Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र शासन, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र. आरएलपी-1021/प्र.क्र.247/विशा-१ब, दि. 27 ऑक्टोबर, 2021 अन्वये दिपावली उत्स्व 2021 सादर करणेबाबत मार्गदर्शक सुचना निर्गमीत केलेल्या आहेत. कोविड रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या दीड वर्षापासून सर्व धर्मीय सण/ उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरीकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. उत्सव साजरा करतांना सर्व नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने, जळगाव जिल्ह्यात कोव्हिड-19 मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता जिल्हाधिकारी…

Read More

यावल, प्रतिनिधी । माजी नगरसेवक तसेच कायद्याचे ज्ञान असलेल्या व्यक्तीस यावल नगरपरिषदेने नोटीस दिली आहे. नोटीस मध्ये नमूद केल्या नुसार प्रत्यक्षात काय कारवाई होणार किंवा नाही याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून. यावल नगरपरिषदेने माजी नगरसेवक तसेच कायद्याचे माहितगार वकील अशोक प्रभाकर गडे व वगैरे यांना दिनांक 29/10/2021रोजी दिलेली नोटीस प्रत्यक्ष बघितली असता यावल नगरपरिषद गटनेता तथा माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान सदस्य अतुल वसंतराव पाटील यांनी यावल नगरपरीषदकड़े तक्रार केल्यानुसार यावल नगरपरिषद अभियंता यांनी स्थळ निरीक्षण अहवाल सादर केला. तसेच ज्या अर्थी महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम १७९ सार्वजनिक रस्त्याच्या पृष्ठभागावरील प्रक्षेपणे,अथडळे व अतिक्रमणे अन्वये कोणत्याही…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । लॅपटॉपसह बॅग चोरणाऱ्यास संशयित आरोपीला आज शहरातील नवीन बसस्टॅन्ड येथे जिल्हापेठ पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याच्यावर जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दिवाळी सना निमित्त जळगाव बस स्टँडवर प्रवाशांची गर्दी असलेने प्रवाशी नामे जिशान अशपाक पिंजारी अमळनेर हे शिक्षणासाठी नांदेड येथे गेले होते ,नांदेड येथून अमळनेर येण्यास जळगाव येथे येऊन बस स्टॅन्ड वर आले,त्यांचेकडे 4 बॅग होत्या त्यांची अमळनेर बस संध्याकाळी 19/30वाजता आली परंतु त्यांना 4 बॅग पैकी तीनच बॅग दिसल्या कोणीतरी त्यांची बॅग नेल्याचे त्यांचे लक्ष्यात आलेने 3 बॅग घेऊन अमळनेर येथे गेले असता, नमूद चोरटा रेल्वे स्टेशन जळगाव येथे बॅग…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । आज कुसुंबे खु. येथे आत्मनिर्भर महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण, सायली काँस्मेटीक सेंटरमार्फत व प्रोफेशनल ब्युटीपार्लरच्या संचालिका रेखा अहीरे यांच्या सौजन्याने सहभागी मुलींना व महिलांना मोफत ब्युटी किटचे वापट करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन महिला सरपंच इंदुबाई दगडु पाटील, पल्लवी चौधरी, मिनाबाई पाटील, मनिषा कोळी, सुरेखा साळुंखे, सोनाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Read More

जळगाव प्रतिनिधी । २५ हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास करणाऱ्या संशयित चोरट्याला अटक करण्यात आलेली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वासुदेव जोशी कॉलनीतून २६ ऑक्टोबर रोजी २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलीसांनी शहरातील अजिंठा चौफुलीवरून अटक केली आहे. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश शिवाजी सुरळकर (वय-२०) रा. इंदीरागांधी चौक धामणगाव जि. बुलढाणा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील वासुदेव जोशी कॉलनीत राहणारे अनिल सुधाकर जाधव (वय-५२) हे कुटुंबियांसह राहतात. बांधकामाचे काम करून उदरनिर्वाह करतात. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जोशी कॉलनीत…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील श्रीवश्री बंटी ताडे यांची शिवशंभु संघटना संपर्कप्रमुख निवड करण्यात आली. \ बंटी ताडे यांची निवड संस्थापक अध्यक्ष महादेव पवार व शिवशंभु संघटना उपाध्यक्ष जळगाव जिल्हा सोपान मानकर व शिवशंभु संघटना अध्यक्ष नितीन पाटील व शिवशंभु संघटनेचा संघटकपदी आनंद आनंद घुगे यांनी नियुक्तीपत्र देऊन केली एकच निर्धार अन्याय विरुद्ध येल्गार या ब्रीदवाक्य प्रमाणे संघटनेचे कार्य व बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी तसेच गाव तिथे शाखा आणि घर तिथे मावळा हे अभियान राबवून जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणार असल्याचे बंटी ताडे यांनी निवडी प्रसंगी सांगितले.

