Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Gold Rate Today : सोन्याच्या किंमतीने घेतली भरारी; जळगावात आजचे ताजे दर काय?
    जळगाव

    Gold Rate Today : सोन्याच्या किंमतीने घेतली भरारी; जळगावात आजचे ताजे दर काय?

    saimatBy saimatApril 10, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / जळगांव

    आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाला तात्पुरता विराम मिळाल्यानंतर त्याचे थेट परिणाम जागतिक तसेच देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहेत. विशेषतः कच्चे तेल आणि सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असून, शुक्रवारी जळगावसह मुंबई, पुणे, दिल्ली आणि चेन्नई या प्रमुख बाजारपेठांमध्ये सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली.

    जळगावच्या सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल एक हजार रुपयांची वाढ झाली असून, सोन्याचा दर एक लाख ५५ हजार १५ रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरातही मोठी उसळी दिसून आली असून, प्रति किलो दरात सुमारे पाच हजार रुपयांची वाढ होऊन तो २ लाख ५२ हजार ३५० रुपयांवर गेला आहे.

    गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू होते. गुरुवारी दरात घट झाल्यानंतर आज पुन्हा बाजार उघडताच वाढ नोंदवण्यात आली. सराफा व्यावसायिकांच्या मते, इराण-इस्रायल युद्धविरामानंतर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर होत आहे.

    दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात हालचाली वाढल्या आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही जाणवत असून, ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरवाढीमुळे ग्राहकांना अधिक खर्च करावा लागत आहे.

    पुण्यातील सराफा व्यावसायिक फत्तेचंद रांका यांनी सांगितले की, युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात मोठे बदल होत असतात. युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास दर १ लाख ८० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात, तर परिस्थिती पूर्णपणे स्थिर झाल्यास दर सव्वा लाखांच्या आसपास येण्याची शक्यता आहे.

    भारतामध्ये सोन्याची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. युद्धकाळात आयात प्रक्रियेवर परिणाम झाल्याने दर वाढले होते. आता परिस्थिती सुधारल्यास आयात पुन्हा सुरळीत होऊन दर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील काही दिवसांतील जागतिक घडामोडींवरच सोन्या-चांदीच्या दराची दिशा ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon:महापालिका आयुक्तांच्या खुर्ची-जप्तीचे संकट टळले

    April 10, 2026

    Paladhi : पाळधीत दृष्टीदानाचा महाउपक्रम; २३५ रुग्णांना नवजीवनाचा प्रकाश

    April 10, 2026

    जळगाव ते इंदूर विमानसेवेला लवकरच हिरवा कंदील; प्रवास होणार काही मिनिटांत

    April 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.