फैजपूर, प्रतिनिधी । नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फैजपूर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात रुट मार्च करण्यात आला. नवरात्रोत्सवात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, सण, उत्सव शासनाच्या नियमानुसार शांततेत साजरे व्हावे आणि समाजकंटकांवर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने पोलिसांनी संचलन करत शक्तीप्रदर्शन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार संध्याकाळी पाच वाजता संचलनाला सुरुवात करण्यात आली. त्यात २ अधिकारी, १५ पोलीस कर्मचारी, १९ होमगार्डसह पोलिसांच्या फौजफाट्याने शहरात पायी संचलन केले. दरम्यान, आखेगावकर यांनी नवरात्रोत्सव दरम्यान शासनाच्या अटी, शर्तींचे कोणत्याही प्रकारे कोणीही उल्लंघन करणार नाही, याबाबत समजावून सांगितले. नियमांचा भंग झाल्यास संबंधितांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
Author: saimat team
नाशिक, वृत्तसंस्था । 15 वर्षीय मुलीला ओलीस ठेवून पुण्यातील बडतर्फ सहायक पोलीस उपनिरीक्षकाने गावठी कट्टय़ातून गोळीबार केल्याची घटना राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे घडली आहे. दरम्यान, गोळीची दिशा बदलल्याने श्रीरामपूरचे विभागीय पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके बालंबाल बचावले आहेत. गोळीबार करणाऱया बडतर्फ सहायक पोलीस उपनिरीक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून एका कारसह दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत. सुनील लक्ष्मण लोखंडे (रा. शिवानंद सोसायटी, वानवडी, जि. पुणे) अशी अटक केलेल्याचे नाव आहे. संबंधित मुलीच्या आईने आरोपीविरोधात आर्म ऍक्ट, अपहरण तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा श्रीरामपूर पोलिसांत दाखल केला होता. हा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. हा…
जळगाव, प्रतिनिधी । धरणगाव येथे धान्य गोडाऊनला विशेष पोलीस महानिरीक्षकांनी व त्यांच्या नवीन पोलीस पथकाने धाड टाकली. पण ते धान्य रेशनचे आहे की खासगी आणि रेशनचे असेल तर नियमाप्रमाणे साठा आहे की नाही हे ठरविण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐनवेळी पंचनामा करायला नकार दिला. त्यामुळे गोदामाला सील करून ठेवण्यात आले आहे. शहरातील कमल जिनिंगमध्ये धान्याचा अवैध साठा करून ठेवला आहे, अशी माहिती मिळताच विशेष पोलिस महानिरीक्षकांनी स्थापन केलेल्या पोलिसांच्या विशेष पथकाने त्या जिनिंगमध्ये छापा टाकला; पण ते धान्य रेशनचे आहे की खासगी आणि रेशनचे असेल तर नियमाप्रमाणे साठा आहे की नाही हे ठरविण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐनवेळी पंचनामा करायला नकार दिला.…
मुंबई, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे भाव कडाडल्यानंतर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या आठवड्यात सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोलच्या किंमतीत 30 पैसे तर डिझेलचा भाव 35 पैशांनी वाढला आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. या दरवाढीनुसार, मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 109.55 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 99.60 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 103.54 आणि 92.12 रुपये इतका आहे. कच्च्या तेलाचे तर सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील अयोध्या नगरातील घटना वाहन घेण्यासाठी माहेरहून ३ लाख रूपये आणावे, यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील अयोध्या नगरातील माहेर असलेल्या मनिषा रमेश महाजन या विवाहितेचा भडगाव येथील रमेश हिरालाल महाजन यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे १३ फेब्रुवारी २००६ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर दोन वर्षे सर्वांनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर पती रमेश महाजन याने विवाहितेला माहेरहून गाडी घेण्यासाठी तीन लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला. आईवडीलांची परिस्थीती हालाखीची असल्याने पैसे दिले नाही. त्यामुळे पती रमेश महाजन यांनी शिवीगाळ, मारहाण करण्यास सुरूवात केली. याला प्रोत्साहन म्हणून सासू, सासरे, दिर व नणंदे…
