साईमत, प्रतिनिधी, जळगाव
येथील पिंप्राळा परिसरातील कोळीवाड्यात शनिवारी दुपारी १२.३० गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या तरूणावर रामानंदनगर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा भागातील कोळीवाडा परिसरात घराच्या आडोश्याला गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची गोपनिय माहिती रामांनगर पोलिसांना मिळाली. पोलीस पथकातील पोहेकॉ संजय सपकाळे, सुशील चौधरी, विजय खैरे, राजेश चव्हाण, रविंद्र चौधरी, पोलीस शिपाई उमेश पवार यांनी शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कारवाई केली.
यात कपिल रमेश सपकाळे (वय२०) रा.कोळीवाडा, पिंप्राळा हा बेकायदेशीरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना आढळून आला. त्यावर पोलिसांनी कारवाई करत त्याच्याजवळील ३५ लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली. याप्रकरणी पोलीस शिपाई उमेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी कपिल सपकाळे यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.