ठाणे ः वृत्तसंस्था
सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु असून सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांकडेही बाप्पाचे आगमन झाले आहे.अशात सेलिब्रिटी असो किंवा राजकीय नेते एकमेकांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी जात आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतले. त्यानंतर ते ठाण्यातील आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी गेले. तिथे एका चिमुकलीने त्यांना राजकारणातील इतके प्रश्न विचारले की, त्यांना सळो की पळो करुन सोडले.
आठ वर्षांच्या या चिमुकलीने पहिला प्रश्न देवेंद्र यांना विचारला की, जपानला जाऊन आमच्या दीदीसाठी काय गिफ्ट आणलं? तिने हा प्रश्न विचारल्यावर फडणवीस यांना हसू आवरलं नाही. या चिमुकलीने गोड आवाज एका मागोमाग अनेक प्रश्न वाचून देवेंद्र फडणवीस यांची विकेट घेतली. एवढंच नाही तर राज्यात केलेली चांगलं कामं आम्हाला लक्षात राहतात, असेही ती न घाबरता बोलली.
ती देवेंद्र फडणवीस यांना म्हणाली, नरेंद्र मोदी हे आपले पंतप्रधान आहे. आम्हाला झोपूनही उठवलं तरी पंतप्रधान कोण असे विचारल्यावर आम्ही सांगू शकतो. त्यानंतर ती चिमुकली म्हणते- उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही तुमचं नाव पाठ केलं होतं आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार पण आहेत. आरक्षण,मेट्रोसारखे प्रश्न तुम्ही हसत हसत सोडवता पण आम्हा लहान मुलांकडेही लक्ष द्या.जेणे करुन आम्हाला एकच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची नावे पाच वर्ष पाठ राहिल.