Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Illegal Gas Cylinders Seized : इंद्रप्रस्थ नगरात अवैध गॅस साठ्यावर पोलिसांची कारवाई; २१ सिलिंडर जप्त
    क्राईम

    Illegal Gas Cylinders Seized : इंद्रप्रस्थ नगरात अवैध गॅस साठ्यावर पोलिसांची कारवाई; २१ सिलिंडर जप्त

    saimatBy saimatMarch 28, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / यवतमाळ/ प्रतिनिधी

    पुसद शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरात अवैधरीत्या गॅस सिलिंडर साठवून त्यांची व्यावसायिक विक्री करणाऱ्या प्रकरणावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत २१ गॅस सिलिंडर जप्त केले. या कारवाईत सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    मधुकरलाल जाट यांच्या निवासस्थानी घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलिंडर बेकायदेशीररीत्या साठवून ते व्यावसायिक वापरासाठी विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला. यावेळी १९ किलो वजनाचे १९ आणि पाच किलोचे २ असे एकूण २१ सिलिंडर जप्त करण्यात आले.

    कारवाईदरम्यान संबंधित व्यक्तीकडे आवश्यक परवानग्या व कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी सिलिंडर जप्त करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

    ही कारवाई पोलिस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धीरज बांदे, शरद लोखंडे यांच्यासह पथकातील मन्ना आडे, संतोष भोयर, तेजस राणे, सुभाष जाधव, रमेश राठोड, कुशल मुंडेकर, सुनील पंडागळे, रवींद्र शिरभे आणि राजेश जाधव यांनी संयुक्तपणे केली.

    दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरात अवैध गॅस साठा किंवा विक्री आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Amalner : गावठी कट्ट्याचा घातक खेळ मित्रासमोरच सुटलेल्या गोळीने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

    March 28, 2026

    Stock Market Holiday : सुट्ट्यांचा शेअर बाजारावर परिणाम; पुढील आठवड्यात NSE-BSE चार दिवस बंद

    March 28, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगरजवळ भीषण अपघात; ट्रॅव्हल्सची ट्रकला जोरदार धडक

    March 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.