Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Bhusawal : नवोदय विद्यालयाजवळील विहिरीत अनोळखी मृतदेह भुसावळात खळबळ
    क्राईम

    Bhusawal : नवोदय विद्यालयाजवळील विहिरीत अनोळखी मृतदेह भुसावळात खळबळ

    saimatBy saimatApril 5, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ‘ॐ’ गोंदलेले मनगट ठरतेय ओळखीचा धागा; अनोळखी मृतदेहाचा तपास सुरू

    साईमत /भुसावळ / प्रतिनिधी

    भुसावळ शहरातील नवोदय विद्यालयाच्या पाठीमागील परिसरात असलेल्या श्री. झोपे यांच्या विहिरीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि. ४) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून, भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवोदय विद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत एक मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढण्याची कार्यवाही केली.

    मृत इसमाचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षांच्या दरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या डोक्यावर टक्कल असून, ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी काही ठळक खुणा नोंदवल्या आहेत. मयताच्या उजव्या मनगटावर ‘ॐ’ (ओम) हे अक्षर गोंदलेले असून, हातात लोखंडी कडे आणि काळा धागा बांधलेला आहे.

    दरम्यान, मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. या इसमाचा कोणत्याही प्रकारे बेपत्ता झाल्याची नोंद असल्यास अथवा वरील वर्णनाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीबाबत कोणाकडे माहिती असल्यास त्यांनी तात्काळ भुसावळ तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मृत्यूचे नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora : पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई, अवैध गुटखा व दारू जप्त

    April 5, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर हादरले शेतात आढळले नवजात अर्भकाचे प्रेत

    April 5, 2026

    ​​Jalgaon : जळगावात मध्यवर्ती भागात घरफोडी; बंद घर फोडून ५७ हजारांचा ऐवज लंपास

    April 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.