Author: saimat team

चिखली, प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या दरोडे, चोरीच्या घटनांमुळे भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज, १७ नोव्‍हेंबरला पहाटे चिखली शहर व्यावसायिकाच्या निर्दयीपणे झालेल्या हत्‍येमुळे हादरून गेले आहे. काल, १६ नोव्‍हेंबरला रात्री पावणेदहाच्या सुमारास दुकानात शिरलेल्या दोन चोरट्यांनी आनंद इलेक्‍ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट यांची पोटावर चाकूचे वार करून हत्या केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्‍ही फूटेजमध्ये कैद झाला असून, एक चोरटा दुकानाबाहेर लक्ष ठेवण्यासाठी थांबलेला होता. चिखली शहरातील जयस्तंभ चौक परिसरात कमलेश पोपट (५५) यांचे आनंद इलेक्ट्रॉनिक्स आहे. काल रात्री दुकान बंद करण्याची तयारी करत असताना त्यांनी दुकानाचे मुख्य शटर बंद केले. बाजूचे लहान शटर उघडे असताना तिघे जण मोटारसायकलने…

Read More

जळगाव प्रतिनिधी | चाईल्ड पोर्नोग्राफीचा प्रसार करणार्‍यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने धाडसत्र टाकले असून यात जळगावातही छापे मारण्यात आले आहेत. यामुळे या भयंकर प्रकाराचे धागेदोरे हे जळगावपर्यंत पोहचल्याचे स्पष्ट झाले. चाईल्ड पोर्नोग्राफीच्या विरूध्द सरकारने कठोर भूमिका घेतली असतांनाही याचा सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून आले आहे. या अनुषंगाने सीबीआयने मंगळवारी दिवसभरात देशभरात छापे टाकले. ऑनलाइन बाल लैंगिक शोषण सामग्रीशी संबंधित गुन्ह्यांवर देशव्यापी समन्वित कारवाईमध्ये, केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने १४.११.२०२१ रोजी ८३ आरोपींविरुद्ध ऑनलाइन बाल लैंगिक शोषण आणि शोषणाशी संबंधित आरोपांवर २३ स्वतंत्र प्रकरणे नोंदवली. यानंतर काल म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी देशभरात छापे टाकण्यात आले. यात…

Read More

पहूर, प्रतिनिधी । पोलिस स्टेशनचे निरीक्षक अरुण धनवडे साहेब यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेंदुर्णी येथील अजय भोई शिवसेनाप्रमुख याच्या कानाखाली कोणीही लगावली नसून हा खोटा आरोप करत आहे. शेंदुर्णी येथील एका वृद्धला फक्त घुरघूर का बघतो या कारणावरून त्यास एका शिवसेना पदाधिका-याने बेदम मारहाण केली, व पोलीस ठाणेस आल्यावर देखील त्यांचेशी अरेरावी व भांडण केले म्हणून त्यांना पोलीस ठाणेत बसवून त्यांचे विरोधात वृद्धाची एन.सी. नोंद करीत असताना नमुद भांडणाशी कोणत्याही प्रकारे संबंध नसताना अजय भोई नावाचा इसम प्रतिबंधीत क्षेत्रात (जेल समोर) विनापरवाना घुसून आरडाओरडा केला, सदरवेळी वायरलेस वर वरिष्ठांचा ग्रुप कॉल चालू असल्याने त्यास आम्ही शांत राहण्याचा इशारा करूनही तो मोठमोठ्याने…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । मानवी सेवेत ताकद असल्याने समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी प्रत्येकाने नेहमीच मदतीचा हात दिला पाहिजे. सामाजिक कार्याने प्रेरित संघटनेने दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य वितरणाचा कार्यक्रम अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले. चाळीसगाव जि. जळगाव येथे आज सायंकाळी वर्धमान धाडीवाल मित्र मंडळातर्फे दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिव्यांग संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम, अनिल चौधरी, सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल आदी उपस्थित होते. राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले, समाजातील वंचित, दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । सावखेडा बु., ता. पाचोरा येथील वीरजवान मंगलसिंह जयसिंह परदेशी (वय 35) यांच्या पार्थिवावर आज सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी परदेशी कुटुंबायांची घरी जाऊन भेट घेत त्यांचे सांत्वन केले. जवान मंगलसिंह परदेशी यांना 14 नोव्हेंबर, 2021 रोजी पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना छातीत गोळी लागल्याने वीरमरण आले. त्यांचे पार्थिव आज सकाळी सावखेडा येथे आणण्यात आले. त्यानंतर शोकाकूल वातावरणात आणि ‘जवान मंगलसिंह अमर रहे’च्या जयघोषात अंत्ययात्रा काढण्यात आली. जवान मंगलसिंग परदेशी यांना त्यांचा सहावीतील 12 वर्षीय मुलगा चंदन याने…

