जळगाव, प्रतिनिधी । शहरातील ४८ वर्षीय महिलेला चार जणांनी मारहाण करून विनयभंग केल्याची घटना २९ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात राहणाऱ्या ४८ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास महिलेच्या मुलाला घरासमोरील राहणारा मुलगा भैरव राणे हा ओढताण करत असल्याचे पाहून महिला सोडविण्यासाठी गेली. त्यावेळी भैरव राणे याने महिलेला अश्लिल शिवीगाळ करून विनयभंग केला. तर प्रमिला भगवान राणे, उज्जवला प्रदीप राणे आणि प्रदीप पाटील यानी महिलेसह तिच्या मुलाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी महिलेने चौघांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । श्री संत बाबा गुरुदासराम चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नेत्रज्योती हॉस्पीटल, सिंधी कॉलनी, जळगांव येथे नववर्ष व मकर संक्रांती निमित्त दि. १ ते दि. १५ जानेवारीपर्यंत दुपारी ३ वाजेपासून संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत मोफत नेत्रतपासणी, दंत तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आलेले आहे. या शिबिरात हॉस्पीटलचे नेत्रतज्ञ डॉ. अल्विन राणे, डॉ. शिरीष पाटील, डॉ. श्रुती जोशी व डॉ. अशिषकुमार चांगभले हे डॉक्टर्स मोफत तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दंत विभागात डॉ. पिंकी नाथानी, डॉ. वर्षा रंगलानी , डॉ. सुप्रिया कुकरेजा हे डाक्टर्स तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ज्या रुग्णांना फिजिओथेरपी ट्रीटमेंट रेफरल केले आहे अश्या रुग्णांना मोफत फिजिओथेरपी ट्रीटमेंट…
यावल, प्रतिनिधी । 17,18 व19ला सोलापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय 8 व्या स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव जिल्हा टीमने चांगले प्रदर्शन करत घवघवीत यश मिळवले आहे. जळगाव जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिव्या भोसले व जिल्हा सचिव योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्याने सोलापूर येथे राज्यस्तरीय स्पर्धेत नेतृत्व केले. स्पर्धेत जळगाव जिल्हा टीम तर्फे कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, धावणे, आर्चरी, स्विमिंग, बॅडमिंटन,चेस व गोळा फेक या स्पर्धेत जिल्हाभरातून 98 खेळाडू सहभागी झाले होते. त्यात व्हॉलीबॉल टीम (चोपडा) ला सिल्व्हर मेडल, स्विमींग मध्ये ऋषिकेश पाटील (चोपडा) गोल्ड मेडल, चेस स्पर्धेत मध्ये राहुल लोहार यांना गोल्ड मेडल (चोपडा), तुषार पाटील यांना सिल्व्हर…
यावल, प्रतिनिधी । फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयापासून अंदाजे आठ ते दहा किलोमीटर अंतरावर रेशनिंगचा पावणेदोन लाख रुपये किमतीचा अवैध तांदूळ वाहतूक करणारा ट्रक सावदा पोलिसांनी पकडल्याने महसूल यंत्रणेची निष्क्रियता आणि भ्रष्टाचार,गैरप्रकार उघड झाला आहे याकडे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी यावल व रावेर तालुक्यातील संपूर्ण रेशन दुकानदारांची कसून चौकशी केल्यास अनेक स्वस्त धान्य/रेशन दुकानदाराकडून झालेला कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार गैरप्रकार आणि अवैध संपत्ती प्रॉपर्टी उघडकीस येईल असे सर्वसामान्य जनतेत बोलले जात आहे. गेल्या महिन्यापूर्वी आणि गेल्या वर्षी यावल आणि रावेर तालुक्यात रेशनिंगचा तांदूळ वाहतूक करणारे ट्रक यावल, सावदा,रावेर,पोलिसांकडून पकडण्यात आले होते आणि आहेत आणि आणि याबाबत संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने…
भुसावळ, प्रतिनिधी । येथील बसस्थानक परिसरात आज पहाटेच्या सुमारास तब्बल ३३ किलो गांजा जप्त करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने सापळा रचून तब्बल ३३ किलो गांजा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. रावेर येथील ब्राऊन शुगर नंतर गांजाबाबत करण्यात आलेली कारवाई ही महत्वाची मानली जात आहे. बाजारपेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक दिलीप भागवत यांना एका वाहनातून भुसावळच्या बसस्थानक परिसरात गांजा येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानुसार त्यांनी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले. या पथकाने बसस्थानकाच्या परिसरात पहाटे साडेतीनच्या सुमारास वाहन अडविले असता त्यात ३३…
