Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : आरोग्य ही खरी संपत्ती; महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन
    जळगाव

    Jalgaon : आरोग्य ही खरी संपत्ती; महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

    saimatBy saimatApril 7, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राजर्षी शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये आरोग्य जागरूकता कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

    साईमत /जळगाव / प्रतिनिधी

    “आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने आपली दिनचर्या योग्य ठेवली पाहिजे. तसेच वेळेवर लसीकरण करणे गरजेचे आहे. शेवटी आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे,” असे प्रतिपादन जळगाव महापौर दीपमाला काळे यांनी केले.

    जळगाव शहर महानगरपालिकेच्या दवाखाना विभागाच्या वतीने मंगळवार, ७ एप्रिल रोजी ‘जागतिक आरोग्य दिन’ साजरा करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शहरातील नागरिकांबरोबरच विविध पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.

    व्यासपीठावर उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधु कोल्हे, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, स्थानिक नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, अर्शिनबानो खाटीक आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. वैभव वारके यांनी केले.

    कार्यक्रमात महापौर काळे यांनी नागरिकांना दैनंदिन जीवनात आरोग्याबद्दल अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले, तर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनीही आरोग्यविषयक जनजागृतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याचे सुचवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कमलेश अमोदकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी केले.

    यावेळी दवाखाना विभागातील विविध वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि जळगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाद्वारे नागरिकांना आरोग्य, स्वच्छता आणि लसीकरण याबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव भाजपमध्ये नव्या उमेदवारांचा प्रवेश, उत्साहाचे वातावरण

    April 7, 2026

    फडणवीस मंत्रिमंडळाने घेतले पाच महत्वाचे निर्णय; जाणून घ्या कोणते आहेत

    April 7, 2026

    Amalner : अमळनेर पुलकामाच्या खड्ड्यात बुलेट कोसळून तरुणाचा मृत्यू

    April 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.