Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा बाल कल्याण समिती, जळगाव यांच्या आदेशान्वये दिनांक 11 सप्टेंबर, 2021 रोजी धुळे येथील शिशुगृहात पुढील पुनर्वसनाकरीता बालिकेला दाखल करण्यात आलेले आहे. या मुलीस कोणी ओळखत असेल तर त्यांनी बाल कल्याण समिती, जळगाव या पत्त्यावर व दुरध्वनी क्रमांक- 0257/ 2239851 तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जळगाव 0257/2228825 वर संपर्क साधावा. असे योगेश मुक्कावार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Read More

यावल, प्रतिनिधी । दि.21 ऑक्टोबर2021रोजी जामनेर तालुक्यातील लोणी गावात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी जळगाव पोलीस अधीक्षक जळगाव यांना लेखी निवेदन महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन जळगाव जिल्हा तर्फे देण्यात आले. दि.21ऑक्टोबर2021रोजी लोणी तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी शासकीय कामकाज करण्यासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व अंमलदार,पोलीस कर्मचारी यांना काही समाजकंटकांकडून शिवीगाळ व मारहाण करण्यात आली त्या निषेधार्थ दि.25सोमवार रोजी जिल्हाधिकारी साहेब जळगाव,व पोलीस अधीक्षक साहेब जळगाव यांना महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन जळगाव जिल्हा तर्फे निवेदन देण्यात आले आहे. सदर आरोपीना कठोरात कठोर शिक्षा होऊन कारवाई करण्यात यावी जेणेकरून खाकी वर्दी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । श्री जळगाव माहेश्वरी विवाह सहयोग समितीतर्फे ऑनलाइन परिचय संमेलनाचे आयोजन २३ व २४ ऑक्टोबर रोजी महेश प्रगती मंडळ जळगाव येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माहेश्वरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामसुंदर सोनी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. हयावेळी प्रमुख अतिथी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष श्रीकिसन भंसाली, सुप्रसिद्ध विवाह समुपदेशक निशा चांडक ऑनलाईन उपस्थित होते. जळगाव माहेश्वरी विवाह सहयोग समितीचे अध्यक्ष श्यामसुंदर झंवर, सचिव सुरजमल सोमाणी, प्रमोद झंवर, वासुदेव बेहेडे, सुभाष जाखेटे, डॉ.जगदीश लढ्ढा, विवेकानंद सोनी, प्रकल्प प्रमुख प्रदेश संघटनमंत्री प्रा.संजय दहाड, प्रदेश उपाध्यक्ष मनीष झंवर, जिल्हाध्यक्ष एड.नारायण लाठी, जिल्हा सचिव माणकचंद झंवर, जिल्हा महिला अध्यक्षा राधा झंवर,…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । येथील शेंदुर्णी वाडी दरवाजा भागातील एम एस सी बी ची डीपी मागील 32 ते 30 दिवसापासून बंद होती स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते आणि त्यांनीही त्यांची समस्या गावातील सर्व सर्व राजकीय पदाधिकारी स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी यांना सर्वांना सूचना दिली पण त्याची गोष्ट कोणीच घेतली नाही त्यांची ही समस्या त्यांनी वार्ड क्रमांक 16 चे शिवसेना शाखाप्रमुख संदीप काटोले यांना ही समस्या सांगितली समस्याचे गांभीर्य समजून संदीप कातुले यांनी शहर प्रमुख व उपतालुकाप्रमुख यांचा संपर्क केले असता त्यांनी त्यांना तातडीची भेट दिली व सामाजिक कार्यकर्ते शिवसैनिक युवराज बारी यांनी सर्व महिलांना समजावून सांगीतले, शिवसेना तुम्हाला दोन दिवसांमध्ये डीपी उपलब्ध…

Read More

यावल, प्रतिनिधी । यावल पंचायत समिती आवारात नवीन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा काल दि.24 रविवार रोजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन चोपडा विधानसभेच्या आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या व इतर प्रमुख विशेष अतिथींच्या उपस्थित संपन्न झाला परंतु या कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरिषदादा चौधरी यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकल्याने रावेर व चोपडा या दोन्ही विधानसभा मतदारसंघात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावल तालुक्यात पूर्व पश्चिम भागात दोन आमदार आहेत पूर्व भागात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी तर पश्चिम भागात यावल तालुक्याचा काही भाग समाविष्ट असलेल्या चोपडा विधानसभा मतदार संघ…

