रामनगरातील श्रीराम नगर मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी अजय पाटील

0
15

सचिवपदी अनिकेत सोनवणे यांची निवड

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील मेहरुणमधील रामनगरातील श्रीराम नगर मित्र मंडळाची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीत गणेशाची मूर्ती स्थापन करुन विविध उपक्रम राबविण्याचे नियाेजन करुन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच मंडळाची कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. त्यात मंडळाच्या अध्यक्षपदी अजय पाटील, उपाध्यक्ष अजय सोनवणे, सचिव अनिकेत सोनवणे, खजिनदार विशाल राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाच्या सदस्यांमध्ये किसन राजपूत, करण वानखेडकर, लखन शेळके, कृष्णा भोई, शंकर काळे, वैभव केदार, प्रभु केदार, सोनू कोळी, गोलु पाटील, विशाल सूर्यवंशी, हर्षल सोनगिरे यांचा समावेश आहे.

आठ फुटाची रामलल्लाच्या रुपातील मूर्ती स्थापन

मंडळातर्फे शनिवारी, ७ सप्टेंबर रोजी आठ फुटाची रामलल्लाच्या रुपातील मूर्ती स्थापन केली आहे. मंडळाचे यंदा १३ वे वर्ष आहे. मंडळाच्या आरासमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच मंडळातर्फे विविध सामाजिक, स्तुत्य असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अजय पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here