Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त जळगांव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड भैय्यासाहेब रविंद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक भाऊ लाडवंजारी, एजाज मलिक, मजहर पठाण, अशोक पाटील, दिलीप माहेश्वरी, अरविंद चीतोडिया, वाय डी पाटील, बिऱ्हाडे, मंगला पाटील, वाय. एस. महाजन, सुनील माळी, परेश कोल्हे, सलीम भाई नामदार, अमोल कोल्हे, किरण राजपूत, अनिल पवार, अकील पटेल, भगवान सोनवणे, रिजवान खाटीक, रोहन सोनवणे, सुशील शिंदे, रमेश बहारे, गोटू चौधरी, प्रसाद वानखेडे धारा, ठाकर, विशाल देशमुख, राहुल टोके, नईम खाटीक आदी मान्यवर उपस्थित होते.

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिरसोली रोड परिसरातील एका ४० वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शहरातील नेहरू नगरातील ४० वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रात्री उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जतीन जयप्रकाश चांगरे (वय-४०) रा. सेंट टेरेसा शाळेसमोर, नेहरू नगर जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, जतीन चांगरे हे पत्नी व दोन मुलांसह नेहरू नगरात वास्तव्याला आहे. ते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वार्ड बॉय .म्हणून नोकरीला आहे. दिवाळी निमित्त त्याची…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा परिषदेसह खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा दिवाळीच्या सुटीनंतर गुरुवारपासून सुरू होत आहे. शुक्रवारी होणाऱ्या संपादणूक सर्व्हे (एनएएस)च्या परीक्षेनंतर सोमवारपासून दिवाळीच्या वाढवलेल्या सहा दिवसांच्या सुट्या माध्यमिक शाळांना मिळणार आहे. त्यामुळे या शाळा २२ तारखेपासून नियमित सुरुवात होणार आहे. तर प्राथमिक विभागाच्याही शाळा ११ व १३ नोव्हेंबरला नियमित भरणार आहे. त्यानंतर १५ व १६ राेजी पुन्हा सुट्या असून १७ नोव्हेंबरपासून शाळा नियमित सुरू होणार आहे. या बाबत प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढले आहे. धुळे : प्राथमिक शाळांना दोन दिवसांच्या वाढीव सुट्या जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या शिक्षकांना दोन दिवसांच्या वाढीव सुट्या मिळणार आहेत. १७ पासून नियमि सुरू होतील.राष्ट्रीय संपादणूक…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । ११ नोव्हेंबर पासून पुणे येथे एस एन बी पी क्रीडा संस्थेच्या माध्यमाने राज्यस्तरीय हॉकी महिला च् स्पर्धेला सुरुवात झाली असून या अत्यंत महत्त्वाच्या आमंत्रिताच्या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्याच्या स्पोर्ट्स हाऊसच्या संघाला सुद्धा प्रवेश मिळाला असून त्यासाठी जळगाव जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला व त्या संघाला श्री छत्रपती शिवाजी महाराज किडा संकुल येथे शुभेच्छा देण्यासाठी जळगाव महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन ,रायसोनी एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉक्टर प्रीती अग्रवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित व हॉकी जळगाव चे सचिव फारुक शेख यांची उपस्थिती होती. जीवनात जिंकण्याचे ध्येय ठेवा- महापौर जयश्री महाजन महिला खेळाडूंना शुभेच्छा देताना महापौर जयश्री महाजन यांनी महिला या कोणत्याही क्षेत्रात…

Read More

यावल, प्रतिनिधी । अवैध गौण खनिज कारवाईत तफावत आढळून आल्याच्या कारणावरून फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी यावल तहसीलदार महेश पवार यांना गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा कारणे दाखवा नोटीस दिली चौकशीअंती तहसीलदार महेश पवार यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही होणार आहे किंवा नाही याकडे संपूर्ण राजकारणाचे,अवैध वाळू करणाऱ्यासह तालुक्याचे लक्ष वेधून आहे. उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी दि.21ऑक्टोंबर 2021व दि.29ऑक्टोबर 2021 रोजी यावल तहसीलदार महेश पवार यांना दिलेल्या कारणे दाखवा नोटीसीत म्हटले आहे की, दि.20ऑक्टोबर2021रोजी विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांची महसूल अधिकारी आढावा बैठक पार पडली सदर बैठकीस आपले कार्यालयाकडील मीटिंग नोट्स मागविण्यात आल्या होत्या, त्यामधील गौण खनिज कारवाईबाबत पडताळणी…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,२६० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,९८० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६५,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,२६० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,२६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील शनिपेठ येथील एक जुनी इमारत आज सकाळच्या सुमारास कोसळली. यात सात जण बचावले व इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका वृद्धेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. शहरातील शनीपेठ परिसरात असलेल्या मनपा गंगुबाई शाळेसमोर असलेली एक जुनी इमारत गुरुवारी पहाटेच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने वेळीच बाहेर पडल्याने ७ लोक बचावले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या एका वृद्धेला परिसरातील तरुणांनी सुखरूप बाहेर काढल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. जळगावातील शनीपेठेत असलेल्या कै.गंगुबाई यादव शाळेसमोर एका इमारतीच्या बांधकामासाठी खोल खड्डा खोदण्यात आला आहे. बांधकामधीन इमारतीच्या शेजारी असलेली घरे लोडबेरिंग पद्धतीचे असल्याने त्यांना देखील धोका निर्माण झाला होता. गुरुवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील टॉवर चौकात महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मंत्री देशद्रोही नवाब मलिक यांचे कुख्यात अंडरवर्ल्ड माफियांसोबत सबंध उघडकीस आल्याने भाजप युवा मोर्चातर्फे देशद्रोही नवाब मलिकांचे पुतळ्याला चपलेने मारत दहन करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर व ग्रामीण तर्फ देशद्रोही नवाब मलिक यांचा निषेध व्यक्त करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, प्रदेश महिला उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानगराचे सरचिटणीस नितीन इंगळे, महानगर उपाध्यक्ष राजेंद्र मराठे, युवा मोर्चा महानगर अध्यक्ष आनंद सपकाळे, महिला मोर्चा अध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे, महानगर चिटणीस राहुल वाघ, विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे, जळगाव तालुका अध्यक्ष गोपाल…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (हवामानावर आधारीत)सन २०२०-२१ अंतर्गत केळी पिकांची नुकसान भरपाई फक्त १३५०० रुपये देण्यात आली असून उत्पादन खर्च पाहता ही रक्कम तुटपुंजी होती. त्यामुळे शासनाने पात्र विमाधारक यांना तातडीने निकषानुसार भरपाई द्यावी अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी कृषी आयुक्त यांचेकडे केली होती. खासदार उन्मेष दादा पाटील यांच्या पत्राची तात्काळ दखल घेऊन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी पत्र क्र.36734 दि.9 नोव्हेंबर 2021 च्या पत्रान्वये विभागीय व्यवस्थापक बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे यांना रु.22500/- प्रति हे. या प्रमाणे नुकसान भरपाई निश्चित करण्याचे आदेश दिले असून रु. 13500/- प्रति हे. ची…

Read More