१ जुलैपासून प्रत्यक्ष वर्गांना होणार सुरुवात
साईमत- जळगाव – प्रतिनिधी|
शहरातील बालशिक्षण क्षेत्रात आपल्या दर्जेदार आणि संस्कारक्षम शिक्षणासाठी नावलौकिक मिळवलेल्या ‘चावरा वंडरकिड्स’ (नर्सरी, ज्युनिअर के.जी. व सिनिअर के.जी.) या नामांकित संस्थेच्या पंखांचा आता अधिक विस्तार झाला आहे. जळगावकर पालकांची वाढती मागणी आणि चिमुरड्यांना घराच्या जवळच उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने संस्थेच्या दोन नवीन अत्याधुनिक शाखा शहरात सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्राचार्य फादर जोबी यांनी दिली. या दोन्ही शाखांमधील प्रत्यक्ष वर्गांना उद्या, बुधवार दि. १ जुलै २०२६ पासून उत्साहात सुरुवात होत आहे.
कुठे सुरू झाल्या नवीन शाखा?
शाखा १ ली (जुना खेडी रोड परिसर): प्लॉट क्रमांक ०६, गीताई बिल्डिंग जवळ, विठोबा नगर, जुना खेडी रोड, जळगाव.
शाखा २ री (खोटेनगर परिसर): प्लॉट क्रमांक १९, वातिका आश्रमजवळ, खोटे नगर, जळगाव.
पालकांच्या विश्वासाला नवे बळ!
चावरा वंडरकिड्सने आजवर खेळता-खेळता शिक्षण (Play and Learn) या पद्धतीचा वापर करून जळगावातील हजारो चिमुरड्यांचा पाया भक्कम केला आहे. “आजवर जळगावचे पालक, सुजाण शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संस्थेवर जो अथांग विश्वास दाखवला, जे सहकार्य केले, त्याच बळावर आम्ही हा नवीन टप्पा गाठू शकलो आहोत,” अशा शब्दांत प्राचार्य फादर जोबी यांनी जळगावकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या नव्या वाटचालीतही पालकांचे आशीर्वाद आणि सहकार्य असेच पाठीशी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
…तर ही आनंदाची बातमी नक्की शेअर करा!
तुमच्या परिचयातील, नात्यातील किंवा मित्रपरिवारातील कोणाला आपल्या चिमुरड्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दर्जेदार पूर्व-प्राथमिक शिक्षणासाठी चांगल्या शाळेच्या शोध असेल, तर ही महत्त्वाची बातमी त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रवेश आणि अधिक माहितीसाठी संपर्क:
पालकांना प्रवेश प्रक्रिया, फी किंवा इतर शैक्षणिक उपक्रमांबाबत अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी थेट शाळेच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
