साईमत, जळगाव, प्रतिनिधी
एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एकाने अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री ११ वाजता एकावर पोक्सो कायद्यांतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत त्याच परिसरात राहणाऱ्या एकाने शुक्रवारी दुपारी ४ वाजता अश्लील चाळे करत विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत पीडित मुलीने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. पीडित मुलीसह तिच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली महाजन करीत आहे.