Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात बंद,रद्द झालेले मयत झालेले वारस न लागलेले अशा स्वस्त धान्य दुकान दुकानाचे जाहीरनामे जिल्हा प्रशासनाने काढले असून मात्र विस्तारित भागात लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्याभागात नविन दुकानं शासनाने निविदा काढून जाहीरनामे काढावे करावे या मागणीसाठी आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात निवेदन सादर करण्यात आले निवेदनात म्हटले आहे. जिल्ह्यात जुने बंद पडलले स्वस्त धान्य दुकाने जाहिरनामे काढून प्रक्रिया सुरू असून मात्र सुधारित विस्तारित भागात नवीन दुकाने काढण्याबाबत शासनाचे कोणतेही आदेश नाहीत त्या बाबतीत नविन दुकाने सुरु करावेत तसेच कोरोनाची…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धार्मिक आणि जातीय हिंसाचारावरून केंद्रातील मोदी सरकारवर आणि भाजपावर हल्लाबोल केलाय. देशात सत्ताधारीच जातीयवादाला खतपाणी घालत आहेत. त्यांना खड्याप्रमाणे बाजूला करणं तुमचं आणि माझं कर्तव्य आहे, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसेच आदिवासी कधीही चुकीच्या प्रवृत्तीला साथ देणार नाही ही खात्री असल्याचंही नमूद केलं. ते गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) तालुक्यातील कार्यकर्ता आणि पदाधिकारी बैठकीत बोलत होते. शरद पवार म्हणाले, “धार्मिक आणि जातीयवादाला खतपाणी घालणारा विचार जाणिवपूर्वक वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे सत्ताधारी करत आहेत. त्रिपुरात काही घडलं त्याचे परिणाम महाराष्ट्रात झाले. नांदेड, अमरावती, मालेगाव या ठिकाणी याचे परिणाम झाले. तिथं काही घडलं…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका २६ वर्षीय विवाहितेला दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावे यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस स्थानकात पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील आंबेडकर नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारीका सिध्दार्थ तायडे (वय-२६) रा. आंबेडकर नगर, जळगाव यांचा विवाह सिध्दार्थ जगदीश तायडे रा. आराधना नगर, वापी, वलसाड, गुजरात येथे रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या सुरूवातील काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती सिध्दार्थ याने किरकोळ…

Read More

यावल प्रतिनिधी । १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविल्याची घटना बारा नंबर रोजी घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फसूल लावून पळवून नेल्याचा प्रकार १२ नोव्हेंबर रोजी उघडकीला आला. शोधाशोध करून मुलगी न मिळाल्याने अखेर बुधवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील आदीवासी भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. ११ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता सर्वजण जेवण करून घरात झोपले. मध्यरात्रीच्य सुमारास अज्ञात व्यक्तीने १६ वर्षीय मुलीला…

Read More

जळगाव प्रतिनिधी । डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ रेल्वे स्टेशन येथे दोन जणांना मारहाण केल्याची घटना घडली याप्रकरणी संशयितांविरुद्ध विरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रेल्वे स्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ काहीही कारण नसंताना दोन जणांना मारहाण करून लोखंडी वस्तूने वार करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश सुहास चौधरी (वय-२५) रा. दिक्षीत वाडी जळगाव हा तरूण मित्र वैभव सुभाष काळे रा. दिक्षीत वाडी यांच्या सोबत बुधवार १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता शहरातील रेल्वे स्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आले. त्याठिकाणी कल्पेश भोईटे आणि प्रशांत…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । बनावट पावत्यांच्या आधारे जिल्हा परिषदेच्या ठेकेदारांनी अवैध गौणखनिजाचा वापर केल्या प्रकरणी अखेर जि.प. सीईओंनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांनी या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला आहे. जळगावसह पाचोरा, भडगाव आणि एरंडोल या तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या कामांसाठी १४ ठेकेदारांनी रॉयल्टी न भरता बनावट पावत्यांच्या वापर करून शासनाला चुना लावल्याचे हे प्रकरण जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणात शासनाची तब्बल ६३ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचे पुरावे त्यांनी सादर केले आहेत. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गुन्हे दाखल…

Read More

सर्कल, तलाठी यांची संयुक्त कारवाई यावल, प्रतिनिधी । पाडळसे बामणोद रस्त्यावर फैजपूरकडे जात असलेले अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर सर्कल,तलाठी यांनी पकडून फैजपूर पोलीस स्टेशनला जमा केले.पुढील दंडात्मक कारवाई साठी यावल तहसिलदार यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. दि.16रोजी सकाळी पाडळसे बामणोद रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर क्र.एम.एच.09जी.ई5966 हे गस्ती पथकातील यावल मंडळ अधिकारी शेखर तडवी,फैजपुर मंडळ अधिकारी देवरे,अंजाळे येथील तलाठी सूर्यवंशी,यावल तलाठी ईश्वर कोळी,पाडळसे येथील भूषण सूर्यवंशी, कोरपावली,टाकरखेडा येथील तलाठी तायडे,परसाडे येथील समीर तडवी,यांच्यासह डोंगर कठोरा,चूंचाळे तलाठी,शासकीय वाहन चालक साळवे या पथकाने पकडून फैजपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.डंपर चालक संजय कडू पाटील आणि मालक ज्ञानेश्वर लोणारी राहणार आंदलवाडी तालुका…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४८,४८० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४८,३६० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६६,४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,४८० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,४८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर…

Read More

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । तालुक्यात काही दिवसांपुर्वी माजी सैनिकांचा खून करण्यात आला होता. खून करणाऱ्या आरोपींना पकडून पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांनी गुडांची कुऱ्हा परिसरातून धिंड काढून जनतेमधील भिती दूर केली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरात गेल्या काही दरोडा, हत्या, काळे बाजारीकरण, अवैद्य धंदे, फसवणूक, अत्याचार, चोरी अशी विविध प्रकारची गुन्हेगारी आपले पाय पसरत आहे. या वाढलेल्या गुन्हेगारीच्या विरोधात परीसातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन दिले होते. या वाढत्या गुन्हेगारीची दाखल घेत पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी काही दिवसांपूर्वी घडलेल्या माजी सैनिकांच्या खुंनाच्या आरोपींना पकडून त्यांना कुऱ्हा परिसरात त्यांची जनतेतील भीती काढण्यासाठी धिंड काढण्यात आली. याप्रकणी प्रतिक्रिया पोलीस…

Read More

यावल, प्रतिनिधी । यावल येथील नगरपरिषदचे नगरसेवक तथा आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष व आई हॉस्पीटलचे संचालक डाॅ.कुंदन फेगडे यांच्या परिवारातर्फे जागतिक पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार व गौरव करण्यात आला. यावल येथे मंगळवार दि.16 नोव्हेंबर2021रोजी येथील नगर परिषदचे युवा नगरसेवक तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांच्या आई हॉस्पीटल हॉल मध्ये जागतीक पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील विविध वर्तमानपत्राचे अनेक वर्षापासुन वृत्त लेखानाचे कार्य करणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींचा सत्कार व सन्मान करण्यात आला.याप्रसंगी डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार डी.बी.पाटील,पत्रकार राजु कवडीवाले,पत्रकार अय्युब पटेल,पत्रकार शेखर पटेल,अरूण पाटील,सुनिल गावडे,ज्ञानदेव मराठे,पराग सराफ,तेजस यावलकर,शब्बीर खान,विक्की वानखेडे,दिपक नेवे,प्रकाश चौधरी आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आले.यावेळी…

Read More