Author: saimat team

पाचोरा प्रतिनिधी । आज सोमवार ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्यात महा विकास आघाडीतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांन वर भाजप आमदारांच्या मुलाने अन्या केल्यापासून या अन्यायाबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बंद पुकारण्यात आलेला असून पाचोरा महाविकास आघाडीतर्फे संपूर्ण व्यापार व बाजार पेठ बंद करण्यात आला असून शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी या बंद मध्ये सहभाग नोंदवावा असे आव्हान शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर्फे करण्यात आले होते. या बंदमध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांनी महा विकास आघाडी सरकारला पाठिंबा देत सर्व भाजीपाला फळ मार्केट विविध दुकाने बंद ठेवून राज्य सरकारला पाठिंबा दर्शविला आहे.आज सकाळी १० वा मा विकास आघाडीच्या अधिकारांत तर्फे शंभर टक्के…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील पहूर येथे महा विकास आघाडीतर्फे कडकडीत बंद करण्यात आला होता येथील सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठान संचालकांनी 100% प्रतिसाद सर्व व्यापाऱ्यांनी महा विकास आघाडीच्या बंदला पाठिंबा दिला. शहरातील सर्व हॉटेल्स टपरीधारक सर्व प्रतिष्ठाने दुकाने शंभर टक्के बंद होते उत्तर प्रदेश येथील लखीमपुर हत्याकांडाची घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी तर्फे महाराष्ट्र बंदची हाक दिली होती महाराष्ट्र बंद मध्ये महा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले होतेयावेळी पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना घटनेच्या निषेधार्थ निवेदन सादर करून या घटनेचा निषेध करण्यात आला या प्रसंगी संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष तथा माजी कृषी सभापती जळगाव प्रदीप भाऊ लोढा ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्याम भाऊ सावळेशिवसेना…

Read More

यावल, प्रतिनिधी । महाविकास आघाडीचा आज राज्यव्यापी बंद असला तरी मात्र यावल शहरात महाविकास आघाडीला अल्प प्रतिसाद मिळाला आहे महाविकास आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते, व्यापारी,नागरिकांना आप- आपली दुकाने प्रतिष्ठाने बंद करण्याचे आव्हान करीत असताना किरकोळ विक्रेते,हातगाडीवर विविध वस्तू विक्रेते,व्यापारी,नागरिकांनी तेवढ्यापुरता म्हणजे पंधरा-वीस मिनिटं आपली दुकाने बंद करून मार्केट बंद करण्याच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. बाजारपेठ बंद करण्यासाठी महा विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते पुढे गेल्यानंतर यावल शहरातील दुकाने,बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली यात महाविकास आघाडीला फक्त पंचवीस टक्के प्रतिसाद मिळाला.बाजार मार्केट दुकाने बंद करण्याच्या आव्हानामुळे यावल शहरातील नागरिकांमध्ये आणि अनेक व्यवसायिकांमध्ये महाविकास आघाडी बाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,आणि भारतीय…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । उत्तर प्रदेशातील लखिंपुर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटना विरोधात आज महाराष्ट्रातील महा विकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक दिली होती त्यानुसार आज शहरासह जामनेर तालुक्यात पहुर शेंदुर्णी पाळधी नेरी वाकडी फत्तेपुर वाकोद आदी गावांमध्ये व्यापाऱ्यांनी आपले दुकाने व प्रतिष्ठाने सर्व दुकानदार यांनी बंद ठेवले होते सर पूर्ण जामनेर तालुक्यात महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला सर पूर्ण पाठिंबा व प्रतिसाद मिळाला. शहरातील नगरपालिका चौकात महा विकास आघाडीतर्फे काहीवेळा रस्ता रोको आंदोलन करून घटनेचा निषेध करण्यात आला याप्रसंगी महा विकास आघाडीतर्फे तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी नियोजन मंडळ सदस्य संजय गरुड युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील…

