Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एम जे महाविद्यालय परिसरातील चाय सुट्टा बार या हॉटेलात दारू पिऊन धुमाकूळ घालणाऱ्या तिघे संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलमध्ये दारू पिऊन धुमाकूळ घालणार्‍या तसेच पिस्तुलाची धमकी दाखवणाऱ्या तिघांना एलसीबीच्या पथकाने अटक केली असून यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. यातील एक स्वयंंघोषीत डॉन असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. संदीप उर्फ डॉन मधुकर निकम व अंकुश मधुकर सुरवाडे (दोघे रा. गेंदालाल मिल) व एक अल्पवयीन मुलगा या तिघांनी मू. जे. महाविद्यालय परिसरातील चाय सुट्टा बार या हॉटेलात धुमाकूळ घातला. दुपारी ते तिघे…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,१६० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,७८० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६०,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,१६० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,१६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । ‘ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबून पाहतो मागे किती राहिले’ असं व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वर्गीय भवरलाल जैन. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांना बरोबर घेऊन ज्यांनी विकासाचा ध्यास घेतला होता अशा व्यक्तिमत्वाला मनापासून भावांजली वाहतो असे गौरवोद्गार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक, गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी ‘भाऊंना भावांजली’ या कार्यक्रमात काढले. बहिणाबाईंच्या कवितेने व गीतांनी परिवर्तनच्या “अरे संसार संसार” कार्यक्रमाने भावांजली महोत्सवाला सुरवात झाली. संजिवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तनतर्फे पद्मश्री भवरलाल जैन यांना आदरांजली देणारा आठ दिवसीय ‘भावांजली महोत्सवा’चे उद्घाटन भाऊंच्या उद्यानातील ऍम्फि थिएटरमध्ये करण्यात आले. याप्रसंगी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन,…

Read More

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या डॅशिंग, फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil)यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. त्या लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) घड्याळ हाती बांधणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा शुक्रवारी पार पडेल . गेल्या काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. पक्षातील काही रिकामटेकडे लोक आपल्याविषयी नको ती चर्चा करतात अशी खदखद त्यांनी बोलून दाखवली होती. हे पाहता रुपाली पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा पाठवला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण…

Read More

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्सचा एक लोडर मुंबई-अबू धाबी फ्लाईटच्या कार्गो डब्यात झोपला होता, परंतु यूएईच्या राजधानीत पोहोचल्यावर सुरक्षित आढळून आला, असे विमान वाहतूक नियामकच्या अधिकाऱ्यांनी आज सांगितले. त्यांनी सांगितले की, रविवारच्या फ्लाईटमध्ये, विमान लोड केल्यानंतर खाजगी वाहकांचा एक लोडर मालवाहू डब्यात सामानाच्या मागे झोपला होता. अधिका-यांनी सांगितले की, कार्गोचा दरवाजा लॉक होता आणि विमानाने मुंबई विमानतळावरून उड्डाण करताच लोडरला जाग आली. ते म्हणाले की, विमान संयुक्त अरब अमिरातमधील राजधानी अबुधाबी येथे विमानाने लँडिंग केल्यानंतर अबू धाबीच्या अधिकाऱ्यांनी लोडरची वैद्यकीय तपासणी केली आणि त्याची शारीरिक स्थिती स्थिर आणि सामान्य असल्याचे सांगितले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) अधिकाऱ्यांनी सांगितले की, अबू-धाबीच्या अधिकाऱ्यांकडून…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । माणसांची संगत खूप महत्त्वाची आहे. चांगली संगत तुम्हाला नैतिक जीवन जगण्यास प्रेरित करीत असते. वाईट संगत तुमच्या अधोगतीकडे तुम्हाला नेत असते. व्यक्तीने आयुष्यामध्ये भगवंताची साधना केली तर नक्कीच आयुष्यात प्रगती होते, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील हभप सागर महाराज मराठे यांनी केले. नेहरू नगरातील शिवराजे फाउंडेशन द्वारा आयोजित श्रीमद् भागवत संगीतमय भागवत कथा आणि अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह दि.१२ डिसेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. कथेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी अनुक्रमे बीड येथील हभप सोनालीताई करपे महाराज आणि पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील हभप सागर महाराज मराठे यांचे कीर्तन झाले. कीर्तनामध्ये त्यांनी विविध संतांच्या अभंगांचे…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । नशिराबाद येथील मन्यारखेडा परिसरातील फातेमा नगरात घरफोडीतील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील मन्यारखेडा येथील फातेमा नगरातील घरातून रोकडसह दोन मोबाईल लांबविणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी नशिराबाद पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. इम्रान शरीफ खान (वय-३६) रा. फातेमा नगर मन्यारखेडा ता.जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ३१ मे २०२१ रोजीच्या मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या दरम्यान घरातील सर्व सदस्य झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातून रोकड आणि दोन मोबाईल असा एकुण २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । मेडिकल दुकानदाराला मोबाईलवर केवायसी करून घेण्याच्या नावाखाली 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील राधाकिसन वाडी येथील मेडीकल दुकानदाराला बीएसएनएल मोबाईल नंबरचे केवायसी करून घेण्याच्या नावाखाली सुमारे ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर वामन कोल्हे (वय ६७, रा. हिरापन्ना आपारमेंट, सिव्हिल हॉस्पिटल जवळ, जळगाव) हे मेडिकल स्टोअर करून आपला उदरनिर्वाह करतात. प्रभाकर कोल्हे सोमवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मेडिकल दुकानावर असताना त्यांना एका अनोळखी नंबर…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शुल्लक कारणावरून एका 42 वर्षीय युवकाला चार जणांनी लोखंडी रॉड ने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील जुनी जोशी कॉलनी परिसरात राहणाऱ्या गिरीष दिलीप जोशी हे पत्नी मिनाक्षी यांच्यासह राहायला आहे. एमआयडीसीत खासगी कंपनीत नोकरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गिरीष जोशी यांच्या घराचे सांडपाणी हे शेजारी राहणारे उमेश हरी लागवे यांच्या अंगणात आले होते. याचा राग उमेश लागवे याला आल्याने त्याने लोखंडी रॉड घेवून गिरीष जोशी यांच्या डोक्यात हाणला. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले तर तुषार हरी लागवे, मिनाबाई…

Read More

मलकापूर, प्रतिनिधी । दि. १३ रोजी येथे सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती निधनामुळे देशाची मोठी हानी झाली आहे असे प्रतिपादन माजी सैनिक संघटना अध्यक्ष मुरलीधर झनके यांनी श्रद्धांजलीपर व्यक्त केले. मलकापूर येथील शहीद संजय सिंह राजपूत यांच्या स्मारकाजवळ श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रल्हाद काटकर पोलीस निरीक्षक मलकापूर यांनी शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.तर ज्या भारत पाकिस्तान युद्धाची सुवर्णजयंती आपण साजरे करत असतानाच अचानक सीडीएस रावत यांचा हेलिकॉप्टर अपघात होऊन जनरल रावत समवेत त्यांची पत्नी व 12 सैन्य अधिकारी व जवान यांचा मृत्यू होणे ही अत्यंत घटना दायकबाब आहे. तर शहीदों की चिताओं पर लगेंगे मेले…

Read More