Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»आकाशवाणी चौकात मोटारसायकलस्वारास भरधाव ट्रकने चिरडले
    क्राईम

    आकाशवाणी चौकात मोटारसायकलस्वारास भरधाव ट्रकने चिरडले

    SaimatBy SaimatAugust 22, 2023Updated:August 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, प्रतिनिधी, जळगाव

    येथील आकाशवाणी चौकात मोटारसायकलस्वारास भरधाव गॅस सिलिंडर घेवून जाणाऱ्या ट्रकने चिरडल्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बैठकीसाठी येणाऱ्या कोल्हाडी(ता. बोदवड) येथील वि.का.सोसायटी सचिवांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली.

    जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकार विभागाची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी कोल्हाडी(ता. बोदवड) येथील वि.का.सोसायटी सचिव पंजाबराव बोरसे हे सकाळी बोदवड येथून दुचाकीने (क्र. एमएच 19, एसी 224) जळगावला यायला निघाले. ते शहरातील आकाशवाणी चौकात पोहचले त्या वेळी तेथे मागून भरधाव गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच 04 जेयु 9596) त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.

    यात बोरसे मागील चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. अपघात घडला तेव्हा परिसरात मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी तेथे धाव घेतली. पोलिसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णावाहिका मागवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. याबाबत रामानंद पोलिसात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Shendurni : शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य लोकार्पण

    March 15, 2026

    Faizpur : फैजपूर शहरात मुक्ताई पालखी सोहळा

    March 15, 2026

    Bhusawal : पाडळसे शिवमहापुराण कथास्थळावर प्रशासनाचे आदेश दुर्लक्षित

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.