आशिया चषक ः सचिन-गिलचे शतक अन्‌‍‍ भलताच योगायोग

0
24

कोलंबो ः वृत्तसंस्था

आशिया चषकात बांगलादेशने भारताचा अटीतटीच्या लढतीत ६ धावांनी पराभव केला.शेवटच्या दोन षटकांमध्ये सामना बांगलादेशच्या बाजूने फिरला.अक्षर पटेल बाद झाल्यानंतर भारताचा पराभव निश्चित झाला.त्याआधी सलामीवीर शुभमन गिलने शतकी खेळी साकारली पण ही खेळी व्यर्थ ठरली.
सलामीला आलेल्या गिलनं १३३ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीनं १२१ धावांची खेळी साकारली. त्याने अनेक महत्त्वाच्या भागिदाऱ्या रचल्या.गिल ४४ व्या षटकात बाद झाला.त्यानंतर अक्षरने किल्ला लढवला पण तो बाद झाल्यानंतर बांगलादेशचा विजय निश्चित झाला. भारताला अटीतटीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे गिलची शतकी खेळी वाया गेली.त्यामुळे ११ वर्षांनंतर एक अजब योगायोग पाहायला मिळाला.
आशिया कपमध्ये भारताचा पराभव आणि त्यात शतक असा योगायोग केवळ दुसऱ्यांदा जुळून आला आहे. याआधी असा योगायोग सचिन तेंडुलकरसोबत घडला आहे. विशेष म्हणजे त्यावेळीही समोर बांगलादेशचा संघ होता. २०१२ मध्ये झालेल्या आशिया चषकात सचिननं १४७ चेंडूंमध्ये ११४ धावांची खेळी केली होती. त्यात त्यानं १२ चौकार आणि १ षटकार ठोकला होता. हा सामना मिरपूरमध्ये खेळवला गेला होता.त्यात बांगलादेशने ४ चेंडू आणि ५ गडी राखून विजय मिळवला.बांगलादेशने आशिया चषकात केवळ दोनदाच भारताचा १पराभव केला आहे.२०१२ मध्ये भारताला बांगलादेशविरुद्ध पहिला पराभव पाहावा लागला.त्यानंतर आता ११ वर्षांनंतर बांगलादेशने भारताला पराभूत केले आहे. या दोन्ही सामन्यांत भारतीय संघातील एका फलंदाजाने शतक साकारले.२०१२ मध्ये सचिन आणि आता गिलने शतकी खेळी उभारली पण या दोन्ही सामन्यांत भारताचा पराभव झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here