पुणे, वृत्तसंस्था । देशाला प्रगतीपथावर पुढे नेण्यासाठी आणि स्वावलंबी बनविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात उत्तम काम करण्यावर भर द्यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सेंटर फॉर सिटीझन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्राचीन भारतीय संस्कृती व्याख्यानमाला आणि ‘भारतीय वारसा: परिचय आणि संवर्धन’ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, महापौर उषा ढोरे, पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्त राजेश पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरु डॉ. वसंत शिंदे आदी उपस्थित होते. राज्यपाल श्री. कोश्यारी…
Author: saimat team
रावेर, तालुका प्रतिनिधी । तालुक्याचा केंद्रबिंदू म्हणून पंचायत समितीकडे पाहिले जात असतांना रावेर पं.सं ची प्रतिमा मलिन करण्याचे काम पं.स.मध्ये कार्यरत असलेल्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंत्यांनी भोंगळ कारभार सुरु ठेवल्यामुळे होत असतांना दिसून येत आहे. पं. सं च्या अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाची गुणवत्ता घसरत असतानांही वरिष्ठ अधिकारी मात्र आपल्या शाखा अभियंत्याची पाठराखण करीत असल्याने पं. स. सदस्यांसह नागरिकांकडून तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली जात आहे.एकंदरीत रावेर पं.स.चे शाखा अभियंते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ओंजळीत असल्याचेही बोलले जात आहे. या बाबत कार्यकारी अभियंता बांधकाम व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या भोंगळ कारभार करणाऱ्या शाखा अभियंत्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊन या प्रकरणी…
रावेर : तालुका प्रतिनिधी मध्यप्रदेशातून कोट्यवधी रुपयांची ब्राऊन शुगर घेऊन जळगाव जिल्ह्यात आलेल्या बऱ्हाणपूर येथील महिलेस जळगाव पोलिसांनी रावेर येथे ताब्यात घेत तिच्याकडून 500 ग्रॅम ब्राऊन शुगरची दोन पाकीटे हस्तगत केल्याच्या कारवाईने स्थानिक गुन्हे शाखेचा नावलौकिक झाल आहे. याविरुद्ध रावेर पोलीस मात्र अवैध धंद्यांना अधिकृत परवानगी देत पोलीस प्रशासनाची प्रतिमा मालिन करीत असतांना खुलेआम दिसून येत आहे.स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी घेत शहरासह तालुक्यात अवैध धंदे चहा व पानटपरीसारखे थाटले आहेत. गंभीर बाब म्हणजे अवैध व्यवसायाच्या प्रसिद्धी माध्यमांनी बातम्या प्रकाशित केल्यावरही नाममात्र कार्यवाहीचा कांगावा करीत रावेर पोलीस आपली आर्थिक पोळी भाजत असल्याची जोरदार चर्चा रगली आहे. वरिष्ठ अधिकारीसुद्धा रावेर पोलीस निरीक्षकांना अभय…
जळगाव : विशेष प्रतिनिधी । येथील मुख्यमंत्री सडक योजनेतील कार्यकारी अभियंत्याची नुकतीच बदली झाली आहे. नेतृत्वहीन कार्यालयाचा भोंगळ कारभार मात्र यामुळे चव्हाट्यावर येतांना दिसून येत आहे. कार्यालयात खुर्च्या रिकाम्या दिसून येतात, जिल्हाभरातील ठेकेदारांची कामे रखडल्याचे दिसत आहे. प्रभारी कार्यकारी अभियंता विवेक माळुदे हे नाशिकला वास्त्यव्यास असल्याने या कार्यालयाचा कारभार आठवड्यातून एक ते दोन दिवस रेल्वेच्या वेळापत्रकानुसार,सोयीनुसार चालत असल्याने कार्यालयातील शाखा अभियंते,उपविभागीय अभियंते हेदेखील मनमानी पद्धतीने काम करीत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. याबाबत वरिष्ठांकडे काही सुज्ञ ठेकेदार तक्रारी करणार असल्याचे विश्वसनीय गोटातील वृत्त आहे . मुख्यमंत्री सडक योजनेचे जळगाव कार्यलय नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने वादग्रस्त राहिले आहे.आता तर…
जळगाव, प्रतिनिधी । शहरात अज्ञात व्यक्तीने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व कानातले टॉप्स लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांड्यांसह दागिन्यांनाही पॉलीश करून देण्याचा बहाणा करून अज्ञात दोन भामट्यांनी महिलेचे ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र व कानातले टॉप्स लंपास केल्याची घटना मंगळवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी मेहरूण येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहरूण परिसरातील रेणूका हॉस्पिटल समोर संगिता विजय सोनवणे (वय-४२) ह्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास महिला घरात काम करत असतांना…
भुसावळ, प्रतिनिधी । शहरात आज सकाळी मच्छी मार्केट परिसरात एका महिलेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शहरातील गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त होत असतांनाच आज एका महिलेवर अत्याचार करून तिचा खून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी आरपीडी रोडवरील मच्छी मार्केटच्या परिसरात एका महिलाचा मृतदेह आढळून आला. या संदर्भात पोलीस स्थानकात माहिती दिल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी देखील घटनास्थळी पाहणी केली. या महिलेची अतिशय क्रूर पध्दतीत हत्या करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तिच्या अंगावर धारदार शस्त्राचे वार केल्याचे दिसून येत असून शारीरीक अत्याचार…
मुंबई, वृत्तसंस्था । राज्याचे पोलीस दल अधिक बळकट करण्यासाठी ५० हजार पदांची भरती करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केली. विधानसभेत विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना वळसे पाटील यांनी राज्याच्या पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे मान्य केल़े आर.आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी ६० हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी १० हजार पोलिसांची भरती करण्यात आली. आता उर्वरित ५० हजार पोलिसांची भरती करायची आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, भ्रष्टाचाराचा कहर झाला असून, महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे, अशी टीका…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा बँकेच्या संचालिका अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यावर सोमवारी रात्री ९ वाजता हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी अॅड.रोहिणी खडसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवसेनेचे पदाधिकारी छोटू भोई, सुनिल पाटील व पंकज कोळी यांच्यासह अन्य चौघांविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा बँकेच्या संचालिका अॅड.रोहिणी खडसे या चांगदेव येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर मुक्ताईनगरकडे येत असताना सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजता माणेगाव फाट्याजवळ जिनींगजवळ त्यांच्या कार क्रमांक एमएच १९ सीसी-१९१९ समोर चार मोटारसायकलवरुन आलेल्या ७ हल्लेखोरांनी हल्ला चढविला होता. हातात तलावर, पिस्तूल व लोखंडी रॉड असलेल्या सात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात चारचाकीचा काच फुटला होता. यावेळी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे…
भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ, येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी “हेडस ऑफ इन्कम अँड इट्स प्रोविसनस” या विषयावर ऑनलाइन सेमिनारचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. ई.भंगाळे उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून भुसावळ शहरातील चार्टर्ड अकाउंटंट दीपक मेहरानी उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आयकर ला फक्त अभ्यासक्रमा पुरते मर्यादित न ठेवता त्याचे आर्थिक व्यवहारात असलेले महत्त्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना आयकर म्हणजे काय, आयकर साठीचे विविध उत्पन्न स्रोत, जसेकी जसे की इनकम फ्रॉम सॅलरी, हाऊस प्रोपर्टी, बिझनेस अँड प्रोफेशन, कॅपिटल गैन,…