जळगाव, प्रतिनिधी । येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयातर्फे ता. २३ ऑक्टोबर शनिवार रोजी उद्योग आणि इस्टीट्यूटमधील विध्यार्थ्यांना कनेक्ट करणारा “संगोष्ठी” या महत्वाकांशी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या काळात अभियांत्रिकी,मॅनेजमेट,फार्मसी यासारखे विविध पदवीधारक युवक मोठ्याप्रमाणात महाविद्यालयातून शिक्षण घेवून बाहेर पडतात. म्हणजेच आजच्या विध्यार्थ्यांकडे आपण घेत असलेल्या विषयाचे परंपरागत ज्ञान आहे. परंतु आजच्या सत्यपरिस्थितीचे अवलोकन केले तर बाहेरच्या जगात लागणारे कौशल्य आणि शिक्षणात मिळणारे ज्ञान यात बऱ्यापैकी तफावत आढळून येते. याच अनुषंगाने बाहेरील इंडस्ट्री व एज्युकेशन इस्टीट्यूट यांनी सामंजस्याने एकत्र येत व बरोबरीने हाताला हात देत काम केले तर आजच्या या क्रांतिकारी युगात एक उत्तम विध्यार्थी नक्कीच…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जळगाव येथील नारीशक्ती गृप अध्यक्षा तसेच महिला पर्यावरण सखी मंच जळगाव जिल्हा कार्याध्यक्षा सौ.मनिषा किशोर पाटील यांना 17 ऑक्टोंबर रोजी इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन, खान्देश नारीशक्ती गृप, खान्देश न्यूज नेटवर्क आणि खान्देश जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय नारीदीप सन्मान-२०२१ गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मनिषा पाटील यांनी समाज कार्यामध्ये स्वताला झोकून दिले असून अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून देखील त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात.महिला पतंजली योग समितीच्या जिल्हा प्रभारी पदाची देखील जबाबदारी त्यांच्यावर असुन जळगाव शहरात गेली अनेक वर्षे मनिषा ताई विनामुल्य योग…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणखी तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झालं असून याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. यापूर्वीच अर्ज दाखलच न झाल्याने शिवसेनेचे २ तर राष्ट्रवादीचे १ असे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. दरम्यान काल बुधवार रोजी छाननीत विरोधकांचे अर्ज अवैध ठरल्याने राष्ट्रवादीचे आणखी तीन उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. छाननी दरम्यान अनेक उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते. यात काही उमेदवारांचे अर्ज बाद ठरले असून यात अमळनेर मधून भाजपच्या माजी आ. स्मिता वाघ यांचा अर्ज बाद करण्यात आला तसेच मुक्ताईनगर आणि बोदवड येथील उमेदवारांचे अर्ज देखील…
मुंबई, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,४९० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,५१० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,४९० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,४९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर…
यावल, प्रतिनिधी । दि.20रोजी सकाळी10 वाजेला यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात मिटिंग अयोजित करण्यात आली होती.त्यानंतर प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या सूचनेप्रमाणे व जिल्ह्या राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा जि.प सदस्य रवींद्र पाटील यांचे नेतृत्वाखाली यावल येथे कृषी उत्पन्न बाजार समिती पासून वाहन ढकल यावल तहसिल ऑफिस मध्ये नायब तहसीलदार राहुल सोनवणे व नायब तहसीलदार मुकतार तडवी यांना निवेदन दिले. सदर निवेदन केंद्र सरकारच्या विरेधात निषेधार्थ पेट्रोल,डिझेल,घरगुतीगॅस, खाद्यतेल इत्यादी जीवन आवश्यक वस्तू केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे.संदर्भात केंद्र सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दि.20रोजी तहसीलदार यांना निवेदन दिले या प्रसंगी युवक…
धानोरा ता. चोपडा (वार्ताहर ) । येथील जळगाव रोडा लगत असलेल्या ग्रा.प. शॉपींग सेंटरमधील इंडी कॅश कंपनीचे एटीएम मशीनच थेट आज मध्यं रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. दरम्यान या घटनेने मोठी खळबळ धानोरा सह परिसरात माजली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की धानोरा गावाबाहेरील जळगाव रत्यांवरील ग्रा.प. मालकीच्या शॉपींग सेंटरमध्ये इंडी कॅश कंपनीचे एटीएम मशीन अनेक वर्षांपासून आहे, दरम्यान काल रात्री दोन ते तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम मशीन फुटत नसल्याने थेटे ट्रकमध्ये ठेवत चोरुन नेले. या पुर्वी तीनदा हे मशीन फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. रात्री हे मशीन चोरट्यांनी चोरून एका बारा…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप खासदार रक्षा खडसे, विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. रक्षा खडसेंनी महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. तर, स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. दरम्यान, स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील हे बिनविरोध निवडूण येतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ खडसे यांची बिनविरोध निवड होणार?मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचेच अर्ज उरले आहेत. यामध्ये आता रोहिणी खडसे अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.…
जळगाव, प्रतिनिधी । शासन सर्वसामान्य नागरीकांसाठी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवित आहे. हे उपक्रम गावपातळीपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना मिळण्यासाठी महसुल विभागाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. अशी सुचना नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली. येथील जिल्हा नियोजन सभागृहात विभागीय आयुक्त श्री. गमे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. विभागीय आयुक्त श्री. गमे पुढे म्हणाले की, शासन शेतकऱ्यांसाठी ई…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करावी, त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक पात्र व्यक्तींला कोरोना लसीचा पहिला डोस लवकरात लवकर देण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे, असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज दिले. जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. गमे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस.…
जळगाव प्रतिनिधी । ना हरकत दाखल देण्याच्या मोबदल्यात ४ हजाराची लाच मागणाऱ्या कनिष्ठ लिपीकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे. ४६ वर्षीय तक्रारदार यांना निमखेडी शिवारात असलेली एका सहकारी संस्थेमधील सदनिका खरेदी करणार असल्याने खरेदीकामी त्यांनी उपनिबंधक कार्यालयाकडून ना हरकत दाखला मिळण्यासाठी त्यांनी जळगाव जिल्हा निंबधक कार्यालयात ना हरकत दाखला मिळावा यासाठी कनिष्ठ लिपीक विनोद रमेश सोनवणे (वय-४६) रा. रिधुर वाडा शनीपेठ यांनी ५ हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती ४ हजार रूपये मागणी केल्याचे सिध्द झाल्याने त्यांना लाचलुचपत विभागाने अटक केली. लाचखोर विनोद सोनवणे याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ही कारवाई प्रभारी अपर पोलीस…