जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील पहुर येथून जवळच असलेल्या शिवचरण सावळे यांच्या शेतामध्ये गटनंबर 597 एक कोल्हा जखमी अवस्थेमध्ये आढळला असता, त्यांनी भ्रमणध्वनीवरून वनपाल प्रशांत पाटील यांना माहिती दिली. त्यांच्या माहितीवरून प्रशांत पाटील यांनी तातडीने वन कर्मचारी जीवन पाटील, आनंदा ठाकरे, ईश्वर पारधी, रमेश पाटील यांना तात्काळ शेतात जाण्यास सांगितले, त्यानंतर त्यांनी शेतकर्याला फोन करून शेताचे लोकेशन विचारून ते त्या ठिकाणी पोहोचले असता त्यांना कोल्हा हा जखमी अवस्थेमध्ये दिसला त्यावेळी त्यांनी त्वरित पशुवैद्यकीय अधिकारी राठोड पहूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सदर प्राण्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन या असे सांगितले वनकर्मचारी जीवन पाटील यांनी काही शेतकऱ्यांच्या साह्याने कोल्ह्याला उचलण्याचा प्रयत्न…
Author: saimat team
यावल, प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आपला मनमानी कारभार करीत असून व्यापाऱ्यांनी आपले अनुज्ञा प्ती व्यापारी लायसेन्स नुतनीकरण ( रिनिव्हल ) करण्यासाठी आतापर्यन्त दोनशे रुपये फि लागत होती तिच फि कृउबा समितीने पाच हजार रुपये केल्याने ती फि व्यापाऱ्यांना परवडणारी नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून संताप व्यक्त करुन नाराजीचे सुर निघत आहे . याबाबत अधिक माहिती अशी की , गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमध्ये व्यापारींसह शेतकऱ्यांचे आर्थिक मोठे नुकसान झाले त्यात नुकतेच निसर्गाच्या लहरीपणा व अवकृपेने अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून त्याचा परिणाम उत्पादन कमी झाले आहे त्याची झळ व्यापारी वर्गाला बसली आहे…
चाळीसगाव, प्रतिनिधी । बी. पी. आर्टस् , एस. एम. ए. सायन्स अॅड के. के. सी. कॉमर्स कॉलेज चाळीसगाव येथे महिला तक्रार निवारण समितीमार्फत कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे लैंगिक शोषण या विषयावर एकदिवसीय वेबीनार चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. मिलिंद बिल्दीकर उपस्थित होते. तर प्रमुख वक्त्या म्हणून अॅड सौ . माधुरी एेडके या होत्या . प्रमुख अतिथी म्हणून डॉ. साै. शुभांगी एस. पूर्णपात्रे (संचालिका चा.ए.सो.) उपप्राचार्य डॉ. पी. एस. बाविस्कर उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे (आयक्यूएसी समन्वयक) उपस्थित होते . प्रास्ताविकात महिला तक्रार निवारण समितीच्या प्रमुख प्रा. कु. एल. व्ही. उपाध्ये (मानसशास्त्र विभागप्रमुख )…
यावल, प्रतिनिधी । नॅशनल हायवे क्र.6 चे बांधकाम बरेच अपूर्ण असल्याने वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे,या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दि.20 डिसेंबर2021 रोजी नशिराबाद येथील नितीन सुरेश रंधे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नॅशनल हायवे क.6 हा राष्ट्रीय महामार्ग तरसोद ते चिखली जळगांव व बुलढाणा जिल्हातून जातो.सदर रस्त्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे असे “नही” चे अधिकारी म्हणतात त्यानुसार 15/08/2021पासून नशिराबाद जवळ टोल नाका उभारून टोल वसुली केली जात आहे.परंतू खालील कामे अपूर्ण आहे जसे की,रेल्वे पूल,गटार,त्याचा त्वरीत पाठपुरावा व्हावा.रस्त्याचे दोन्ही…
यावल, प्रतिनिधी । भुसावळ जळगाव महामार्गाला लागून असलेल्या नशिराबाद येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता हे आपल्या कार्यालयात सोयीनुसार मर्जीनुसार अवेळी उपस्थित राहत असल्याने पर्यायी कार्यालयीन कामकाजात मोठ्या प्रमाणात अनियमितपणा येत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत दि.20डिसेंबर2021 रोजी कार्यकारी अभियंता जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. नशिराबाद येथील नितीन रंधे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की नशिराबाद येथील म.रा.वि.वि.कं.उपविभागीय अभियंता व कर्मचाऱ्यांचे मर्जीनुसार कार्यालय उघडत असतात व बंद करत असतात कार्यालय बंद करण्याची वेळ संध्याकाळी 6:15 वाजेची असताना कार्यालय 5 वाजता बंद होत असते.याबाबत सावकारे साहेब यांना भ्रमणध्वनी वरून बऱ्याच वेळा…
