उष्णतेच्या झळांपासून कामगारांना दिलासा
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल, मापाडी, महिला कामगार तसेच शिलाई कामगारांना रुमालांचे वाटप करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. वाढत्या उन्हाच्या तीव्र झळांपासून कामगारांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने भाजपा व्यापारी आघाडीच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात सुमारे २५० पुरुष व महिला कामगारांना रुमालांचे वाटप करण्यात आले. उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने श्रमिक वर्गाला दिलासा देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला असून, कामगार व व्यापारी वर्गाकडून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमास शहराचे आमदार राजू मामा भोळे, महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक राठी तसेच भाजपा व्यापारी आघाडीचे विनय बाहेती यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी हमाल कामगार अध्यक्ष इंद्रराज सपकाळे, कॉमेश सपकाळे, शरद मामा चौधरी, नगरसेवक विरण खडके, विजय वानखेडे, विनोद मराठे, मिलिंद चौधरी, प्रकाश डोडिया, विष्णुकांत मणियार, दीपक महाजन, सुनील तापडिया, मांगीलाल जैन, मुकेश कुकरेजा, कीर्तन सेजपारा, अभिलाष राठी, दर्पण पाटील, यश राठी, संजय शहा, रवींद्र फालक, प्रकाश बिर्ला, महेश पुरोहित, योगेश धूत, किरण कुलकर्णी, आकाश मंडोरा, सतनाम बावरी, संदीप दहाड, मयूर जाखेटे आदींसह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक राठी यांनी केले तर आभार विनय बाहेती यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले.
