साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (६ ऑगस्ट) धानोरा येथील सूर्यवंशी गुजर समाज सतपंथ मंदिरात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. या शिबीराला धानोरा, पंचक, मोहरद, पारगाव, चिंचोली, देवगाव, खोरगाव व अडावद परिसरातील ४५३ हून अधिक ग्रामस्थांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी
या शिबीरात महिला व किशोरवयीन मुलींसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी, औषध वाटप व आरोग्य समुपदेशन करण्यात आले. याशिवाय सर्वांसाठी मोफत दंत व नेत्र तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची विशेष सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती.
शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके, डॉ. पराग जहागीरदार, डॉ. तुषार फिरके, डॉ. काजल फिरके, रोटे. संदीप शर्मा, डॉ. माधुरी कासट, डॉ. हर्षदा पाटील, डॉ. ज्योती चौधरी, डॉ. पवन बजाज, डॉ. हर्षवर्धन जोशी यांच्यासह विजय जोशी, योगेश गांधी, सुबोध सराफ, राकेश चव्हाण, सुनील नानकर, सतपंथी मंदिर सेवा समितीचे विजय महाराज, गजानन चौधरी, सुरेंद्र महाजन, प्रदीप महाजन आणि वासुदेव महाजन उपस्थित होते.
शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे गिरीश कुलकर्णी, सुधीर पाटील, प्रशांत सूर्यवंशी, चंद्रकांत चौधरी आणि विक्रम अस्वार यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत असे शिबीर वारंवार आयोजित करण्याची मागणी केली आहे.
