Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»कांचननगरात दशक्रियाविधीचा स्वयंपाक करताना गॅस लिक झाल्याने घर जळून खाक
    क्राईम

    कांचननगरात दशक्रियाविधीचा स्वयंपाक करताना गॅस लिक झाल्याने घर जळून खाक

    SaimatBy SaimatAugust 22, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव, प्रतिनिधी,

    जळगाव- येथील कांचन नगरात दशक्रिया विधीच्ाा स्वयंपाक सुरू असताना गॅस लिक झाल्यामुळे भीषण आग लागून घराची राखरांगोळी झाल्याची घटना कांचननगरात मंगळवारी सकाळी 10. वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अकस्मात आगीची नोफ्लद शनिपेठ पोलिसात करण्यात आली आहे.

    येथील कांचननगरातील सुभाष भाऊलाल बाविस्कर (वय 52) यांच्या शेजारी वृद्घाचे निधन झाले होते. या वृद्घाचा आज दशक्रिया विधी असल्याने स्वयंपाक करण्यासाठी सुभाष बाविस्कर यांनी त्यांची खोली शेजारच्यांना दिली होती. स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस सिलिंडर लिक झाले. त्यामुळे अवघ्या काही क्षणातच याठिकाणी भीषण आग लागली. या भीषण आगीत खोलीत असलेले सर्व कपडे तसेच संसारोपयोगी साहित्य, त्यांचे एलआयसीचे कागदपत्र, बँकेचे पासबुक, परिवाराचे शैक्षणिक कागदपत्रे जळून खाक झाले आहे. तसेच पार्टीशनचे घर जळून खाक झाले. त्यामुळे बाविस्कर कुटुंबीयांचा संसार उघड्यावर आला आहे.

    या घटनेची माहिती नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. नागरिकांनी आपापल्या पद्धतीने पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आटोक्यात आली नाही. महापालिकेचा अग्निशमन विभागाचा बंब उशिरा पोहचला. तोपर्यंत आगीत संपूर्ण पार्टीशनचे घर खाक झाल्याचा आरोप या आगीत नुकसान झालेल्या घरमालकाने केला आहे. आगीबाबत माहिती देताना घरातील महिलेला अश्रू अनावर झाले होते.

    शासकीय मदतीची मागणी
    सुभाष बाविस्कर हे सेंटिंगचे काम करतात. त्यांची हलाखीची परिस्थिती असताना ही दुर्घटना घडल्यामुळे बाविस्कर कुटुंबीय उघड्यावर आले आहे. त्यांची एलआयसीचे कागदपत्र, बँकेचे पासबुक, परिवाराचे शैक्षणिक कागदपत्र जळून खाक झाले आहे. त्यांना शासनाने तातडीने मदत करण्याची मागणी होत आहे. या आगीत इतरही काही घरांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Shendurni : शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य लोकार्पण

    March 15, 2026

    Faizpur : फैजपूर शहरात मुक्ताई पालखी सोहळा

    March 15, 2026

    Bhusawal : पाडळसे शिवमहापुराण कथास्थळावर प्रशासनाचे आदेश दुर्लक्षित

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.