किनगावात आरोग्य केंद्रातर्फे डेंग्यू विरोधी मोहिमेस प्रारंभ

0
3

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गावात डेंग्यू विरोधी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. किनगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन, तालुका आरोग्य पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत उपकेंद्र किनगाव बुद्रुक, किनगाव खुर्द व डांभुर्णी येथे अति संवेदनशील भागात डेंग्यू विरोधी मोहीम सुरू केली आहे.

मोहिमद्वारे गावात डेंग्यूू ताप रुग्ण सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण, हस्तपत्रिका वाटण्यासह गाव पातळीवर डेंग्यू तापाची लक्षणे, उपचार, डेंग्यू ताप प्रतिरोधक उपाययोजनाबद्दल माहिती ग्रामीण पातळीवरील नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी आपापल्या घरातील पाणीसाठे झाकून ठेवणे, घरासमोरील नाल्या वाहत्या करणे, खिडक्यांना जाळ्या बसविणे, शौचालयाच्या वेंट पाईपला जाळी बसविणे, घरासमोर पाणी साचू न देणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे तसेच रात्री झोपताना मच्छरदाणी लावून झोपणे याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

यांचे लाभले सहकार्य

मोहिमेसाठी आरोग्य सहाय्यक आर. आर. सुरवाडे, आरोग्य सेवक जे. के. सोनवणे, डी.एम.बरडे, पी.जी. काळे, एम.बी.बारेला, किनगाव बुद्रुक येथील आशा वर्कर निराशा जाधव, रेखा पाटील, आशा भालेराव, दिपीका पाटील, धनश्री वाघुळदे, सुनिता पाटील, मीना साळुंखे, किनगाव खुर्द येथील आशावर्कर जयमाला अडकमोल, दुर्गा तायडे, सायरा तडवी, डांभुर्णी येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सोनल भंगाळे, आशा वर्कर छाया कोळी, रेखा कोळी, सायरा तडवी, पूनम सनेर, ममता कोळी यांचे सहकार्य लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here