Author: saimat team

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती सातत्यानं वाढत आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्यानं नवनवे विक्रमही होत आहे. इंधन कंपन्यांनी शनिवारी २३ ऑक्टोबर रोजी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी ३५ पैशांची वाढ करण्यात आली असून यानंतर देशभरात पेट्रोल डिझेलचे दर विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर (Crude Oil) ९० डॉलर्स प्रति बॅरल पर्यंत पोहोचू शकतात, असं जाणकारांचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीत भारतीय बाजारपेठेत पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीपासून दिलासा मिळण्याची शक्यता दिसत नाही. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं (IOCL) दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत पेट्रोलचे दर विक्रमी १०७.२४ रूपये प्रति लिटर…

Read More

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील शेतकरी उत्पादन कंपनीने दुबई येथील जमाल अल शरीफ ट्रेडिंग एलएलसी युएई कंपनीशी केलेला करारनामा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांनी मंजूर करून तो करारनामा जळगाव येथे दि.22ऑक्टोंबर 2021शुक्रवार रोजी डीएसपी चौकात एका कार्यक्रमात कंपनीचे अध्यक्ष यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिला. आता चुंचाळे येथील शेतकरी उत्पादक कंपनी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्व शेती उत्पादन माल,धान्य, भाजीपाला,इत्यादी सर्व वस्तू हमी भावात खरेदी करून बाहेरील देशात निर्यात करणार असल्याने शेतकऱ्यांना आता आपल्या शेती उत्पादन मालास चांगला भाव मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल. चुंचाळे तालुका यावल येथील चुंचाळे शेतकरी उत्पादक कंपनीने एक स्मार्ट प्रकल्प तयार केला आणि त्या…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना. गुलाबराव पाटील आज सिल्वाहासा येथे प्रचार दौऱ्यानिमित्त असल्यामुळे आमदार रोहित पवार यांचे स्वागत जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे स्नेह व मार्गदर्शन नेहमीच लाभत राहते असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. मंत्रीमहोदयांनी जळगावला आल्यावर घरी येण्याचे निमंत्रण त्यांनी दिलेले होते. यानिमित्ताने आमदार रोहित पवार यांनी पाळधी येथे भेट दिली व भाऊसो गुलाबराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथील विद्यार्थ्यांशी आमदार रोहित पवार यांनी संवाद साधला. याप्रसंगी मा.विक्रमजी पाटील, शाळेचे मुख्याध्यापक डी डी कंखरे सर, इंग्लिश मीडियम स्कूल चे सचिन पाटील सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे योगेश…

Read More

जळगांव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील उर्दू माध्यम प्रतिनिधी व उर्दू सोशल मीडिया च्या माध्यमाने सेवा देणारे पत्रकारांचा जळगांव जिल्हा मानियार बारादरी तर्फे शाल व समूर्ती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या पस्तीस वर्षात पहिल्यांदाच एखाद्या संघटनेने जळगाव जिल्ह्यातील विविध उर्दू वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी आणि पत्रकार यांना त्यांच्या सेवांचा गौरव म्हणून त्यांचा सन्मान केल्या बद्दल वरिष्ठ पत्रकार अली अंजुम रिझवी यांनी बिरादारीचे कौतुक केले. ईद ए मिलाद च्या निमित्ताने पतंत्रकार भवन येथे “इस्लामच्या पैगंबरांचे पवित्र जीवन” या विषयावरील परिसंवाद ठेवले होते. या परिसंवादा चे वक्ते डॉ.रफिक पारनेरकर, डॉ. इकरम खान आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष काझी शहर मुफ्ती अतीक-उर-रहमान होते त्यांच्या हस्ते…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू नियंत्रणात येत आहे. शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ६३२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १ हजार ७४४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचप्रमाणे, याच एका दिवसात ४० रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे, आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांचा एकूण आकडा ६४ लाख ३२ हजार १३८ वर पोहोचला आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९७.४६ टक्के इतका झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख ९९ हजार ८५० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील रुग्णसंख्या जरी नियंत्रणात येत असली तरीही निश्चितच…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लिमिटेड उर्फ सोसायटी जळगाव चे होणाऱ्या पंचवार्षिक निवडणूक 2021 बाबत लोकमान्य प्रगती गटाची मनोमिलन सहविचार सभा राज्य सरकारी कर्मचारी संयुक्त संघटना कार्यालय जळगाव येथे लोकमान्य गटाचे अध्यक्ष गंजीधर शिवराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. वेध प्रगती गटाचे अध्यक्ष रवींद्र साळुंखे, प्रभाकर सोनवणे, अशोक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लोकमान्य गटाच्या नेतेपदी तत्कालीन गस सोसायटीचे अध्यक्ष विलास नेरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. येत्या काळात होऊ घातलेल्या तसं सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीबाबत सभासदांना समोर संस्थेच्या सभासद हितासाठी ध्येय धोरणे आखण्यात आली. कमी व्याजदरात कर्ज , मयत सभासद स शंभर टक्के कर्जमाफी ,…

