Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी तरुणाचा मृत्यू
    क्राईम

    अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी तरुणाचा मृत्यू

    saimat teamBy saimat teamNovember 8, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । भडगाव शहरातील अज्ञात व्यक्तींनी एकाला मारहाण केल्याप्रकरणी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    भडगाव शहरातील युवकाला अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण करून ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली. सद्दाम अली फतरू अली (वय-२४ , रा. यशवंत नगर, वरची बर्डी भडगाव ) असे मयत युवकाचे नाव असून संतप्त नातेवाईकांनी मृतदेह भडगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आणून संशयितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. सद्दाम अली हे पत्नी यास्मीन व तीन मुलांसह राहत होते. बांधकामावरील सेटींगचे काम करून उदरनिर्वाह करत होते . शनिवारी रात्री सद्दाम अली नवीन पारोळा रोडवर ताडीच्या दुकानावर गेले. त्याठिकाणी चार ते पाच जणांनी त्यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते. दरम्यान सद्दाम हा बेशुध्दावस्थेत पडलेला असल्याची माहिती सद्दामचा भाऊ मोहब्बत अली याला मिळाली. त्यांनी तातडीने भावाला उचलून पाचोरा येथील खासगी रूग्णालयात दाखल केले परंतू वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषीत केले. मयत सद्दामला मारहाण का केली होती याबाबत अजून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. मयत सद्दाम अलीच्या नातेवाईकांनी मृतदेह भडगाव पोलीस ठाण्यात आणून ठिय्या आंदोलन करत संशयितांना अटक करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली होती. दरम्यान, पोलीसांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : प्रभाग ५ आरोग्य कार्यालयात महापौरांचा धडाका कर्मचाऱ्यांना शिस्तीचा इशारा

    February 16, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.