Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । भुसावळ येथील शेतात पाडलेले प्लॉट एन.ए. करण्याच्या मोबदल्यात १० हजाराची लाच मागणाऱ्या भुसावळ प्रांत कार्यालयातील महिला अव्वल कारकून यांना नंदूरबार लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे भुसावळ प्रांत कार्यालयात खळबळ उडाली आहे. प्रतिभा मच्छिंद्र लोहार (वय-४०) असे १० हजाराचे लाच घेणाऱ्या अव्वल कारकूनचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका तक्रारदाराने प्लॉट एन.ए. करण्यासाठी भुसावळ प्रांत कार्यालयात त्यांनी सादर केले होते. संशयित आरोपी अव्वल कारकून प्रतिभा लोहार यांनी कामाच्या मोबदल्यात १० हजार रूपयांची लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी थेट नंदूरबार लाचलुचपत विभागाकडे रितसर तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार १७…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शासनाच्या योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणांनी मिशन मोडवर कामकाज करुन या योजनांचा लाभ मिळवून द्यावा. असे निर्देश खासदार रक्षाताई खडसे यांनी आज दिले. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन सभागृहात खासदार श्रीमती खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली, यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, समितीचे सहअध्यक्ष तथा खासदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती मीनल कुटे आदि व्यासपीठावर तर आमदार शिरीष चौधरी, चिमणराव पाटील, सुरेश भोळे,…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील दादावाडी येथील पेट्रोल पॅम्पजवळील जुगार अड्ड्यावर आज दुपारच्या सुमारास जिल्हापेठ पोलिसांनी धाड टाकून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्या दोघांवर जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील शामलाल चंदुमल कुकरेजा (वय-६२) व धानोरा येथील जगन्नाथ काकडू महाजन (वय-३८) असे ताब्यात घेतलेल्या दोन संशयित आरोपींची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे की, शहरातील गुजराल पेट्रोल पंप जवळ बंद पडलेल्या टपरीच्या आडोश्याला काही जण मटका नावाचा सट्टा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पो.ना. किरण धनगर, पोहेकॉ दिपक पाटील,…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील पहूर येथे ्श्री केवडेश्‍वर महादेव मंदिर हॉलमध्ये आज जामनेर तालुका लोककलावंत वही गायन मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येथील राम मंदिर या ठिकाणी विघ्नहर्ता हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर सागर गरुड यांच्या हस्ते नारळ वाढवून या लोकं कलावंतांनी मिरवणूक काढून शहरातून मिरवणूक काढण्यात आली. श्री शेत्र केवडेश्‍वर महादेव मंदिरात या मिरवणुकीची सांगता करून या मंदिराच्या हॉल मध्ये खानदेश लोककलावंत विकास परिषद जळगाव तथा येथील सप्तशृंगी वही गायन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने जामनेर तालुक्यातील कलावंतांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याचे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती देवीचे दीप प्रज्वलन करून व पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो) वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या, त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत १५ ऑगस्ट २०२२ पर्यंतच्या ७५ आठवड्यात ७५ कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी जास्तीत जास्त माध्यमांचा वापर करण्याचा शासनाचा मानस असून त्या अनुषंगानेच शासकीय पत्रव्यवहार व इतर ठिकाणी या सुनिश्चित चिन्हाचा…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक नवरात्रौत्सव उत्साहात परंतु साधेपणाने साजरा करावा. या उत्सवात गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रमास प्राधान्य देऊन शासनाच्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेबाबत जनजागृती करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले असून याबाबत मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत. सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करतांना सर्व नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोणातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे. सार्वजनिक मंडळानी महानगरपालिका/नगरपालिका/स्थानिक स्वराज्य प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत, घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट साध्या पध्दतीने करावी. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । आम्ही भारत विकास परिषद, जळगाव शाखा आणि लायन्स क्लब, जळगांव या समाजसेवी संस्था असून नेहमी विविध समाज उपयोगी उपक्रम राबावत असतात जसे की वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, फूड पाकीट वाटप, गरीब व गरजुना मदत व विविध साहित्य वाटप, इत्यादि.तसेच संपर्क फाउंडेशन ही संस्थाभारत विकास परिषद, जळगाव शाखेचा एक भाग असून नर्सिंग सुविधा घरपोच देणे, तसेच कोरोंना काळापासून ऑक्सीजन मशीन नाममात्र भाडे तत्वावर देण्याचे कामही संस्था करत असते. अशा समाजकार्याच्या संकल्पनेतुन देवता लाईफ लाईफ फाउंडेशन, नागपुर ही कॅन्सर ग्रस्त रुग्णांना दर महिना मदत करणारी संस्था राज्यव्यापी रक्तदान जागरूकता अभियान राबवित आहे. अभियानाची सुरुवात नागपुर येथील २०…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । भोसरी भूखंड प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर येथे जाऊन समन्स बजाविले. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ईडीचे पथक मुक्ताईनगरातील खडसे यांच्या फार्म हाऊसवर धडकले. त्यावेळी तिथे कुणीच नसल्याने बाहेर गेटवर हे समन्स अडकविण्यात आल्याची चर्चा आहे. आता खडसेंनी ईडीच्या कारवाईबाबत बाजू मांडली आहे. तसेच, मी काय गायब नव्हतं, दोन दिवस फर्दापूरच्या रेस्ट हाऊसवर होतो, असे स्पष्टीकरणही खडसेंनी दिलं. एकनाथ खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा नेत्यांवरही प्रहार केला. तसेच, माझ्या मुलीचा पराभव करणारा गद्दार कोण हे मला राष्ट्रवादीत आल्यानंतर समजलं, असेही खडसेंनी म्हटलं. ज्या नाथाभाऊंनी भाजपमध्ये कष्ट केली,…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना एका तासाच्या आत रुग्णालयात पोहोचविणाऱ्यांसाठी एक खास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत संबंधित मदत करणाऱ्या व्यक्तीला 5,000 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे. यासंदर्भात, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि परिवहन सचिवांना पत्र लिहिले आहे. यात, ही योजना 15 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत लागू असेल, असे म्हणण्यात आले आहे. मंत्रालयाने सोमवारी, प्रामाणिकपणे मदत करणाऱ्यांना बक्षीस देण्याच्या या योजनेसंदर्भात नियमावलीही जारी केली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे, की आणीबाणीच्या स्थितीत रस्त्यावरील अपघात ग्रस्तांना मदद…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर पुन्हा सुरू झालं आहे. सोमवारी रात्री १० च्या सुमारास डाऊन झालेल्या या सोशल मीडियातील सेवा तब्बल ६ तास बंद राहिल्या आहेत. त्यामुळे युजर्स चिंतेत होते. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स ऍप का बंद पडलं त्याबाबत अद्याप कुठलंही कारण समोर आलं नाही. काही लोकांनी यामागे सायबर हल्ला असल्याची शक्यता वर्तवली आहे. आता, पुन्हा या सेवा सुरू झाल्या आहेत. याबाबत स्वत: फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने माहिती दिली. तसेच, आपल्या युजर्संची माफीही मागितली आहे. मात्र, या 6 तांसाच्या बंदमुळे फेसबुकचं मोठं नुकसान झालं आहे. फेसबुक काही तासांसाठी गंडल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली होती. त्यामुळे, आर्थिक…

Read More