Read More

धानोरा ता. चोपडा, वार्ताहर ।  सातपुडा निवासिनी श्री क्षेत्र मनुदेवी येथे काल दि १० रविवार रोजी सुटीचा दिवस असल्याने मनुदेवी च्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभर चिंचोली मनुदेवी रस्ता खासगी  वाहनांनी  भरून गेला होता. भाविक मिळेल त्या वाहनांनी तर काही खासगी रिक्षा मोटरसायकल तसेच बसेस मधुन जाताना दिसुन येत होते. आज नवरात्रोत्सवाचा पाचवा दिवस असल्याने भाविकांची आता शेवटचे चार दिवस मोठी गर्दी दर्शनासाठी होणार असल्याने मनुदेवी संस्था व यावल पोलीस स्टेशनला नवरात्रोत्सव शांततेत व कोरोना नियमावलीत मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. काल रविवार असल्याने भाविकांची गर्दी चा कल पाहाता मनुदेवी संस्थानने भाविकांच्या खासगी वाहनांना मानापुरी पासुन मनुदेवी मंदिर…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । आज दि. 9 ऑक्टोबर रोजी नारीशक्ती ग्रुप जळगावतर्फे आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आ. राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, समाज कल्याण अधिकारी दिव्यांग विभाग जिल्हा परिषद भरत चौधरी, सेवाधर्म संस्था अध्यक्ष चंद्रशेखर नेवे, सेवारत परिवार डॉक्टर रितेश पाटील, भरारी फाउंडेशन अध्यक्ष दीपक परदेशी व नारीशक्ती ग्रुप अध्यक्ष मनीषा पाटील, नारीशक्ती ग्रुपच्या महिला सखी यांच्या शुभहस्ते शिलाई मशीन वाटप करण्यात आली. सर्व मान्यवरांचे नारीशक्ती ग्रुपतर्फे गुलाबाचे रोप देऊन पर्यावरण वाचवा हा संदेश देत स्वागत करण्यात आले. गरजूंसाठी झटणाऱ्या उपेक्षितांना मदत करणाऱ्या पीडितांचे अश्रू पुसणाऱ्या अनाथ निर्वासितांना…

Read More

पुणे, वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. शेतकरी हे उत्पादकाबरोबरच ते विक्रेते असल्याने ते आमचे व्यवसाय बंधूच आहेत. त्यामुळे सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बंदमध्ये आम्ही सहभागी न होता काळ्या फिती लावून हल्ल्याचा निषेध नोंदवणार आहोत, अशी भूमिका पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे घेण्यात आली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली. कोरोना काळात व्यापार बंद राहिल्याने खूप मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे व्यवसाय बंद ठेवणं आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. परंतु, शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांवर गाडी घालून त्यांना ठार मारण्याच्या प्रकाराचा संघटनेच्या वतीने आम्ही निषेध करतो आहोत. शेतकरी…

Read More

ठाणे, वृत्तसंस्था । पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकून महिलेवरील बलात्कार प्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आठ पैकी दोन दरोडेखोरांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. हा दरोडा सुनियोजित नसला तरी आरोपी हे सराईत गुन्हेगार मानसिकतेचे असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. नेमकं प्रकरण काय? 8 ऑक्टोबरच्या रात्री साडेसात वाजता लखनऊ सीएसटी पुष्पक एक्सप्रेसमध्ये डी टू या बोगीत दरोडा टाकण्यात आला. आठ दरोडेखोरांनी 16 प्रवाशांना मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल रोकड लूटली होती. मारहाणीत सहा प्रवासी जखमी झाले होते. नऊ प्रवाशांचे मोबाईल आणि सहा प्रवाशांची रोकड आणि एका महिलेवर दोन आरोपींनी लैगिंक अत्याचार केला होता. पोलिसांनी तपास…

Read More

चाळीसगाव, प्रतिनिधी । शहरातील एक प्रमुख समस्या असणाऱ्या स्टेशन रोडवरील बँक ऑफ बडोदा समोरील गेल्या काही दशकांपासून साफ न झालेली गटार तसेच मोठ्या प्रमाणात पाणी तुंबणाऱ्या व खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती नुकतीच आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने करून घेतली. या समस्येचा येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांसह आजूबाजूच्या व्यापारी बांधवांच्या व्यवसायावर देखील मोठा परिणाम होत होता. आज स्टेशन रोडवरील सर्व व्यापारी बांधवानी आमदार मंगेश चव्हाण यांची त्यांच्या जनसेवा कार्यालयात भेट घेतली व समस्या मार्गी लावल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी कापड आणि रेडिमेड असोसिएश व पुष्पराज गारमेंट्सचे संचालक प्रीतेश भाऊ कटारिया, करवा प्रोव्हिजन चे राहुल भाऊ करवा, जैन प्रोव्हिजनचे हरीशभाऊ जैन, सौराष्ट्र…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस महत्वपूर्ण असल्याने या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत ‘मिशन कवच कुंडल’ ही मोहीम राबविण्यात येत आहेत. या मोहिमेतंर्गत जिल्हा प्रशासनातर्फे वार्डासह गल्ली, प्रभागात सर्वसामान्य नागरीकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५ लाख २८ हजार १३४ पात्र लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. यात १९ लाख ३ हजार १८७ नागरिकांना पहिला तर ६ लाख २४ हजार ८६४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरणास पात्र लोकसंख्येनुसार जिल्ह्यातील जवळपास 70 टक्के लाभार्थ्यांना लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार…

Read More