साईमत/ जळगाव
सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजची सुरुवात धक्कादायक ठरली आहे. जळगावच्या सराफा बाजारात व्यवहार सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली असून ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
२४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून १ तोळा सोन्यासाठी जीएसटीसह सुमारे ₹१,५५,२२१ मोजावे लागत आहेत. तर १० तोळा सोन्याचा दर तब्बल ₹२९,००० ने वाढून सुमारे ₹१५,५२,२१० पर्यंत पोहोचला आहे.
चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ दिसून आली आहे. १ ग्रॅम चांदीच्या दरात वाढ होऊन १ किलो चांदीचा भाव सुमारे ₹२,५८,३५० (जीएसटीसह) इतका झाला आहे. यामुळे चांदीच्या खरेदीवरही परिणाम झाला आहे.
दरम्यान, बाजारातील तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांत सोनं-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि खरेदीदारांनी सावध भूमिका घ्यावी, असा सल्ला व्यापाऱ्यांकडून देण्यात येत आहे.
गुड रिटर्न्सच्या माहितीनुसारही आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली असून आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारांचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे.