यावल, प्रतिनिधी । बामणोद-आमोदे हा शिवरस्ता मोकळा करण्यासाठी फैजपुर भाग मंडळ अधिकारी यांनी दि. 16डिसेंबर2021रोजी यावल तालुक्यातील विरोदे येथील दगडू चिंतामण कोळी या शेतकऱ्यास लेखी सूचना पत्र देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशी लेखी सूचना देण्यात आली आहे. या शिव रस्त्याबाबत यावल न्यायालय व जिल्हा न्यायालय आणि सत्र न्यायालय भुसावळ यांनी अनुक्रमे दि.1/11/2011रोजी व दि.23/10/2021रोजी ऑर्डर करून प्रतिवादी किंवा त्यांचे एजंट,नोंकर,कर्मचारी किंवा इतर कोणीही गट नंबर367मधून कायमस्वरूपी “जा” “ये” करू नये किंवा कोणतीही वाहने नेऊ नयेत असा आदेश केलेला आहे.असा आदेश न्यायालयाने जर केला आहे तर यावल तहसीलदार महेश पवार यांच्यासह फैजपुर मंडळ अधिकारी,बामणोद मंडळ…
जळगाव, प्रतिनिधी । भारतरत्न श्रध्देय स्व.अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर तर्फे अयोध्या नगर मध्ये भव्य कोविड लसीकरण शिबीर संपन्न भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रध्देय स्व.अटल बिहारीजी वाजपेयी जी यांच्या जयंती निमित्त मारूती मंदीर अयोध्या नगर येथे भाजपा युवा मोर्चा जिल्हा महानगर तर्फे लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार श्री.सुरेश दामू भोळे (राजुमामा), जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी,भा.ज.यु.मो जिल्हा अध्यक्ष आनंद सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपा युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर सरचिटणीस अक्षय जेजुरकर…
जळगाव, प्रतिनिधी । खुबचंद सागरमल विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त मुख्याध्यापक सतिश साळुंखे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी सुरेश आदिवाल, योगेद्र पवार, एल एन महाजन, पकंज सुर्यवंशी, प्रविण पाटील, सुलेमान तडवी आदी उपस्थीत होते
जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी महिला महानगर अध्यक्ष जळगाव शहराच्या अध्यक्षा मंगला पाटील यांच्या नेतृत्वात आज टॉवर चौकात शक्ती कायदा बहुमताने मंजूर झाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राज्यातील महिलांना संरक्षण देणारा बहुप्रतिक्षित शक्ती कायद्याला विधिमंडळाने एकमताने मंजुरी दिली . शक्ती कायदाचे स्वागत राष्ट्रवादी पक्षाच्या महिलांनी जल्लोषात ढोल-ताशांच्या गजरात व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आले. बलात्काराच्या गुन्ह्यासाठी, फाशीची शिक्षा आणि ऍसिड हल्ला करणाऱ्या करणाऱ्याला 15 वर्षाच्या कारावासाची तरतूद या कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. कायद्याची ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत शिक्षेच्या कक्षात पुरुषांबरोबर महिला तसेच तृतीयपंथीयांचा इ यात समावेश केला आहे. त्यामुळे वैयक्तिक वैमनस्यातून एखाद्या पुरुषाला त्रास देण्यासाठी खोट्या तक्रारी देण्याच्या प्रकारांना पायबंद…
चाळीसगाव, प्रतिनिधी । पोहरे तालुका चाळीसगाव येथील विकास खैरनार यांनी जुगाड पद्धतीने ट्रॅक्टर व फळबाग साठी पावडर फवारणी व वखरटी करण्यासाठी शेतकऱ्यांना अतीशय कमी इंधनावर चालणारे यंत्र तयार केले आहे ते ट्रॅक्टर व फळबाग पावडर फवारणी व वखरटी करणारे यंत्र आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा ना दादाजी भुसे साहेब यांनी पाहील्या नंतर विकास खैरनार बापुसो चंद्रकांत सोनवणे यांना शासनामार्फत कोणतीही मदत लागल्यास मला सांगा ती मी करणार असे आश्वासन दिले तसेच वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याची देखील लागवड करण्यात आली. या वेळी उद्घाटन नानासो भिमराव हरी खलाणे विधानसभा क्षेत्र प्रमूख चाळीसगाव तसेच युवा सेना अधीकारी चाळीसगाव युवा सेना तालुका प्रमुख चाळीसगाव दादासो…