Read More

सोलापूर, वृत्तसंस्था । अक्कलकोट येथून प्रवासी भरून सोलापूरकडे येणाऱ्या जीपचा अपघात होऊन त्यात दोन महिलांसह एकूण पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कुंभारी येथे घडलीय. या अपघातामध्ये १२ प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. आज सकाळी ११ च्या सुमारास हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार जीपच्या चाकाचा टायर फुटल्याने हा अपघात घडलाय. मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सोलापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत. जखमींवर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे प्रवासी खासगी वाहनांचा आधार घेत आहेत. अक्कलकोट येथून एमएच १३ एएक्स १२३७ या क्रमांकाची प्रवासी वाहतूक करणारी जीप…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेच्या विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीवर रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील पिंप्राळा भागात राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहितेचा पाठलाग करून एकाने विनयभंग केल्याची प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंप्राळा भागात ३० वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. सोमवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास विवाहिता ह्या पती व मुलासह दुचाकीने दवाखान्यात जात असतांना नुर मोहम्मद लतीफ (वय-४०) रा. जळगाव हा दुचाकीचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांच्या दुचाकीसमोर त्याची दुचाकी लावून त्यांना थांबविले. विवाहितेला माझ्याशी…

Read More

जळगांव, प्रतिनिधी । भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून जळगांव येथील रॉबिनहूड आर्मीने जादूगाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करून अगदी अनोख्या पद्धतीने बालदिवस साजरा केला. मुलं म्हणजे देवा घरची फुलं’जवाहरलाल नेहरूंचे मुलांवरील प्रेम पाहता दरवर्षी विविध उपक्रम घेऊन बालदिवस साजरा केला जातो.जळगांव येथील समता नगर परिसरात रॉबिन हूड आर्मीतर्फे प्रसिद्ध जादूगार अविनाशजी दुसाने यांच्या मॅजिक शोचे आयोजन केले गेले.रॉबिन हूड आर्मीच्या सदस्या संगीता चावला यांनी अविनाशजींचे स्वागत करत कार्यक्रमाला सुरुवात केली. अविनाशजींनी वेगवेगळे जादू प्रस्तुत केले व खूप मजेदार गोष्टी सांगितल्या.मुलांनी तसेच परिसरातील लोकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.खाऊ वाटप करून बालदिन मजेत साजरा करण्यात आला.…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय रोगनियंञण आरोग्य कार्यक्रम अंतर्गत लाळ खरकुत रोगाचे निर्मूलनसाठी लसीकरण करणे बाबतची मागणी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी केली. भडगाव तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेल्या आमडदे गावात पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात असून येथिल प्रमुख व्यवसाय शेती व शेतील जोडव्यवसाय म्हणून दुग्धव्यसाय मोठ्या प्रमाणात असून येथिल पशुवैदयकीय दवाखान्यात गाय,म्हैस,शेळी,मेंढी बैल,या जनावरांना लाळ,खरकुत आजारावर निर्मूलन करण्यासाठी लसीकरण करने आवश्यक असून दुध उत्पादक शेतकरी बांधवांच्या दुधात घट होत असल्याने ही तसेच एखादे पशुधन दगावले तर शेतकरी बांधवांला 50 ते 60 हजार रूपये आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून…

Read More

भुसावळ, प्रतिनिधी | विशेष पोलीस महानिरीक्षकांची मोठी कारवाई अवैध गॅस फिलींग प्रकरणातील प्रमुख सूत्रधार वसीम अब्दूल मशीद पटेल याला बाजारपेठ पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. शहरातील पटेल कॉलनीत गुरुवारी विशेष पोलिस महानिरीक्षका बी.जी. शेखर यांच्या पथकाने कारवाई केली होती. त्यात ९ घरगुती सिलिंडरसह दोन रिक्षा व अन्य मुद्देमाल मिळून १ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गॅस वाहनात भरणारा सलमान अब्दुल माजिद पटेल (वय ३०, पटेल कॉलनी, खडका रोड, भुसावळ), रिक्षा चालक आरिफ खान इसाफ खान (वय ३५, जाम मोहल्ला, भुसावळ) व जकाउल्ला खान असदउल्ला खान (वय ४३, खडका रोड, रामदासवाडी, भुसावळ) यांना अटक केली होती. मात्र, मुख्य संशयित…

Read More