NEP 2020 नुसार शिक्षण; डिजिटल क्लासरूमसह रोबोटिक्स आणि AI ची मिळणार प्राथमिक ओळख
साईमत -नशिराबाद- प्रतिनिधी |
ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे, आधुनिक आणि तितकेच संस्कारक्षम शिक्षण मिळावे यासाठी नशिराबादमध्ये कटिबद्ध असलेल्या ‘ग्लोबस इंग्लिश मीडियम स्कूल’मध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गुणवत्तापूर्ण बालशिक्षणाचा पाया रचणाऱ्या ‘किलबिल प्ले स्कूल’चा यशस्वी प्रवास आता ‘ग्लोबस इंग्लिश मीडियम स्कूल’च्या रूपाने अधिक व्यापक झाला असून, वर्ष २०२६-२७ साठी प्ले ग्रुप ते सीनियर केजी (Sr. KG) च्या प्रवेशांना सुरुवात झाली आहे.
‘किलबिल’ ते ‘ग्लोबस’… १६ वर्षांचा सुवर्ण प्रवास
सन २०१० मध्ये नशिराबादमध्ये जेव्हा ‘प्ले ग्रुप’ ही संकल्पना अगदी नवीन होती, तेव्हा यशसिंधू बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत ‘किलबिल प्ले स्कूल’ची स्थापना करण्यात आली होती. गेल्या १६ वर्षांत पालकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि दाखवलेला वाढता विश्वास लक्षात घेऊन संस्थेने शाळेचा विस्तार ‘ग्लोबस इंग्लिश मीडियम स्कूल’ या नावाने केला. आज ही संस्था परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यासाठी पहिली पसंती बनली आहे.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) अध्यापन
शाळेत केवळ पाठांतरावर भर न देता, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार ‘Inquiry & Activity-Based Learning’ (कृती आणि संशोधनावर आधारित) पद्धतीने शिकवले जाते. शाळेतील सर्व शिक्षक मॉन्टेसरी (Montessori), डी.एड. आणि बी.एड. पात्रताधारक असून, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकासावर येथे विशेष लक्ष दिले जाते. “Strong Roots, Bright Wings” (संस्कारांची समृद्धी, उज्ज्वल भरारी) या ब्रीदवाक्यानुसार विद्यार्थ्यांना घडवले जात आहे.
भविष्यात इयत्ता १२ वी पर्यंत विस्ताराचे नियोजन!
प्ले ग्रुप ते सीनियर केजीच्या यशस्वी वाटचालीनंतर, नशिराबाद आणि परिसरातील विद्यार्थ्यांची पुढील गैरसोय टाळण्यासाठी संस्थेने कंबर कसली आहे. आता इयत्ता पहिली ते थेट बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण नशिराबादमध्येच सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय मान्यतेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे.
क्रीडा, विज्ञान आणि कलांचा त्रिवेणी संगम; या आहेत आधुनिक सुविधा
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान न देता अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत:
स्मार्ट एज्युकेशन: डिजिटल वर्गखोल्या, संगणक शिक्षण आणि थेट प्राथमिक स्तरापासूनच रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ची ओळख.
क्रीडा व कला: *‘चाणक्य स्पोर्ट्स क्लब’*च्या माध्यमातून विविध क्रीडा उपक्रम, तर मुलींसाठी खास भरतनाट्यम प्रशिक्षण.
वैज्ञानिक दृष्टिकोन: विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी ‘संडे सायन्स’ आणि रोबोटिक्सचे प्रॅक्टिकल उपक्रम.
सुरक्षित वातावरण: स्वच्छ, हिरवाईने नटलेला कॅम्पस आणि संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही (CCTV) ची चोख देखरेख.
आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि उत्तम संस्कार मिळवून देण्यासाठी पालकांनी प्रवेशासाठी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.
प्रवेशासाठी कुठे संपर्क साधाल?
पत्ता: ग्लोबस इंग्लिश मीडियम स्कूल, डॉ. यशवंत नगर, अण्णांचे गार्डन रोड, नाशिराबाद.
मोबाईल क्रमांक: ९४२३५६५८४५
