक गट दुसऱ्या गटाला जाब विचारायला गेला असता दोन्ही गटात बाचाबाची होऊन हाणामारी झाली. दोन्ही गटातील वाद वाढल्याने काही वेळाने दोन्ही कडील गट आमनेसामने येऊन दगडफेक सुरू झाली. वादात एका गटाने पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील तोडफोड केली. घटनास्थळी सहाय्यक अधीक्षक…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महाश्रमदान कार्यक्रमातून ‘स्वच्छतेचा जागर, शोषखड्डाचा करू वापर’ या अभियानास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज ग्रामपंचायत चांदसर, तालुका धरणगाव येथे सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, एरंडोलचे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, गटविकास अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, नागरीकांनी स्वच्छतेचे महत्व जाणल्यानेच आपण कोविडचा प्रादुर्भाव रोखू शकलो. जिल्ह्यात कोविड काळातही आरोग्यदूत, सामाजिक संस्था…

Read More