जळगाव, प्रतिनिधी: येथील जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या आधुनिक दूध शीतकरण आणि दूध प्रक्रिया प्लांटचे लोकार्पण आज उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते आणि पालकमंत्री व अन्य लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले. उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांचे जिल्हा दूध संघातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. यंदा दूध संघाच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव असून दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते हवेत फुगे सोडण्यात आले. यानंतर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी संयुक्तपणे नवीन प्रकल्पाचे लोकार्पण केले. यात पाच लाख लीटर क्षमतेच्या नवीन दूध प्रक्रिया प्लांट आणि नवीन दुग्धजन्य पदार्थ उत्पादन युनिटचे उदघाटन करण्यात आले. यासोबत श्रीखंड, लस्सी आणि पनीर, सुगंधी गोड दूध पॅकींग सयंत्राचे…
Author: saimat team
चाळीसगाव, प्रतिनिधी । ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी आज पासून चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर चाळीसगाव नगरपालिकाचे माजी उपनगरअध्यक्ष प्रदिप निकम यांनी आमरण उपोषण दिनांक १६ डिसेंबरपासून सुरू केले आहे. उपोषण कर्ते हे मराठा समाजाचे असून इतर मागासवर्गीय प्रवर्गात येतात इतर मागासवर्गीय प्रवर्गाची संख्या व इतर प्रवर्गाची संख्या पाहता महाराष्ट्र शासनाने निवडणूक प्रकियेत लढवन्यकामी इतर मागासवर्गीय प्रवर्ग आरक्षणाची तयारी केलेली होती सदरचे आरक्षण हे होत नसून त्यामुळे निवडणूक लढवितांना आमचे स्वतःचे व इतर मागासवर्गीय प्रवर्गाची जागा नसेल त्यामुळे आमचे कधीही न भरून निघणारे नुकसान होईल संविधानातील तरतुदींचे अनुषंगाने प्रत्येक मागास वर्गास आरक्षण दिलेले आहे सदरचे आरक्षण हे त्या त्या…
जळगाव, प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शुक्रवार दि.17 डिसेंबर 2021 रोजीचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे. शुक्रवार दि. 17 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.55 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन. नंतर मोटारीने प्रयाण. सकाळी 8.15 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 8.55 वा मोटारीने प्रयाण. सकाळी 9.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आगमन. सकाळी 9.00 वा. जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा व जळगाव जिल्ह्यातील कोविड-19 विषाणू प्रादूर्भाव व उपाययोजनांचा आढावा. सकाळी 10.50 वा. मोटारीने प्रयाण. सकाळी 11.00 वा. जळगाव जिल्हा दुध संघाचे आवार, शिवाजीनगर, जळगाव येथे आगमन. सकाळी 11.00 वा. जळगाव जिल्हा सहकारी दुग्ध…
जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटा तर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या दोन वर्षानंतर महापालिकेत ऑफलाईन महासभेचे आयोजन करण्यात आले होते. दलित वस्ती निधीवरून यावेळी खडाजंगी होऊन उपमहापौर कुलभूषण पाटील व स्वीकृत नगरसेवक कैलास आप्पा सोनवणे यांच्यात शाब्दिक चकमक व धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. यामध्ये कोणत्याही प्रकारचे जळगावच्या विकासाच्या व नागरिकांच्या हिताच्या रस्ते,गटारी,आरोग्य, शिक्षण वगैरे बाबत नागरिक हे सुख सोयींपासून वंचित असताना अशा प्रकारची वादावादी दांगडो करून जळगाव शहराचे नाव हे मलीन करण्यात भर पडली आहे.…
चोपडा, प्रतिनिधी । चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचा इयत्ता बारावीत शिकणारा विद्यार्थी रणवीर राहुल देशमुख याची डार्ट माऊथ विद्यापीठात शंभर टक्के शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असल्याचे पत्र प्राचार्य मिलिंद पाटील यांना प्राप्त झाले आहे.रणवीरच्या पुढील चार वर्षाची शैक्षणिक निधी २ कोटी ४० लाख एवढी असून त्याचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ झाले आहे. घरापासून नेण्याचे तसेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोडण्याची सर्व व्यवस्था व खर्च कॉलेज करणार आहे. या मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संचालक तथा रोटरी क्लब ऑफ चोपड़ा अध्यक्ष पंकज बोरोले यांच्या हस्ते शाळेत रणवीरचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी पंकज प्राथमिकचे मुख्याध्यापक एम. व्ही .पाटील ,माध्यमिक व उच्च…
यावल तालुका कॉंग्रेस भव्य मेळावा संपन्न यावल, प्रतिनिधी । स्वातंत्रपुर्व काळापासुन दोन विचारधारा देशात होती यात सर्वधर्मसमभाव व जहाल विचारधारा तेव्हा सुरवाती पासुन देशाच्या सभोवतालचा विचार करणाऱ्या कॉग्रेस पक्षा सोबत जनता होती मात्र, गेल्या काही वर्षात सत्तांतर नंतर देशात महागाई वाढली, शेतकरी विरोधी धोरण, युवक बेराजगारी वाढली तेव्हा या प्रत्येक्ष परिस्थितीची वास्तवता लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील यांनी केले ते बुधवारी यावल शहरात जिल्हा परिषद,पंचायत समिती सह आगामी काळात होवु घातलेल्या विविध संस्थाच्या निवडणुकच्या निवडणुकी संर्दभात घेण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होते. बुधवारी शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या आवारात कॉग्रेस कमेटीचा मेळावा आयोजित करण्यात…
कासोदा ता, एरंडोल, प्रतिनिधी । येथील ज्येष्ठ पत्रकार तथा डॉ,एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्राप्त नुरुद्दीन मुल्लाजी यांनी पत्रकारितेत व समाज कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना जळगाव येथील मन्यार बिरादरी तर्फे सन्मानित करण्यात आले जळगाव महापौर जयश्री महाजन मुंबई उर्दू कारवाचे अध्यक्ष फरीद अहमद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते मलिक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर रफिक मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख उपाध्यक्ष हकीम चौधरी या मान्यवरांचे सह जिल्ह्यातील उर्दू साहित्यिक, उर्दू शायर ,पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सौ, पाकीजा पटेल एनुद्दीन सर ,पठाण मंजूर , उस्मान पटेल, अडावद बस स्थानक चे वाहतूक नियंत्रक सरताज खान…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,९१० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,१६० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६०,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,९१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,९१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…