Read More

यावल, प्रतिनिधी । गोंदिया येथे जाणारा ३० टन रेशन तांदूळाचा साठा यावल पोलिसांनी भरदिवसा जप्त केल्याची घटना घडली. धुळे जिल्ह्यातून कापडणे येथून अमळनेर- चोपडा- यावल- भुसावल मार्गे गोंदिया येथे जाणारा ३० टन वजनाचा तांदूळ भरदिवसा (रेशन दुकानातील तांदूळ) वाहतूक करणारा ट्राला यावल मार्गे जात असल्याची गोपनीय खबर पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाल्याने त्यांनी ए.एस.आय मुजफ्फर खान, पो. कॉ. सुशिल घुगे, पोलीस वाहन चालक गणेश रोहील यांनी व त्यांच्या सहकारी पोलिसांनी यावल पोलीस स्टेशन पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या केशरबाग हॉटेल जवळ सदर तांदळाचा ट्रक थांबवून चौकशी केली असता त्यात संशयास्पद रेशनचा तांदूळ असल्याच्या कारणावरून तो ट्राला यावल…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एम जे महाविद्यालयाजवळ असलेल्या एका मेडिकल ला रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. याप्रकरणी दहा लाखांचे औषधी जळून खाक झाले. यात कोणालाही जीवितहानी झालेली नाही. शहरातील एम जे महाविद्यालय परिसरातील समर्थ कॉलनीत रविवारी रात्री सव्वा अकरा वाजता वेणू फार्मसी या मेडिकलला आग लागली. यात आठ ते दहा लाख रुपयांची औषधी जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाचे बंब तातडीने दाखल झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मेडिकलचे मालक मिलिंद आनंद चौधरी (रा. दांडेकर नगर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सव्वा अकरा वाजता मेडिकलमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली बाहेर धूर व आगीचे लोळ येत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी एकाच…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । अमली पदार्थाच्या निमित्ताने महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईत सिनेसृष्टी आहे आणि ते मुंबईचे वैभव आहे. एनसीबीच्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही सिनेसृष्टी महाराष्ट्रातून निघून जावी अशा प्रकारचे प्रयत्न काही लोक करत आहेत, असा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला. राज्य सरकारने या सर्व प्रकरणांची स्युमोटो दखल घेत विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करावी, अशी मागणीही राऊत यांनी केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईचे काही व्हिडीओ समोर आल्यानंतर, संजय राऊत यांनी एनसीबीसह केंद्रीय यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल केला. अमली पदार्थाच्या निमित्ताने महाराष्ट्राला बदनाम करण्याची काही लोकांनी सुपारी घेतल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या वाघुरच्या ३३ के.व्ही. उच्चदाब वाहिनीवरील केबल दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे वाघुर पंपिंगला होणारा वीज पुरवठा २५ ऑक्टोबर रोजी बंद राहणार असल्यामुळे जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. २५ ऑक्टोबर रोजी होणारा पाणीपुरवठा २६ ऑक्टोबर रोजी होणार असून, २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी होणारा पाणीपुरवठा अनुक्रमे २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती जळगाव शहर महानगरपालिका, पाणीपुरवठा विभागाचे शहर अभियंता यांनी दिली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी आणि विसनजी नगरातून एकाच दिवशी दोन दुचाकींची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिल्या घटनेतील योगेश रमेश चौधरी (वय-३५) रा. आसोदा ता.जि.जळगाव हे फुल विक्रीचा व्यवसाय करतात. २२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांनी विसनजी नगरातील गायत्री मंदीराजवळ (एमएच १९ बीटी ०८८९) क्रमांकाची दुचाकी पार्कींग करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत सिंधी कॉलनी परिसरातील युनियन बँकसमोर संदीप बाळकृष्ण चौगुले (वय-३७) रा. विवेकानंद नगर साई बाब मंदीरासमोर जिल्हापेठ यांची…

Read More