जळगाव, प्रतिनिधी । अखेर शिवकॉलनी परिसरातील चिनार गार्डनजवळील सुरु असलेले पेट्रोल पंपाचे काम त्वरीत बंद करण्याचे आदेश मनपा नगर रचना विभागाने जारी करत नगरसेवक सचिन पाटील यांच्या पत्राची दखल घेत,संबंधीत परवानगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.नोटीसीत त्वरीत काम बंद करण्याचे आदेश देत कारवाईचा इशाराही दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी मनपाच्या नगररचना विभागाने संबंधीतांना नोटीस देवूनही पेट्रोल पंप बांधकामाचे काम जोरात सुरु असल्याचे चित्र असून संबंधीतांनी नगररचना विभागाच्या नोटीसीला केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट होत आहे.याबाबत प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे. शिव कॉलनी परिसरातील हॉटेल चिनार गार्डन लगत गट नं.52/2 मधील प्लॉट नं.22 मध्ये गेल्या दोन वर्षापासून…
रायपूर, वृत्तसंस्था । राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही अटकेची कारवाई कऱण्यात आली. छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून कालीचरण महाराजला अटक केली आहे. बगेश्वरी धामममधून पहाटे चार वाजता कालीचरण महाराजला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. कालीचरण महाराजला दुपारपर्यंत रायपूरला आणण्यात येणार आहे. टिकारपारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्म संसदेत वादग्रस्त विधाने सुरूच; गोडसेचं कौतुक करत महात्मा गांधींसाठी वापरले अपशब्द, मुख्यमंत्र्यांनी सोडला कार्यक्रम महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत त्यांना शिव्या दिल्याप्रकरणी धर्मसंसद वादात सापडली होती. कालीचरण महाराजने या संसदेत केलेल्या भाषणादरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात असलेल्या मशिदीच्या मागील भागात सांडपाण्याचे मोठे डबके साचलेले होते. परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते ललित कोळी यांनी स्वखर्चाने ३५ ट्रॅक्टर वेस्ट मटेरियल टाकून तो खड्डा बुजविला. सुप्रीम कॉलनीतील उस्मानिया पार्कमध्ये असलेल्या मशिदीच्या मागील बाजूला सांडपाण्याचा मोठा डबका साचलेला होता. त्याठिकाणी गवत, झाडे झुडपे वाढल्याने डास, मच्छर आणि सरीसृपचा परिसरातील नागरिकांना त्रास होत होता. वारंवार याप्रकरणी तक्रार करून देखील कुणीही दखल घेत नसल्याने नागरिक हतबल झाले होते. नागरिकांचा त्रास लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते ललित कोळी यांनी बुधवारी स्वखर्चाने तो खड्डा बुजविण्यासाठी पुढाकार घेतला. तब्बल ३५ ट्रॅक्टर वेस्ट मटेरियल टाकून त्यांनी तो…
यावल, प्रतिनिधी । यावल तालुक्यात डंपर वाहनातून अवैध वाळू वाहतूक सर्रासपणे सुरू आहे यावल तहसीलदार यांनी आज स्वतःआपल्या महसूल पथकासोबत अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काल मंगळवार दि.28रोजी संध्याकाळी यावल येथे आठवडेबाजाराजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर (नंबर प्लेट नसलेले ) व (चेसेस नंबर) स्वत: खोडलेल्या डंपरवर यावल तहसीलदार महेश पवार यांनी व त्यांच्या महसूल पथकाने पकडून पुढील कारवाई केली,डंपर चालकाचे चालकाचे नाव रतिलाल मच्छिद्र सांळुखे राहणार कोळन्हावी असे आहे तरी यावल महसुल विभागाने डंपर चालकास ताब्यात घेतले आहे तहसिलदार महेश पवार,फैजपुर मंडळ अधिकारी एम.एच.तडवी,अंजाळे तलाठी एस.व्ही.सुर्यवंशी,यावल तलाठी ईश्वर कोळी,परसाडे येथिल तलाठी समीर तडवी, दहिगाव…
यावल, प्रतिनिधी । तापी नदीच्या किनारपट्टीवर म्हणजे यावल तालुका महसूल कार्यक्षेत्रात तापी नदीच्या आजूबाजूस मोठा विस्तीर्ण गौण खनिजाचा साठा असल्याने या ठिकाणी दिवस-रात्र गौण खनिजाचे हजारो ब्रास उत्खनन करण्यात येत असून संबंधित स्टोन क्रशर धारक यावल तहसील मधून नाम मात्र गौण खनिज परवाना उपलब्ध करून घेत असून प्रत्यक्षात मात्र वाजवीपेक्षा जास्त गौण खनिजाचे उत्खनन करून कोट्यवधी रुपयांची कमाई करून घेत असल्याचे यावल रावेर तालुक्यात बोलले जात आहे. यावल तहसील कार्यालयात म्हणजे यावल तालुका महसूल कार्यक्षेत्रात,अंजाळे,अकलूद, कासवा शिवारात एकूण फक्त एकूण अकरा स्टोन क्रशर धारक मालक-चालक यांची नोंदणी झाल्याचे यावल तहसील कार्यालयात नोंद आहे.यात अनुक्रमे मनमोहन लालचंद लाहोरी,गणेश शिवाजी रावडे, संजय…