जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील केंद्रीय जिल्हा परिषद मुलांची शाळेत नवीन शालेय व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास शाळेतील पाल्यांची व ग्रामस्थांची बैठक शाळेतील हॉलमध्ये घेण्यात आली या बैठकीत शालेय व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली यामध्ये अध्यक्ष भैया मोरे उपाध्यक्ष अफसर तडवी शिक्षक तज्ञ म्हणून शिवसेना प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे सुरेखा बाई मोरे निर्मलाबाई कलाल मनोज मोरे संजय जवखेडे संगीता लोहार अंजना पांचाळ अलीम तडवी हिना पिंजारी मंगला सावळे शिक्षक प्रतिनिधी म्हणून उपशिक्षक मिलिंद तायडे सचिव मुख्याध्यापक रवींद्र खोडपे आदींची एकमताने निवड करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर…
Author: saimat team
कल्याण, प्रतिनिधी । सात ते आठ दरोडेखोरांनी धावता ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटण्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे एका महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. इगतपुरी ते कसारा दरम्यान लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली असून कल्याण जीआरपी पोलिसांनी याप्रकरणी तीन दरोडेखोरांना ताब्यात घेऊन इतर आरोपींचा शोध घेत आहे. मात्र मेल एक्सप्रेसमध्ये लुट आणि बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना इगतपुरी स्थानक सोडल्यानंतर ट्रेन बोगद्याजवळ पोचली. त्यावेळी ट्रेन स्लो असल्याने सात ते आठ जण ट्रेनमध्ये चढले. त्यांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून…
जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणूमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या आणि विधवा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. या बालकांच्या मागे राज्य शासन ‘आधारवड’ म्हणून खंबीरपणे उभे राहील. ‘मिशन वात्सल्य अंतर्गत’ अनाथ मुले व विधवांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते अजिंठा शासकीय विश्रामगृहात आज सकाळी कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या जिल्ह्यातील 20 बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मुदतठेवीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा…
जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत जळगाव शहरातील 14 कुटुंबांना प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे 2 लाख 80 हजार रुपयांच्या रकमेचे धनादेशांचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते इस्त्राइल केमिकल कंपनीतर्फे जिल्हा रुग्णालयास प्राप्त दहा लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक व्हेन्टिलेटरचे वितरण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचेकडे करण्यात आले. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, समितीचे अध्यक्ष बाळा कंखरे, नगरसेवक नितीन लढ्ढा, तहसीलदार ज्योती देवरे, विष्णू भंगाळे, शरद तायडे,…
मुंबई, वृत्तसंस्था । सातत्याने महागणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरामुळे (Petrol diesel price hike) सामान्यांचं जगणं आणखी कठीण झालं आहे. आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली ( Petrol diesel price hike on 09th October 2021 ) आहे. सरकारी तेल कंपन्यानी आज पेट्रोलच्या किंमतीत 30 पैशांची वाढ केली आहे. तर डिझेलचे दर 35 पैसे प्रति लीटरने वाढले आहेत. आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर 109.83 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लीटर शंभरीपार गेल्याने 100.29 रुपये प्रति लीटर आहेत. या राज्यांत 100 रुपयांपार पेट्रोल मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांपार आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे…
जळगाव, प्रतिनिधी । दरवर्षीप्रमाणे पितृ पंधरवडा यंदा नुकताच संपन्न झाला. या काळात पूर्वजांसह आई-वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे शुभाशीर्वाद अर्थात कृपादृष्टी परिवारावर कायम राहावी, या उद्देशातून प्रत्येकजण आपापल्या घरी पूजा-विधी करून त्यांच्याप्रती अर्पित करण्यात येणारा नैवेद्य स्मशानभूमीतील चौथर्यावर काकस्पर्शासाठी ठेवतो. यामुळे या काळात चौथरा परिसरात काहीशी अस्वच्छता निर्माण होते. तसाच काहीसा प्रकार मेहरुण स्मशानभूमीतील चौथरा परिसरात झाला होता. यासंदर्भात 7 ऑक्टोबर 2021 रोजी ‘महापौर मित्र’कडून व्हॉटस्अॅपद्वारे ‘महापौर सेवा कक्ष’कडे तक्रार (क्र. 2423) नोंदविण्यात आली होती. संबंधित तक्रार निवारणासाठी या कक्षातील प्रतिनिधीने तत्काळ महापालिका अधिकार्यांशी संपर्क साधला. त्यावर महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी श्री.सतीश करोसिया यांनीही तत्परतेने संबंधित स्थळाची पाहणी करून सफाई…
जळगाव प्रतिनिधी । दवाखान्याच्या निमित्ताने जात असलेल्या एका तरूणाला मेडीकलवर जाणाऱ्या चार तरूणांनी किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायधन हॉस्पीटल समोर कंजरवाडा येथे राहणारा गोकुळे बबन लोंढे (वय-३०) हा वडीलांसह ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता पंचमुखी हनुमान मंदीराजवळील शोभा हॉस्पिटलशेजारी असलेले मेडीकलवर मास्क घेण्यासाठी गेले. मेडीकलवरील चार अनोळखी तरूणांनी चिडवले. याचा जाब विचारण्यासाठी गेला असता चौघांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी अनोळखी चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुनिल सोनार करीत आहे.
जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात 8 ते 14 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत कोविड-19 विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून लसीकरणासाठी आरोग्य विभागाच्यावतीने विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यात अद्याप ज्या नागरीकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नसेल त्यांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी आज दुपारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोगय यंत्रणेचे वैद्यकीय अधिकारी यांचेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. पांढरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी…
यावल, प्रतिनिधी । शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेकरिता जलशुद्धीकरण केंद्र व साठवण तलावाजवळ उच्च कार्यक्षमतेचे ट्रांसफार्मर बसविण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव अभिजित राऊत यांनी दि.4ऑक्टोंबर2021रोजी प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी दिली. प्रशासकीय मान्यताचा आदेश बघितला असता यावल शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेकरिता जलशुद्धीकरण केंद्र व साठवण तलाव येथे उच्च कार्यक्षमतेचे ट्रांसफार्मर बसविणे साठी जिल्हाधिकारी जळगाव यांनी26लाख96हजार195 रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली. गेल्या20ते25 वर्षापासून यावल शहरातील विकसित भागात पाणी पुरवठ्यासाठी पाईप लाईन आणि पाण्याची टाकी नसल्यामुळे यावल नगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा होत नव्हता त्यामुळे गेल्या तीन वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी10लाख लिटर क्षमतेच्या नवीन पाण्याच्या टाकीचे…
मुंबई, वृत्तसंस्था । दीर्घकाळ झालेल्या घसरणीनंतर आता सोन्याचा दर आता पुन्हा वरच्या दिशेने प्रवास करु लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीत बरेच चढउतार पाहायला मिळायला आहेत. सोने सध्या गेल्या अनेक महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. जाणकरांच्या सल्ल्यानुसार सोने खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर शुक्रवारी सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याची किंमत 0.14 टक्क्यांनी वाढून 46,892 रुपये प्रतितोळा या पातळीवर पोहोचली. तर चांदीच्या दरात 0.48 टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचा भाव प्रतिकिलो 60,963 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डॉलर आणि बॉण्ड्सवरील व्याज वाढल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव आहे. आगामी काळातही हा दबाव कायम…