Read More

यावल, प्रतिनिधी । शिक्षण हीच व्यक्तिगत, सामाजिक आणि वैश्विक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. शैक्षणिक संस्था समाज उद्धाराचे केंद्र बनली पाहिजे. सर्वांच्या सहभागातून दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून समाज उभारणीसाठी कटिबद्ध राहू असे मत शिरिष चौधरी अध्यक्ष, तापी परिसर विद्या मंडळ फैजपुर तथा आमदार रावेर – यावल विधानसभा मतदार संघ यांनी व्यक्त केले. ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने आयोजित संस्था पदाधिकारी यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते. तापी परिसर विद्या मंडळ, फैजपुर ची कार्यकारी मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मा संस्था पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरिष…

Read More

फैजपूर, प्रतिनिधी । स्व. दादासाहेब जे टी महाजन व स्व. डिगंबर शेठ नारखेडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर दि. २२ ऑक्टोबर २०२१ शुक्रवार पासून संपूर्ण यावल- रावेर तालुक्यात आयोजित करण्यात आलेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ दि. २२ ऑक्टोबर ला न्हावी येथून झाला. जळगाव सिव्हिल हॉस्पिटल व न्हावी ग्रामीण रुग्णालय यांच्या सहकार्याने हा रक्तदानाचा कार्यक्रम यशस्वी झाला. टी एम इ सोसायटीचे अध्यक्ष शरद महाजन यांनी फीत कापून उदघाटन केले. पहिल्याच दिवशी ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच भारत विद्यालय न्हावी येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पी. एच. महाजन…

Read More

पहूर ता जामनेर, प्रतिनिधी । पहूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या लोणी गावी ग्रामपंचायतीच्या जागेवरील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या समोर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण हटाव पथकास आडवे आल्याने समोर आलेल्या पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी त्यांची समजूत काढत त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवत असताना त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात ७ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती.तर एक जण फरार झाला होता. याप्रकरणी अटकेत असलेले दत्तू कडू उगले, भास्कर काशिनाथ वाघ, ज्ञानेश्वर कडू उगले यांच्यासह महादू कडू उगले, किर्तीराज केशव उगले, सागर उगले या सहा आरोपींना आज जामनेर न्यायालयात हजर केले…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । केंद्र सरकारने यंदाचे वर्ष आजादी का अमृत वर्ष साजरे करायचे निश्चित केले आहे. स्वच्छ भारत अभियानातंर्गत जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र व जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे आज जळगाव शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहरातील 5 व्यापारी संकुलातील सिंगल युस प्लास्टिकचा 1.5 टन कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, मनपा उपआयुक्त शाम गोसावी, कवियत्रि बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. पंकज ननावरे, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, रासेयो जिल्हा नोडल अधिकारी डॉ. दिनेश पाटील, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा…

Read More