Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»दरोड्यासाठी निघालेली टोळी पकडली;
    क्राईम

    दरोड्यासाठी निघालेली टोळी पकडली;

    SaimatBy SaimatAugust 22, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, धुळे : प्रतिनिधी
    सरवड (ता. धुळे) फाटा ते गाव दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला येथील पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेक चोऱ्या व दरोड्यात या टोळीचा समाव्ोश असल्याचे निष्पन्न झाले आहे.बळसाणे येथील जैन मंदिर व चिमठाणे येथील मोबाईल दुकानातील चोरीतही या टोळीचा हात असल्याचे उघडकीस आले आहे. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
    येथील पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीपथकाला सरवड फाटा ते सरवड गावादरम्यान लामकानी रस्त्यावर तीन दुचाकी व नऊ लोक संशयास्पदरीत्या उभे असल्याचे दिसले. पोलिस वाहन पाहताच ते तिघी दुचाकीवर भरधाव निघाले. पोलिसांनी पाठलाग करून एका दुचाकीस थांबविले. दुचाकीवरील दोघांना ताब्यात घेण्यात आले मात्र एक पळून गेला. उर्वरित दुचाकींसह इतर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलिसांनी सरवड, नंदाणे, सायने, देवभाने, कापडणे परीसर पिंजून काढला. मात्र संशयित सापडले नाही. पकडलेल्यांपैकी एकाचे नाव श्रावण बापू मोरे (22, रा. आनंदखेडा ता. धुळे) असून दुसरा विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. त्यांच्याकडे एक लोखंडी कटर, धारदार चाकू, लाल मिरचीची पूड, 50 हजाराची दुचाकी (एमएच 18, बीडब्ल्यू 4148), दोर असे साहित्य मिळून आले. ते लामकानी येथे मोबाईल दुकानात दरोडा टाकण्यासाठी जात होते असे चौकशीत उघड झाले. फरार संशयित प्रेम मालचे (रा. इंदिरानगर, वाडीभोकर), ऋषीकेश दगडू सोनवणे, ईश्‍वर विजय वडार, सागर सुनील भिल, सचिन मणिलाल भिल, सागर सुरेश मोरे (सर्व कापडणे. ता. धुळे) यांची नाव्ो उघडकीस आली. त्यापैकी प्रेम मालचे व विक्की (कापडणे) हे फरार असून उर्वरितांना अटक करण्यात आली.

    पकडलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाने संशयित प्रेम मालचे, काळू भटू भिल, योगेश शायसिंग मोरे, भुरा रामा वळवी (सर्व रा.बळसाणे ता. साक्री) आदींसह बळसाणे येथील जैन मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. संशयित काळू भिल, योगेश मोरे यांना ताब्यात घेत चोरीच्या रकमेपैकी 30 हजार रुपये हस्तगत केले. चिमठाणे येथील मोबाईल दुकानात चोरी केली असेही समजले. पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सहाय्यक निरीक्षक गणेश फड, पोलीस विजय चौरे, नरेंद्र गिरासे, अमरिश सानप, राहुल सानप, सूरज सावळे, उन्मेश आळंदे, विजय पाटील यांनी ही कारवाई केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Muktainagar : उड्डाणपुलासाठी साठवलेला माल चोरीला चोरट्यांचा वाहनातून पलायनाचा संशय

    February 21, 2026

    जळगाव: तरुणाचा विषप्राशनातून दुर्दैवी मृत्यू

    February 20, 2026

    Chopda:चोपड्यात घरासमोर गाडी लावण्यावरून हाणामारी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.