Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Dhule-Shirpur : धुळे-शिरपूर मार्गावर भीषण साखळी अपघात
    क्राईम

    Dhule-Shirpur : धुळे-शिरपूर मार्गावर भीषण साखळी अपघात

    saimatBy saimatApril 12, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    केमिकल टँकरचा ताबा सुटल्याने सहा वाहनांना धडक; तिघे गंभीर जखमी

    साईमत धुळे प्रतिनिधी

    धुळे–शिरपूर महामार्गावर आज दुपारी झालेल्या भीषण अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली. नियंत्रण सुटलेल्या केमिकल टँकरने तब्बल सहा वाहनांना जोरदार धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी झाले असून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सोनगीर फाट्याजवळ घडलेल्या या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीचा अक्षरशः खोळंबा झाला होता.

    मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात दुपारी साधारण २ वाजण्याच्या सुमारास घडला. शिरपूरकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या रसायनाने भरलेल्या टँकरचा चालकाचे नियंत्रण अचानक सुटले. त्यानंतर टँकरने उड्डाणपुलाखालील परिसरात अक्षरशः धडका देण्याची मालिका सुरू केली.

    या भीषण घटनेत टँकरने प्रथम एका शीतपेय विक्री केंद्राला जोरदार धडक दिली. त्यानंतर समोर आलेली मका भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली, चार दुचाकी आणि एक कार यांना टँकरने चिरडले. या अपघातात तीन दुचाकी थेट टँकरखाली अडकून पूर्णपणे चक्काचूर झाल्या असून ट्रॅक्टर व कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

    अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

    घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस ठाण्याचे अधिकारी व पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. काही काळासाठी या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

    या थरारक अपघातानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Dombivali Crime : गाडी बाजूला घेण्याच्या वादातून कार चालक व मित्रावर दगडांनी प्राणघातक हल्ला

    April 12, 2026

    Nandurbar : डोक्यात वार करून तरुणाची निर्घृण हत्या

    April 12, 2026

    Jalgaon : कासमवाडी आठवडे बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ

    April 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.