अमळनेरला रिक्षा उलटून महिलेचा मृत्यू

0
13

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

शहरातील बस स्थानकजवळील वळणावर प्रवासी रिक्षा उलटल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात प्रवासी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, अमळनेर तालुक्यातील कोंढवळ येथील रहिवाशी कलाबाई बुधा पाटील (वय ५८) या आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कलाबाई पाटील ह्या कामानिमित्ताने खासगी प्रवासी रिक्षाने अमळनेर येथून आपल्या गावी जात होते. त्यावेळी अमळनेर बसस्थानकात जवळील वळणावर प्रवासी रिक्षा चालक राजेंद्र रामदास भील याचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा उलटली. अपघातात कलाबाई पाटील खाली फेकल्या गेल्या. त्यातच ही रिक्षा त्यांच्या अंगावर पडल्याने त्या दबल्या गेल्या. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, मयत महिलेचा पुतण्या योगेश रघुनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रिक्षाचालक राजेंद्र रामदास भील यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अक्षता इंगळे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here