Read More

जळगाव,प्रतिनिधी । आज दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी धरणगाव तालुका येथील साळवा येथील वैतागवाडी आदिवासी वस्ती नांदेड रस्ता येथे नारीशक्ती ग्रुप जळगाव तर्फे दिवाळी फराळ व साड्या वाटप करण्यात आल्या. यात शेवचिवडा, मोहनथाल, शंकरपाळे, व महिलांना साड्या यांचा समावेश असुन संजय भिल, काशिनाथ भील, मगन भील, अभिमन पिंपळसे , चंद्रभागा निकम, कमलबाई भील, रावली बारेला, दीपाली मोरे, चंदा भील, ममता बारेला अशा 150 कुटुंबाना वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी महापौर मा जयश्रीताई महाजन जिल्हा परिषद सदस्य मा माधुरीताई अत्तरदे, नारीशक्ती ग्रुप जळगाव अध्यक्ष मनिषा पाटील, सरपंच ईशाताई बोरोले, उपसरपंच सतीश पवार, सदस्य मनोज सोपान अत्तरदे, सदस्य चंद्रलेखा सतीश पवार सदस्य भूषण बऱ्हाटे,…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । “मंत्री छगन भुजबळ हे निर्दोष झालेच की आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की अनिल देशमुख यांनी काही केलेले नाही. ते निर्दोष होतीलच परंतु माणसाला मानसिक छळ करण्याचे काम आणि सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र केंद्र सरकारच्या एजन्सीमार्फत काही लोक करत आहे. लवकर सत्तेत येण्याची घाई लागल्याने सगळ्या मार्गाचा अवलंब आणि वापर होतोय.”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत केला. तसेच, “कुठलंही काम हे मेरीटने होणार यामध्ये मराठी आणि अमराठी असल्याचा विषय येत नाही. यापूर्वी ज्या गोष्टी झाल्या त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांना २८ महिने ईडीने तुरुंगात ठेवले ते मराठीच…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (( UPSC ) 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर upsc.gov.in पाहता येणार आहे. यूपीएससीच्या वेबसाईटवर हा निकाल पीडीएफ स्वरुपात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये यशस्वी उमेदवाराचे नाव, रोल नंबर प्रकाशित करण्यात आला आहे. त्यासाठी आयोगाच्या वेबसाईटवर ‘What’s New’ या सेक्शनवर क्लिक करावं लागेल. या यादीत केवळ यशस्वी विद्यार्थ्यांची नावंच प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे या यादीत जर नाव नसेल तर तो विद्यार्थी यूपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणार नाही. या पूर्व परीक्षेसाठी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । राज्य सरकारच्या वीज कंपन्यांमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शुक्रवारी केली. त्यानुसार वीज कंपन्यांमध्ये वर्ग एक ते चतुर्थ श्रेणीतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांना १२ हजार, तर सहायक कर्मचाऱ्यांना ७ हजार २०० रुपये बोनस देण्यात येणार आहे.सुरुवातीला वर्ग १ आणि २ च्या अधिकाऱ्यांना वगळून १० हजार रुपये बोनस देण्याचा प्रस्ताव ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी ठेवला. मात्र कामगार संघटनांनी या प्रस्तावाशी असहमती व्यक्त करून ऊर्जामंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. कामगार संघटनांशी चर्चा केल्यावर डॉ. राऊत यांनी ऊर्जा विभागाच्या प्रस्तावात गेल्या वर्षीच्या दिवाळीप्रमाणे याही वर्षी बोनस देण्याची घोषणा केली.…

Read More