मुंबई, वृत्तसंस्था । अफगाणिस्तानातील सत्तापालटानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुकामेव्याचे दर वाढले होते. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर भारतीयांसाठी एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. देशातील घाऊक बाजारपेठेत काजू, बदाम, मनुक्यासह सुकामेव्याच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. दिवाळीच्या सणाला सुकामेव्याला प्रचंड मागणी असते. मात्र, गेल्या काही महिन्यांत सुकामेव्याचे दर प्रचंड वाढले होते. बदामाचा प्रतिकिलो भाव 1200 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. परंतु, घाऊक बाजारपेठेत आता हा दर 600 रुपयांपर्यंत खाली उतरला आहे. सुकामेव्याचा नवा दर बदामाचा भाव 1100 रुपयांवरून 680 रुपये किलोवर आला आहे. त्याचबरोबर कॅलिफोर्निया बदामाचा भाव 1120 रुपयांवरून 660 रुपयांवर घसरला आहे.त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन बदामाचे भाव 1140 रुपयांवरून 680 रुपये किलोपर्यंत घसरले…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । पूर्वी गरोदरपणाचे २० आठवडे उलटून गेल्यावर गर्भात व्यंग असेल, बलात्कार पीडित असतील तर गर्भपाताच्या परवानगी घेण्यासाठी न्यायालयात जावे लागायचे. मात्र आता केंद्र शासनाकडून आलेल्या नवीन नियमानुसार तसेच संशोधनानुसार २० ते २४ आठवड्यांच्या गर्भपाताचे निर्णय डॉक्टरांना घेता येणार आहे. तसेच, २४ आठवड्यावरील व्यंग असलेली गर्भपाताची प्रकरणे मात्र मेडिकल बोर्डासमोर ठेऊन आठवड्याच्या आत निर्णय घेता येणार आहे. यामुळे सुरक्षित गर्भपाताला प्रोत्साहन मिळेल, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी दिली आहे. पूर्वी भारतात सुरक्षित गर्भपात कायदा (एमटीपी ऍक्ट १९७१) लागू होता. यानंतर २००३ साली कायद्यावर नवीन संशोधन झाले. आता पुन्हा…
जळगाव, प्रतिनिधी । मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘कोविड 19’ या साथरोगामुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे या समितीचे अध्यक्ष आहेत. ‘कोविड 19’मुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून प्रती मृत व्यक्तीसाठी रक्कम रुपये 50 हजार अर्थसहाय्य देणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. सदरचे अर्थसाहाय्य वितरणासंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडील 4 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या निकालपत्रात ‘कोविड 19’ मुळे होणाऱ्या मृत्यूचा विचार करण्याचे निकष ठरविले आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की,…
जळगाव, प्रतिनिधी । तूर हे जिल्ह्यातील खरीप हंगामातील महत्त्वाचे आंतरपीक आहे. तुरीवर शेंगा पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी व पिसारा पतंग आदींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असतो. त्यासाठी वेळीच फुलकळी लागताना पहिली फवारणी निंबोळी अर्क 5 टक्के, दुसरी फवारणी 12 ते 15 दिवसांनी हेलिओकिल 500 मिली/हेक्टर गरजेनुसार, तिसरी फवारणी क्लोरोपायरीफॉस 25 मिली अथवा पॉलिट्रीन 20 मिली प्रोफेनोफॉस 50 टक्के ई.सी. 15 मिली 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. अळीचे प्रमाण सुरुवातीस जास्त असेल तर 45 टक्के स्पिनोसॅड 162 मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट 5 टक्के दाणेदार 220 ग्रॅम/हेक्टर 500 लिटर पाण्यातून फवारावे. तसेच क्रॉपसॅप…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । जागतिक संकेतानुसार सोमवारी दिल्ली सराफात सोन्याचे दर 182 रुपयांनी वाढून 47,023 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तयार चांदीचा दर मात्र 178 रुपयांनी कमी होऊ 64,721 रुपये प्रत्येक किलो झाला. सकाळच्या सत्रात रुपयाचे मूल्य 18 पैशांनी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली. जागतिक बाजारात डॉलर घसरत असल्यामुळेही सोन्याचे दर वाढत असल्याचे दिसून येते असे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,800 डॉलर व चांदीचा दर 24.48 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.
नवी दिली, वृत्तसंस्था । ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु असलेली पेट्रोल-डिझेल दरवाढीनं महिना अखेरला थोडीशी उसंत घेतल्याचं चित्र आहे. लागोपाठ दुसऱ्या दिवशी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झाला नाही. दोन दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर उतार-चढाव पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली होती. भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 26 ऑक्टोबर रोजीही पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या किंमती स्थिर आहेत. याआधी 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) नं दिलेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये…
रत्नागिरी, वृत्तसंस्था । तब्बल तीन वर्षानंतर एसटीच्या तिकीटात भाडेवाढ झालीये. यामुळे मुंबई पुण्याचा प्रवास तब्बल 75 रुपयांनी महागणार आहे. तर कोल्हापूरच्या प्रवासासाठी 30 रुपयांनी महागणार आहे. कोकणातून मुंबईत जाण्यासाठी आता 450 ऐवजी 525 रुपये मोजावे लागणार आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्याअंतर्गत प्रवास 5 रुपयांपासून 40 रुपयांपर्यत महागणार आहे. एसटी महामंडळाकडून भाडेवाढ लागू इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर चांगलाच भार पडला आहे. हा भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली आहे. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच 17.17 टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व…
जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात दरवर्षी एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने या वर्षी दि. 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत अँन्टी करप्शन ब्युरो, जळगांव तर्फे “दक्षता जनजागृती सप्ताहाचे ” आयोजन करण्यात येणार आहे. मंगळवार दि. 26 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या संदेशाचे वाचन केले जाणार आहे. शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार आणि भ्रष्ट पध्दतीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी दक्षता जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगाने “दक्षता जनजागृती सप्ताह” अंतर्गत अॅंटी करप्शन ब्युरोची कार्यप्रणाली, भ्रष्टाचार विरोधी कायद्याची माहिती आणि अंमलबजावणी याबाबत जनजागृती…
जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वराड बुद्रुक येथील उपसरपंच, माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचे उपनेते तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला. यामुळे वराड येथे भाजपला भगदाड पडले असून ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ना. गुलाबराव पाटील व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे व जिल्हा सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी या सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. या प्रवेशामुळे वराड येथे शिवसेनेचे एकहाती वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. पालकमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्या उपस्थितीत आज अजिंठा विश्रामगृहात वराड बुद्रुक येथील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.…
जळगाव, प्रतिनिधी । राज्याचे बहुजन कल्याण, खार जमीन विकास, मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार हे मंगळवार, 26 ऑक्टोबर, 2021 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मंत्री श्री. वडेट्टीवार यांचा दौरा असा : मंगळवार, 26 ऑक्टोबर, 2021 रोजी सकाळी 9.00 वा जळगाव विमानतळ येथे विशेष विमानाने आगमन. सकाळी 9.30 वाजता बऱ्हाणपूरकडे (मध्य प्रदेश) प्रयाण (मार्गे – जळगाव-भुसावळ- मुक्ताईनगर-हतनूर), दुपारी 1.30 वाजता जळगावकडे प्रयाण, दुपारी 3 वाजता जळगाव येथे आगमन व अजिंठा विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 3.45 वाजता जळगाव विमानतळकडे प्रस्थान, दुपारी 4 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व विशेष विमानाने (CJ२) मुंबईकडे प्रयाण करतील.