जळगाव, प्रतिनिधी । येथील पवन चारीटेबल ट्रस्ट व धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय,जळगाव च्या वाणिज्य विभागातर्फे केंद्र सरकारच्या टेक्स्टाईल विभागातर्फे नुकतेच महाविद्यालय परिसरातील बचत गट सदस्यांसाठी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये हस्तकला कारागीर यांच्यासाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रशिक्षण वर्गात सहाय्यक संचालक संतोष कुमार यांनी वेगवेगळ्या हस्तकलांचे प्रशिक्षण दाखविले यात एम्ब्रोईडरी, ज्वेलरी, सोनारिका, लाकूडकाम, मातीकाम, पेंटिंग अशा विविध 40 ते 50 हस्तकला प्रकारांचे प्रशिक्षण त्यांनी दिले. सदर कार्यक्रमास महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमास शैलेशसिंग, जयप्रकाश मेने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी वाघुळदे, डॉ. विलास नारखेडे, क्रीडा संचालक डॉ. पी. आर. चौधरी…
जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता बदलताच गैरप्रकारांना सुरुवात झाली आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मंगळवारी दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी कक्ष क्रमांक १३ मधील महिला रुग्णाला रक्त मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. दरम्यान, उपमहापौर कुलभूषण पाटील यांचे कार्यकर्ते मुकेश पाटील यांना माहिती पडताच त्यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सूचित केले. त्यामुळं संबंधितावर कारवाई करता आली. दरम्यान, हा संशयित जामनेर येथील होता, मद्याच्या नशेत असल्याने त्याला दम देऊन सोडले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाविरहित रुग्णसेवा सुरु आहे. रुग्णांना उपचारासाठी दररोज रक्ताची गरज भासत असते. रक्तपुरवठा हा रुग्णालयातील रक्तपेढीतून अथवा उपलब्ध नसल्यास बाहेरून…
अडावद ता.चोपडा, प्रतिनिधी । येथील पश्चिमेकडील लोणी पंचक धानोरा परीसराला काल दुपारी झालेल्या विजांच्या गडगडाटासह वादळ वाऱ्या सह मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने शेतीपिके नेस्तनाभुत झाल्याने बळीराजांचे उरले सुरले अवसान ही गळाले. त्यात लोणी शिवारातील शेतात दुपारी २.३० वाजेच्या सुमारास विज कोसळून बैल जागेवरच ठार झाला.शेतकऱ्यांचे पन्नास हजारांचे नुकसान झाले. लोणी शिवारातील गट क्रमांक १११/१ मधील सुभाष नारायण शिंपी यांच्या शेतात एकनाथ उत्तम महाजन हे आपल्या स्वतःच्या बैलजोडीने काम करीत असतांना अचानक विज कोसळून त्यांच्या ३८ हजार रूपये किंमतीचा पांढऱ्या बैलावर विज कोसळल्याने तो जागीच ठार झाला.घटनास्थळी तलाठी व्ही.डी.पाटील आणि पोलिस पाटील नरेंद्र पाटील यांनी धाव घेत…
धानोरा ता. चोपडा, प्रतिनिधी । येथुन जवळच असलेल्या अडावद ता.चोपडा – यंदाच्या नवरात्रोत्सवात आगमन आणि विसर्जन मिरवणूकीसह दांडीया गर्भा खेळण्यावर शासनाच्या मार्गदर्शक सुचना नुसार पुर्णपणे बंदी असणार आहे त्या ऐवजी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरे ,बेटी बचाव बेटी पढाई,स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्ग आदी समाजाभिमुख उपक्रम राबवून शारदोत्सव साजरा करून सामाजिक सलोखा जोपासण्याचे अवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांनी केले. अडावद येथील पोलिस वसाहती मधील सार्वजनिक गुरूदत्त मंदिराच्या सभागृहात आज दि.६ रोजी सायंकाळी ५ वाजता आगामी नवरात्रोत्सव आणि ईद ए मिलाद सण उत्सवा बाबत शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच सौ.भावनाताई माळी, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील,तंटामुक्त…
जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उभारण्यात आलेल्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऋषिकेश येथे देशात उभारण्यात आलेल्या 36 हवेतून निर्माण होणाऱ्या पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी देशभरातील पीएसए प्लांट बसविल्या गेलेल्या रुग्णालयांना ऑनलाईन संबोधित केले. जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उदघाटन श्रीफळ वाढवून व ऑक्सिजन मशीनची कळ दाबून करण्यात आले. यावेळी आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे यांच्यासह प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर…